डोक्यावर मार लागणे - Head Injury in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

December 10, 2018

October 23, 2020

डोक्यावर मार लागणे
डोक्यावर मार लागणे

डोक्यावर मार लागणे म्हणजे काय?

डोके, स्कॅल्प किंवा मेंदू ला झालेली दुखापत किंवा जखम म्हणजे डोक्याला मार लागणे होय. डोक्यावरच्या एका सौम्य टेंगुळापासून ते एका गंभीरस्वरूपाची दुखापत किंवा कवटीच्या हाडे फ्रॅक्चर होण्याचा यात समाविष्ट असू शकतो.

त्याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

जखमाच्या प्रभावावर अवलंबून, एखाद्या व्यक्तीमध्ये विविध लक्षणे दिसू शकतात, जी सौम्य, मध्यम किंवा गंभीर असू शकतात.

  • सौम्य दुखापत            
  • डोक्यावर जखम किंवा टेंगुळ.
  • कवटीवर कापणे.  
  • डोकेदुखी.
  • फोटोफोबिया (प्रकाश संवेदनशीलता).
  • मळमळ.
  • गोंधळ.
  • हलकेपणा.
  • झोपेच्या पद्धतीत बदल होणे.
  • अस्पष्ट दृष्टी.
  • मध्यम दुखापत               
  •  तात्पुरती शुद्ध हरवणे.
  • गंभीर डोकेदुखी.
  • मळमळ आणि उलटी.

त्वचा पांढरी पडणे.

  • चिडचिडपणा किंवा वागणुकीत बदल.
  •  उघडी जखम.
  • गंभीर दुखापत
  • शुद्ध हरपणे.
  • निश्चेष्ट अवस्था.
  • दौरे.
  • स्थिर आणि सौम्य बुब्बुळ.
  • परकीय वस्तूंचे मेंदूमध्ये दुर्मिळ प्रवेश करणे.
  • वनस्पतीजन्य अवस्था.

त्याचे मुख्य कारण काय आहेत?

डोक्याला मार लागण्याचे कारण अनेक आहेत. मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये विविध कारणे आहेत. मुलांमध्ये, उंची वरून पडणे, हिंसा किंवा खेळ-संबंधित जखमांमुळे ते होऊ शकते, तर प्रौढांमध्ये, रस्त्याच्या रहदारीत अपघात (वाहन दुर्घटना) होणे, शारीरिक आघात किंवा हिंसा, पडणे किंवा खेळांच्या दुखापतीमुळे होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

ग्लासगो कोमा स्केल (जीसीएस) समावेश असलेल्या संपूर्ण क्लिनिकल तपासणीत डोक्याला लागलेल्या माराची तीव्रता समजण्यास मदत होते. जीसीएस वर कमी स्कोर अधिक गंभीर जखम दर्शवते आणि तेच जास्त स्कोर कमी तीव्रता. कधीकधी, निश्चेष्ट स्थितीमध्ये वैद्यकीय इतिहास प्राप्त करणे अवघड जाते. मेंदूच्या पेशींना झालेली हानी आणि दुखापतीचे विस्तार जाणून घेण्यासाठी काही चाचण्या अनिवार्य असतात. या चाचण्यांमध्ये समावेश आहे:

  • संगणित टोमोग्राफी (सीटी) स्कॅनः हे कवटीतले फ्रॅक्चर, रक्तस्त्राव आणि ऊतकांची सूज पाहण्यास मदत करते.
  • मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅनः सीटी स्कॅनच्या तुलनेत हे महत्त्वपूर्ण आहे आणि अधिक अचूक आहे.

सौम्य दुखापतीसाठी निग्राणी आणि  वेदनांसाठी ॲनाल्जेसिस (आइसपॅक ॲप्लिकेशनसह) वापरावे लागते, तर मध्यम आणि गंभीर जखमांना साधी औषधोपचार किंवा शस्त्रक्रिया किंवा कधीकधी आपत्कालीन वार्डमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असते.

डोक्याच्या माराच्या उपचारांमध्ये खालील समाविष्ट आहे:

  • अँटी सेझर मेडिकेशन: दौरा हे डोक्याला मार लागण्याचे एक सामान्य लक्षण आहे आणि मेंदूला हानी पोहोचवू शकते, अशा प्रकारे अँटी सेझर मेडिकेशन मोठ्या प्रमाणात मदत करतात.
  • ड्यूरेटिक्स: काही प्रकारचे डोके दुखणे मेंदूच्या आसपास सूज निर्माण करतात; ड्यूरेटिक्सचा वापर हा सूज कमी करू शकतो आणि दाबांच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करतो.
  • कोमा-इंड्यूसिंग ड्रग्स: जेव्हा मेंदू स्वत: ची पुनर्प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा ते अतिरिक्त ऑक्सिजन वापरण्यास सुरुवात करते. तथापि, रक्तवाहिन्या प्रभावित झाल्यामुळे, त्यास पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही, आणि याचा परिणाम म्हणजे मेंदूच्या पेशींचा पुढील दुखापत आणि मृत्यू होऊ शकतो. म्हणून, पुढील दुखापती टाळण्यासाठी, कोमा-प्रेरित करणाऱ्या औषधे मस्तिष्क पेशींचे कार्य अस्थायीपणे कमी करण्यासाठी वापरली जातात.

डोक्याच्या मारासाठी सर्जिकल उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समाविष्ट आहे:

  • कवटी फ्रॅक्चर दुरुस्त करणे.
  • रक्तस्त्राव होत असलेल्या माराला टाके घालणे.
  • मेंदूवरील दबाव मुक्त करण्यासाठी कवटीत एक खिडकी तयार करणे.

शस्त्रक्रिया आणि औषधे वगळता, मेंदूच्या नुकसानीमुळे प्रभावित झालेल्या मेंदू आणि अवयवांचे कार्य सुधारण्यासाठी पुनर्वसन करणे आवश्यक आहे.

पुनर्वसन मध्ये फिजिओथेरपी, व्यावसायिक उपचार, सल्ला आणि रिक्रिएशन थेरपीचा समाविष्ट आहे.



संदर्भ

  1. National Health Service [Internet] NHS inform; Scottish Government; Severe head injury.
  2. The Neurological Institute of New York. [Internet]. Columbia University, New York; Head Injury.
  3. Kasper DL, et al., eds. Concussion and Other Traumatic Brain Injuries. In: Harrison's Principles of Internal Medicine. 19th ed. New York, N.Y.: McGraw-Hill Education; 2015
  4. Bramlett HM, et al.Long-Term Consequences of Traumatic Brain Injury: Current Status of Potential Mechanisms of Injury and Neurological Outcomes. Journal of Neurotrauma. 2015;32:1834
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Symptoms of Traumatic Brain Injury (TBI).

डोक्यावर मार लागणे साठी औषधे

Medicines listed below are available for डोक्यावर मार लागणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.