संसर्ग म्हणजे काय?
जेव्हा एखादा रोग पसरवणारे जीवाणू तुमच्या शरीरावर आक्रमण करतात, तेव्हा ते निरनिराळ्या चिन्हे आणि लक्षणांना सुरुवात करतात, ज्याला बुरशीचे संसर्ग म्हणले जाऊ शकते. संसर्गाचे कारण बॅक्टरीया, व्हायरसिया, आणि परजीवी जंतू जे बाह्य किंवा अंतर्गत असू शकते. बरेच जिवाणू खूप वेगवेगळे आजार पसरवू शकतात. संसर्ग प्राथमिक असू शकतो, जो वर्तमान शारीरिक स्थितीमुळे झालेला असेल किंवा दुय्यम असू शकतो जो पूर्वीच्या संसर्गामुळे कमी झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे किंवा एखाद्या जखमेमुळे होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे व लक्षण काय आहेत?
संसर्ग सामान्यतः होणाऱ्या जागेवर आणि संसर्गजन्य जिवाणू वर अवलंबून असतो. काही मुख्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत:
- सूज आणि लालसरपणा.
- वेदना.
- ताप.
- पोटदुखी.
- व्रण येणे.
- नाक गळणे.
- खोकला.
- हालचाल करणे कठीण जाते.
- स्मृतिभ्रंश.
याची मुख्य कारणे काय आहेत?
बॅक्टरीया, बुरशी, व्हायरस, आणि परजीवी जसे नायटा, जंत, लिखा, पिसू आणि टीक्स हे कारक जिवाणू असू शकतात. खालील दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारे संसर्ग पसरू शकतो:
- माणसा कडून माणसाला.
- प्राण्यांकडून माणसाला.
- आईकडून जन्माला येणाऱ्या बाळाला.
- दूषित अन्न व पाणी.
- किटक चावल्यावर.
- संसर्गित माणसाच्या वस्तूचा वापर केल्यावर.
- लॅट्रोजेनिक ट्रान्समिशन (संसर्गित माणसाची वैद्यकीय उपकरणे वापरणे.
- नोसोकॉमियल संसर्ग (रुग्णालयात होणारा).
याचे निदान आणि उपचार काय आहेत?
वैद्यकीय इतिहासाची तपासणी करण्यात येते व त्या नुसार निदान करून डॉक्टर कोणत्या वैद्यकीय तपासणी कराव्या लागतील याचा सल्ला देतील:
- शारीरिक तपासणी.
- मायक्रोबायोलॉजिकल तपासणी.
- लॅब टेस्टस, जसे की रक्त, मल, मूत्र, घसा, आणि मेंदू व मज्जारज मधील द्रवपदार्थ यांच्या चाचण्या.
- एक्स-रे आणि एमआरआय काढून इमेजींग चाचण्या.
- बायोप्सी.
- पीसीआर (पॉलीमियर्स चेन रिॲकशन) वर आधारित चाचण्या.
- इमयूनोअसे.
- ईएलआयएसए (एंझाईम-लिंकड इंमयुनोसोरबेन्ट ॲसे) किंवा आरआयए (रेडिओ इंमयुनो ॲसे).
एकदा संसर्गजन्य जंतूचे निदान झाले की योग्य उपचार सुरु करण्यास सोपे जाते. संसर्गा साठी खालील उपचार उपलब्ध आहेत:
- औषधे:
- अँटिबायोटिक्स.
- अँटीव्हायरल औषधे.
- अँटीप्रोटोझोअल औषधे.
- अँटीफंगल्स.
- लसीकरण.
- पर्यायी औषधे:
नैसर्गिक उपचार जसे ग्रीन टी, क्रॅनबेरीचा रस, आलं व लसूण या गोष्टी संसर्गजन्य रोगाशी लढू शकतात.
जरी नैसर्गिक उपचार, आणि पर्यायी औषध विशेषता आयुर्वेदिक औषधे संसर्गजन्य रोगावर उपलब्ध असले तरी संसर्गाचे लक्षण दिसून आले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.अँटीबायोटीक औषधांचा व्यवस्थित वापर आणि दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करून संसर्गित जंतुसंसर्गाचा प्रतिकार करण्यात येतो. प्रत्येक संसर्गा चा उपचार केलाच पाहिजे असं नाही कारण काही आपोआप बरे होतात. परंतु तीव्र संसर्गासाठी वैद्यकीय सल्ला आणि वेळीच उपचार मिळाला पाहिजे. व्यवस्थित स्वछता राखल्यास आणि योग्य काळजी घेतल्यास संसर्गा चे पसरणे टाळले जाऊ शकते.