हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी काय आहे ?
एन्सेफॅलोपॅथी हा एक त्रास किंवा मेंदूच्या कार्यप्रणालीतील घट दर्शवते ज्यामुळे मानसिक गोंधळ आणि स्मृती नष्ट होते. हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीमध्ये दीर्घकालीन यकृत रोग किंवा यकृत निकामी पडल्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये घट होत असते. लिव्हर सिरॉसिस (दीर्घकालीन यकृताचे नुकसान, अपरिवर्तनीय यकृताच्या जखमेची खूण आणि यकृताच्या कार्यात मोठ्या प्रमाणावर घट) असलेल्या व्यक्तींमध्ये हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी सर्वात सामान्यपणे बघितली जाते.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?
हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीचे सामान्य चिन्हे आणि लक्षणं खालील प्रमाणे आहेत:
- स्मृती भ्रंश.
- लक्ष केंद्रित करण्यात समस्या.
- वाढलेली चीडचीड.
- गोंधळ.
- समन्वय समस्या.
- कमी झालेली सतर्कता.
- अस्पष्टपणे मूड बदलणे.
- वेळ आणि स्थानाचे वाईट समीक्षण.
वरील लक्षणांसोबत इतर न्यूरोलॉजिकल लक्षणे देखील असू शकतात जसे की:
- झटके येणे.
- बोलण्यात अडथळा (अस्पष्ट उच्चरण.)
- थरथरणे.
- अनैच्छिक हिसका (लचक).
- डोळ्याची अनैच्छिक हालचाल.
- स्नायूंचा कमजोरपणा.
यकृत गंभीरपणे क्षतिग्रस्त असल्याने, यकृत रोगाशी संबंधित इतर लक्षणे देखील व्यक्तीला जाणवू शकतात.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीचे प्राथमिक कारण हे दीर्घकालीन लिव्हरचे निकामी पडणे आहे. हे बहुतेकदा लिव्हर सिरॉसिस असलेल्या व्यक्तींमध्ये बघायला मिळते किंवा त्या लोकांमध्ये जे दीर्घकालीन अतिप्रमाणात मद्यपान करतात किंवा हेपॅटायटीस बी किंवा सी चा संसर्ग असतो. या समस्यांमुळे, यकृत विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकण्याचे कार्य करू शकत नाही. रक्तातात हे विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो ज्यामुळे मानसिक कार्यक्षमता आणि न्यूरोसायकेट्रिक लक्षणे बदलली जातात.
हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथी हा अनुवांशिक रोग नाही आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीचे निदान करण्यासाठी, डॉक्टर कोणतेही इतर कारणं निरुपयोगी करण्यासाठी लक्षणांबद्दल आणि रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल विचारणा करतील. निदान करण्यासाठी इतर तपासण्या आशा असू शकतात:
- विषारी पदार्थाची उपस्थिती ओळखण्यासाठी आणि यकृताच्या आरोग्याची स्थिती तपासण्यासाठी रक्त तपासणी.
- सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ-CSF) मधील कोणतेही जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग शोधण्यासाठी स्पाइनल टॅप (लंबर पंक्चर) चाचणी.
- मेंदूविषयक रचनांचे आकलन करण्यासाठी इमेजिंग अभ्यास जसे कंप्युटराईज्ड टोमोग्राफी (सीटी-CT) स्कॅन आणि मॅग्नेटिक रेसोनान्स इमेजिंग (एमआरआय-MRI).
हेपॅटिक एन्सेफॅलोपॅथीच्या उपचारांमध्ये औषधे तसेच आहारविषयक बदल समाविष्ट असतात.
अनैच्छिक स्नायूंच्या हालचाली कमी करण्यासाठी आणि रक्तात विषारी पदार्थाचा स्तर कमी करण्यासाठी औषधे लिहून दिली जातात. हेपॅटिक एनसेफॅलोपॅथी उपचार करण्यायोग्य आहे आणि योग्य वैद्यकीय समुपदेशनासह परत येऊ शकतो. पण, हिपेटिक एन्सेफॅलोपॅथी प्रामुख्याने क्रॉनिक लिव्हर हानी असलेल्या व्यक्तींमध्ये पाहिली जाते, तेव्हा स्थिती पुन्हा परत येऊ शकते. परत येण्याचे टाळण्यासाठी, डॉक्टरांनी प्रोफेलेक्टिक उपचार निर्धारित केले जाऊ शकतात.