डोके खाजवणे म्हणजे काय?
डोक्याला खाज येणे ही एक सामान्य तक्रार आहे. याचे कारण सहसा लवकर समजून येत नसल्यामुळे रुग्ण आणि चिकित्सक दोघांसाठी ही परिस्थिति त्रासदायक ठरते. केस गळणे किंवा डोक्यात जखमा असणे किंवा नसणे यावर याचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते.
याच्याशी संबंधित चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
डोक्याला खाज येणे हेच एक लक्षण आहे. याच्या बरोबरीने इतरही चिन्हे आणि लक्षणे दिसून येतात जसे की:
- डोक्याच्या कातडीला सूज येणे.
- कोंडा.
- केसात उवांची अंडी असणे.
- लालसर चट्टे.
- स्केलिंग.
- पस किंवा क्रस्टिंग.
याची प्रमुख कारणे काय आहेत?
पुढे दिलेली कारणे डोक्याला खाज येण्यासाठी कारणीभूत असतात:
- त्वचाविकारांशी संबंधित जसे डोक्याच्या कातडीवर होणारा फंगल संसर्ग, सोरायसिस, एक्झीमा आणि इतर.
- केसात उवा होणे.
- न्यूरोपॅथिक, मज्जातंतुंच्या डिसोर्डर्समुळे होणारे.
- सिस्टमिक आजार जे संपूर्ण शरीरावर परिणाम करतात जसे की लूपस.
- सायकोजेनिक / सायकोसोमॅटिक, जे मानसिक (मानसिक गुंतागुंतीच्या घटकांमुळे शरीरावर परिणाम करणारे) आजारांशी संबंधित असतात.
याचे निदान आणि उपचार कसे करतात?
SCALLP हे अक्रोनिम डोक्यात येणार्या खाजेच्या पुढील दिलेल्या परिस्थितिमध्ये उपयोगी पडते. डोक्याच्या कातडीची तपासणी करण्याच्या 5 पायर्या आहेत. त्या म्हणजे:
- ऐका(लिसन): रुग्णाचा पूर्वेतिहास काळजीपूर्वक ऐकून घेणे.
- बघा(लूक): बाधित भागांची व्यवस्थित तपासणी करणे.
- स्पर्श(टच): डोक्याच्या त्वचेला स्पर्श करून तिचे टेक्श्चर तपासणे.
- मॅग्निफाय: डोक्याच्या त्वचेचा भाग सूक्ष्मदर्शकाखाली पहाणे.
- नमुना मिळवणे(सँपल कल्केशन): काही प्रकरणांमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली तपासणीसाठी त्वचेचा नमुना घेतला जातो ज्यामुळे निदान करणे सोपे होते.
डोक्यावर होणार्या खाजेवर उपचार पुढीलप्रमाणे आहेत:
- जेंव्हा हे जुनाट फोलिक्युलायटीस किंवा कोरड्या त्वचेमुळे किंवा पुरळामुळे झाले असेल तेंव्हा टेट्रासायक्लीन (डॉक्सीसायक्लीन, मिनोसायक्लीन), पीएआर-2 अॅन्टीबॉडीज किंवा अॅन्टागोनीस्ट्स वापरले जातात.
- जेंव्हा हे सोरायसिस, सेबोर्हीक डर्माटायटीसमुळे होत असेल तेंव्हा अॅन्टी-हिस्टामाइन्स वापरले जातात.
- डोक्याच्या त्वचेच्या नायट्यावर उपचार म्हणून अॅन्टीफंगल औषधे सुचवली जातात.
- डोक्याच्या त्वचेवरील गजकर्ण आणि सोरायसिसवर उपचार म्हणून लोकल स्टेरोइड्स वापरली जातात.
- न्यूरोपथिक खाजेमध्ये टॉपिकल कॅनॅबिनॉइड रिसेप्टर अगोनिस्ट्स उपचार म्हणून वापरली जातात.
- केसातील उवांवर टॉपिकल परमेथ्रीन असलेल्या शॅम्पू किंवा द्रव पदार्थांची जे उवा आणि त्यांची अंडी मारतात गरज असते.