इन्फ्लॅमेटरी बाउल डिझीज (आयबीडी) काय आहे?
इन्फ्लॅमेटरी बाउल डिझीज (आयबीडी) हा पाचन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (जीआय) मार्गाचा दीर्घकाळचा विकार असून इन्फ्लमेशन किंवा सूज आणि नंतर जन्मभर त्रास देणारा रोग आहे. दीर्घ कालावधीसाठी येणाऱ्या सूजमुळे जीआयच्या ट्रॅक्टचे नुकसान होऊ शकते. आयबीडीमुळे क्रॉनचा रोग आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस या दोन प्रकारचे सूजणे दिसून येते. मोठे आतडे मुख्यत्वे अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये प्रभावित होतात आणि तोंडातून गुदद्वारापर्यंत कोणताही भाग क्रॉनच्या रोगाने प्रभावित होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बहुतेक, 15 ते 40 वर्षांच्या वयोगटातील व्यक्तींमध्ये आयबीडी जास्त प्रमाणात आढळते. व्यक्तीपरत्वे रोगाची लक्षणे भिन्न असू शकतात. काही लक्षणांचा उल्लेख खालील केला आहे :
- पोटात कळा किंवा वेदना.
- वजन कमी होणे.
- थकवा.
- रक्ताच्या किंवा पस सह वारंवार होणारे जुलाब.
- शौचास घाईने होणे.
- रोग असतांना ताप.
जरी आयबीडीचा त्रास टिकून राहणारा असला, तरी लक्षणे सामान्यतः सूज येण्याच्या प्रमाणावर अवलंबून येतात आणि जातात. सूज गंभीर असतांना, रोग सक्रिय चरणात असतो आणि जेव्हा सूज कमी होते तेव्हा रोगाची सौम्य लक्षणे दिसतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
आयबीडीचे खरे कारण अज्ञात आहे, परंतु खालील गोष्टी आयबीडी च्या त्रासामागीर कारण मानले जातात.
- अनुवांशिक
आईबीडीचा कौटुंबिक इतिहास असल्यास या रोगामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. - कमकुवत रोग प्रतिकारक शक्ती
सहसा, आपले शरीर विषाणू किंवा जिवाणूसारख्या बाहेरुन प्रवेश करणाऱ्या जीवांवर हल्ला करते. जेव्हा पर्यावरणातील किंवा इतर घटकांऐवजी प्रतिरक्षा प्रणाली शरीराच्या टिश्यूविरूद्ध कार्य करते तेव्हा जीआय ट्रॅकला सूज येते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
शारीरिक तपासणी आणि तपशीलवार इतिहास घेण्याव्यतिरिक्त, आयबीडीचे सामान्यतः एन्डोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी आणि एमआरआय, सीटी स्कॅन आणि कॉन्ट्रास्ट रेडियोग्राफी समवेत इमेजिंग अभ्यासांद्वारे निदान केले जाते. निदानाची खात्री करण्यासाठी मल तपासणी आणि रक्त तपासणी केली जाते.
उपचारांचा मुख्य हेतू सूज कमी करणे आणि लक्षणांपासून मुक्तता देणे हा असतो. एकदा नियंत्रणात आल्यानंतर, पुन्हा होऊ नये म्हणून औषधे चालू ठेवून हे कायमस्वरूपी नियंत्रणात ठेवता येते. याला मेंटेनन्स ट्रीटमेंट म्हणतात. गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते.