वांझपणा किंवा नपुसंकत्व - Infertility in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

April 25, 2019

October 27, 2020

वांझपणा किंवा नपुसंकत्व
वांझपणा किंवा नपुसंकत्व

वांझपणा किंवा नपुसंकत्व काय आहे?

वांझपणा किंवा नपुसंकत्व ही अशी परिस्थिती आहे ज्यात एक दांपत्य कोणत्याही उपायांचा वापर न करता एक वर्ष प्रयत्न केल्यानंतर बाळाला जन्म देऊ शकत नाही किंवा स्त्री गर्भधारणेस सक्षम नसते. काही प्रसंगी, एखाद्या स्त्रीला गर्भधारणा तर होते परंतु कॉम्प्लिकेशन होतात, जसे की गर्भपात किंवा आजारपण, हे देखील वांझपणात येते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

आपल्या वांझपणा किंवा नपुसंकत्व क्षमतेला ओळखण्यात मदत करणारी काही चिन्हे आणि लक्षणे आहेत ज्यात खालील बाबींचा समावेश होतो.

  • अनियमित मासिक पाळी.
  • तीव्र ओटीपोटातील वेदना.
  • वर्षाभर प्रयत्न केल्यानंतरही गर्भधारणा होत नाही, तुमचे वय 35 किंवा 40 वर्षापेक्षा जास्त आहे किंवा गर्भनिरोधक पद्धतींचा वापर न करता नियमित लैंगिक संभोग करुन.
  • वारंवार गर्भपात किंवा गर्भपाताचा इतिहास.

याची मुख्य कारणं काय आहेत?

वांझपणा किंवा नपुसंकत्व काही कारणांमुळे होतो

  • महिलेत नियमित ओव्हुलेशन किंवा अभाव.
  • पुरुषात शुक्राणुंची निर्मिती आणि कार्यात समस्या.
  • महिलांमध्ये आढळणाऱ्या इतर काही सामान्य घटकांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.
    • वाढलेले वय.
    • हार्मोन किंवा पुनरुत्पादक अवयवांशी संबंधित मुद्दे.
    • बंद झालेली किंवा संकुचित फॅलोपियन नलिका  (उदा. साधारणतः संभोगातून संक्रमित संसर्ग किंवा एंडोमेट्रियोसिसमुळे).
    • थायरॉईड किंवा पिट्यूटरी ग्रंथीची अयोग्य कार्यप्रणाली.
  • पुरुषांमधील नपुसंकत्वासाठी खालील सामान्य घटक कारणीभूत असतात.
    • शुक्राणूवाहू नलिकेत अडथळा असणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सर्व चिन्हे आणि लक्षणे विचारात घेतल्यानंतर, वैद्यकीय तपासणी, शारीरिक तपासणी करणे आणि संशयास्पद निदानाची पुष्टी करण्यासाठी खालील तपासण्या केल्यानंतर डॉक्टर वांझपणा किंवा नपुसंकत्वाचे निदान करू शकतात:

  • रक्त तपासणी.
    • प्रोजेस्टेरॉन तपासणी (स्त्रीच्या मासिक पाळीच्या दिवसात सुमारे 23व्या दिवशी)
    • फॉलिकल-उत्तेजक हार्मोन (FSH)
    • अँटी-मुलेरियन हार्मोन (AMH)
    • थायरॉईड फंक्शन टेस्ट
    • प्रोलॅक्टिन लेव्हल टेस्ट
    • ओव्हेरियन रिसर्व्ह डिटेक्टिंग टेस्ट
  • मूत्र तपासणी.
  • इमेजिंग टेस्ट आणि प्रक्रिया.
    • अल्ट्रासाऊंड
    • हिस्टेरोसॅल्पिंगोग्राफी
    • सोनोहायस्टेरोग्राफी
    • हायस्टरोस्कोपी
    • लॅप्रोस्कोपी
  • वीर्य विश्लेषण.

वांझपणा किंवा नपुसंकत्वासाठी खालील विविध उपचार पद्धतीचा वापरल्या जातात.

  • लैंगिक शिक्षण.
  • एग डेव्हलपमेंट आणि ओव्ह्युलेशन प्रेरित करू शकणारी औषधे, ज्यात गोनाड्रॉपिन इंजेक्शन आणि क्लॉमिफिन सायट्रेट गोळ्यांचा समावेश असतो.
  • चल बीजाणू शुक्राणूंची उच्च सांद्रता प्राप्त करण्यासाठी गर्भाधान, आणि हे गर्भाशय धुऊन थेट गर्भाशयाच्या पोकळीत ठेवून केले जात.
  • इन व्हिट्रो फर्टिलाइझेशन (आयव्हीएफ), ज्यात अंडी शरीराच्या बाहेर शुक्राणूद्वारे फलित केले जातात.
  • सरोगेसी ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीकडून शुक्राणु किंवा स्त्रीबीज दान केले जातात जे गर्भ वाहण्यास सज्ज असते.
  • शस्त्रक्रियेमध्ये पोटाच्या मायोमेक्टॉमीचा वापर करून गर्भाशयाचे फायब्रॉइड काढून टाकले जातात.

 



संदर्भ

  1. American College of Obstetricians and Gynecologists. Evaluating Infertility. Washington, DC; USA
  2. National Institutes of Health. How is infertility diagnosed?. Eunice Kennedy Shriver National Institute of Child Health and Human Development. [internet].
  3. Mentalhelp. Introduction to Infertility. American addiction center. [internet].
  4. MedlinePlus Medical: US National Library of Medicine; Infertility
  5. University of California. Infertility. Los Angeles. [internet].

वांझपणा किंवा नपुसंकत्व साठी औषधे

Medicines listed below are available for वांझपणा किंवा नपुसंकत्व. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.