हायपरकॅल्शेमिया (रक्तात कॅल्शियमचा उच्च स्तर) काय आहे ?
हायपरकॅल्शेमिया हा सुधारित संपूर्ण सीरम कॅल्शियम मूल्याचा संदर्भ देतो जो सामान्य पातळीपेक्षा किंवा रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेल्या आयोनाईज्ड कॅल्शियमपेक्षा जास्त असतो. सामान्य लोकसंख्येपैकी हायपरकॅल्शेमिया 0.5% ते 1% लोकांना प्रभावित करते. शरीरात कॅल्शियमचे जास्त प्रमाण हृदय, किडनी आणि मेंदूसारख्या महत्वाच्या अवयवांवर परिणाम करतं आणि हाडांच्या कमकुवतपणासाठी देखील कारणीभूत ठरतं.
त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत ?
सामान्य लक्षणे:
- चेता संस्था (सेंट्रल नर्व्हस सिस्टम): स्ट्युपर, सुस्तपणा, कोमा, मानसिक बदल, सायकोसिस.
- पाचन तंत्र: एनोरेक्झिया, ॲसिड पेप्टिक रोग, बद्धकोष्ठता, पॅन्क्रेटाइटिस.
- किडनी: नेफ्रोलिथियासिस, पॉलीयुरिया.
- मस्कुलोस्केलेटल सिस्टम: आर्थरग्लिया, मायलगिया.
- व्हॅस्क्युलर सिस्टम: उच्च रक्तदाब.
कधीकधी गंभीर लक्षणे दिसतात यात खालील समाविष्ट असू शकतात :
- सायनस अरेस्ट.
- हृदयाच्या संचालनात अडथळे.
- मायोकार्डियल इन्फेक्शनचे अनुकरण करणारी लक्षणे.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
हायपरकॅल्शेमियाच्या सामान्य कारणांमध्ये समावेश होतो :
- पॅराथायरॉईड ग्रंथी वाढल्यामुळे तिचे जास्त प्रमाणात क्रियाशील होणे.
- पॅराथायरॉईड ग्रंथींपैकी एका पॅराथायरॉईड ग्रंथीची वाढ झाल्याने पॅराथायरॉईड हार्मोनचे जास्त प्रमाणात उत्पादन.
इतर कारणं:
- कर्करोगाचा हाडांपर्यंत रोगसंसर्गासोबत फुफ्फुसे आणि स्तनाचा कर्करोग सारखे कर्करोग.
- क्षयरोग आणि सारकोइडॉसिस सारखे रोग.
- अनुवांशिक घटक.
- कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पूरक, लिथियम आणि डाययुरिक औषधांचे जास्त प्रमाणात सेवन.
- शरीराची कुठलीही हालचाल न होणे जिथे व्यक्ती खाटेवरचं पडून असतो किंवा बरेच आठवड्यांसाठी निष्क्रिय असतो.
- दीर्घकालीन किडनी रोग.
- गंभीर निर्जलीकरण.
- पोस्टमेनोपॉझल (रजोनिवृत्ती पूर्ण झालेल्या) महिलांना हायपरकॅल्शेमिया जास्त धोका असतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
काही तपासण्यांसोबत एक नियमित रक्तचाचणी जी कम्प्लिट ब्लड काऊंट म्हणून ओळखली जाते, हायपरकॅल्शेमियाच्या निदानामध्ये मदत करते.
कोणत्याही संशयित अंतर्निहित आरोग्यविषयक स्थितीचे निदान करण्यासाठी आपले डॉक्टर अतिरिक्त चाचण्यांची शिफारस करू शकतात.
तपासण्यांमध्ये समाविष्ट आहेत:
- सीरम कॅल्शियम, पॅराथाईरॉयड हार्मोन आणि व्हिटॅमिन डी ची पातळी मोजण्यासाठीची चाचणी.
- मूत्रामध्ये कॅल्शियमची पातळी मोजण्यासाठी चाचणी.
तुमचे डॉक्टर रक्तात कॅल्शियम पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी औषधांची शिफारस करू शकतात.
प्राथमिक हायपरपॅराथायरायडिझमच्या बाबतीत, तुमची शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते.
गंभीर हायपरकॅल्शेमियामध्ये इंट्राव्हेनस फ्लूइड थेरपी आणि औषधं जसे बायफॉस्फोनेट, स्टेरॉईड्स किंवा डाययुरेटिक्स यांची आवश्यकता असू शकते.
किडनी निकामी पडल्यास तुमचे डॉक्टर डायलिसिसचा सल्ला देऊ शकतात.