हर्सुटिज्म काय आहे ?
महिलांमध्ये जेव्हा अतिरिक्त केसांची वाढ होते अशा परिस्थीला हर्सुटिज्म म्हणतात. हे कोणत्याही वयाच्या महिलांमध्ये होऊ शकते, त्यामुळे सामाजिक, मानसिक आणि आत्मविश्वासामध्ये कमी असे प्रश्न निर्माण होऊ शकतात.
ही परिस्थिती खूप सामान्य आहे आणि जगातील 5 ते 10% लोकसंख्या ह्या रोगाने प्रभावित आहे.
याच्याशी संबंधित खुणा आणि लक्षणं काय आहेत?
किशोरावस्थेच्या सुरवातीला हर्सुटिज्म चे लक्षणे दिसू लागतात. मुख्य लक्षण म्हणजे महिलांमध्ये पुरुषांप्रमाणे केसांची वाढ होणे. पुढे, ह्या परिस्थितीला डोक्यातील केसांप्रमाणे केसांची वाढ होताना दिसून येते:
- ओठांच्या वरचा भाग.
- कल्ले.
- हनुवटी.
- निप्पल्स च्या बाजूला.
- पोटाच्या खालच्या भागाला.
हर्सुटिज्म मध्ये इतर सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहे:
- तेलकट त्वचा.
- कपाळावर टक्कल पडणे.
- मुरूम.
- अनियमित मासिक पाळी.
- मोठा आवाज.
- क्लीटोरीस मध्ये बदल होणे.
- वंध्यत्व.
तरीही, काही प्रगत केसेस मध्ये, पाठीचा वरचा भाग, छातीचा मधला भाग, आणि पूर्ण पोटाचा किंवा वरच्या भागावर केसांची वाढ होते.
याची मुख्य कारणं काय आहेत?
महिलांमध्ये अँड्रोजेन ची अतिरिक्त पातळी हे हर्सुटिज्म चे मुख्य कारण आहे. त्यापेक्षा इतर कारणे खालील प्रमाणे आहे:
- पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम (पीसीओस) आणि लठ्ठपणा.
- रजोनिवृत्ती आणि त्याच्याशी संबंधित हार्मोनचे असंतुलन.
- औषधे.
- ॲड्रेनल हायपरप्लेसिया.
- कशिंग सिंड्रोम.
- थायरॉईड काम न करणे.
- काही दुर्मिळ परिस्थितीमध्ये, अँड्रोजेन - सोडणारे ट्यूमर्स हर्सुटिज्म चे कारण बनू शकते.
याचा निदान आणि उपचार काय आहे?
हर्सुटिज्म चे निदान करण्यासाठी प्रथम रुग्णाची वैद्यकीय माहिती आणि पूर्ण शारीरिक तपासणी केली जाते आणि अल्ट्रा साउंड स्कॅन करून अंडाशयाची तपासणी केली जाते. निदानाची खात्री करण्यासाठी अँड्रोजेन च्या पातळीची तपासणी केली जाते.
ज्या महिलांमध्ये जास्तीचे केस आले आहे त्या खालील सौन्दयवर्धक पद्धतीचा वापर करू शकतात. त्या खालील प्रमाणे आहे:
- ब्लिचिंग.
- शेविंग.
- वॅक्सिन्ग.
- प्लकिंग.
- इलेकट्रोलिसीस.
- नको असलेले केस काढून टाकणारे औषध.
- लेजर पद्धती.
प्लकिंग हे हर्सुटिज्म ला कमी वेळासाठी नियंत्रण करणारी थेरपी आहे आणि लेसर उपचारपद्धती मूळे नको असलेले दिसणारे केस जास्त वेळासाठी काढून टाकता येण्याचा खात्रीशीर उपाय आहे.
इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन असणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या अँड्रोजेन हार्मोन चा परिणाम कमी करतात आणि त्याची प्रगती कमी करते.
काही गंभीर आणि मध्यम रुग्णांचा उपचार करण्यासाठी डॉक्टर अँटी- अँड्रोजेन चा वापर करू शकतात. इतर पर्याय खालील प्रमाणे आहे:
- एफ्लोर्निथिन क्रीम.
- सायप्रोटेरोन ऐसिटेट.
- फ्लूटामाईड.
- फिनॅस्टरीड.