हायपरकलेमिया काय आहे ?
हायपरकलेमिया ही एक सामान्य क्लिनिकल स्थिती आहे जी रक्तामध्ये असामान्य उच्च पातळीतील पोटॅशियमचा संदर्भ देते. शरीरातील मज्जातंतू आणि स्नायूंच्या कार्यसाठी पोटॅशियम आवश्यक आहे. रक्तातील पोटॅशियमच्या अति प्रमाणातील पातळीमुळे जीवघेण्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
त्याच्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
5.5 एमएमओएल(mmol) / लिटर पेक्षा जास्त पोटॅशियमचा स्तर हायपरकलेमियाचा संकेतक आहे.
या स्थितीत सामान्यत: कुठलीही लक्षणे दिसून येत नाही आणि हायपरकलेमियामध्ये काही लक्षणे दिसून येतात, जी अंतर्गत वैद्यकीय परिस्थितीत विकसित होतात:
- हृदयाचे व्यवस्थित काम न करणे, असामान्य हृदय ताल (ॲबनॉर्मल हार्ट रिदम), छातीचे धडधड सारख्या वेगवेगळ्या प्रकारे उघडकीस येऊ शकतात.
- स्नायू व्यवस्थित काम न केल्याने स्नायूंचा थकवा आणि कामजोरपणा होऊ शकतो.
- पक्षघात.
- मळमळ.
- पॅराइस्थेसिया.
याची मुख्य कारणं काय आहेत ?
- हायपरकलेमियाच्या सर्वात सामान्य कारणांमध्ये समाविष्ट आहे:
- किडनी डिसफंक्शन: अल्पकालीन किंवा दीर्घकालीन किडनी चे व्यवस्थित काम न करणे (अधिक वाचा:अल्पकालीन किडनी खराब होण्याची कारणे).
- पेशीच्या आतून व बाहेरून रेणूंच्या अदलाबदल करण्यामध्ये अपयश.
- इतर करणे:
- टाइप 1 चा मधुमेह.
- निर्जलीकरण.
- एडिसनचा रोग.
- गंभीर जखम किंवा भाजणे ज्यामुळे रक्त पेशींचे जास्त प्रमाणात तुटतात.
- बीटा ब्लॉकर्स आणि एंजियोटेंसीन-कन्व्हर्टिंग एंजाइम (एसीई-ACE) इनहिबिटरसारख्या काही औषधे देखील हायपरकलेमियाच्या वाढीव जोखमेशी संबंधित आहेत.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
हायपरकलेमियाचे निदान अनेक तपासांवर आधारित आहे :
- पोटॅशियमची पातळी मोजण्यासाठी रक्त तपासणी.
- हृदयाच्या वर्तनाचे मूल्यांकन करण्यासाठी इलेक्ट्रोकार्डियोग्राफी (ईसीजी-ECG).
- किडनी फंक्शन टेस्ट.
- मूत्र चाचणी.
- न्यूरोलॉजिकल तपासणी.
उपचार हा गंभीर्यावर आणि हायपरकलेमियाच्या कारणांवर आधारित आहे.
सौम्य हायपरकलेमिया औषधांमध्ये आणि आहारामध्ये बदल करून व्यवस्थापित केले जाते.
उपचारात्मक उपाय पोटॅशिअमला एक्स्ट्रासेल्युलर स्पेस पासून इंट्रासेल्यूलर स्पेसमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केले जाते. औषधांमध्ये समाविष्ट आहे:
- कॅल्शियम.
- इन्सुलिन.
- अल्बुटेरॉल.
- मेटॅबॉलिक ऍसिडोसिसच्या बाबतीत सोडियम बायकार्बोनेट एक संलग्न उपचार म्हणून ठरवले जाते.
अल्पकालीन हायपरकलेमियाला इंट्राव्हेनस कॅल्शियम, ग्लूकोज किंवा इंसुलिन थेरपीची आवश्यकता असेल.
महत्त्वपूर्ण चिन्हांच्या देखरेखसह हृदयाचे सतत निरीक्षण आवश्यक आहे.
कोणत्याही अंतर्भूत वैद्यकीय स्थितीवर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.
किडनी निकामी पडल्यास डायलिसिसचा विचार केला पाहिजे.