जबडा दुखणे म्हणजे काय?
टेम्पोरोमंडिब्युलर सांधे आणि त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या वेदना, एकतर जबड्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंना, याला जबडा दुखणे म्हणून संबोधले जाते. हे तीव्र किंवा दीर्घकालीन असू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जबडा दुखण्याशी सहसा खालील लक्षणांचा समावेश असतो:
- डोकेदुखी.
- जबड्याची कोमलता.
- चावतांना किंवा तोंड उघडतांना वेदना.
- कानात किंवा कानाच्या आसपास किंवा कानशीलात वेदना.
- जबड्यांच्या हालचाली वेगवेगळे आवाज करतात जसे की क्लिकिंग, पॉपिंग किंवा ग्राइंडिंग.
- तोंड उघडताना जबडा लॉक होणे.
- यामुळे क्वचितच चेहऱ्याच्या वेदना होऊ शकतात.
- हृदयाशी संबंधित परिस्थितीच्या बाबतीत, छातीत व जबड्यात वेदना, मान, पाठ, हात किंवा मळमळी सहीत पोटात वेदना,श्वास घेण्यात त्रास, डोक्यात हलकेपणा किंवा थंड घाम येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सर्वसामान्यपणे जबडा दुखण्याची खालील कारण असतात:
- इजा.
- संसर्ग.
- दातदुखी किंवा दात घासणे.
- सायनस-संबंधित समस्या.
- पीरियंडॉंटल लिगामेंट रोग.
- संधिवाता सारखी स्थिती.
- टेम्पोरोमंडिब्युलर सांधे किंवा इतर जबड्यांशी संबंधित समस्या.
- हार्ट ॲटॅकसारखी हृदयाशी संबंधित परिस्थिती.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
जबडा दुखण्याचे निदान आणि कारण निश्चित करण्यासाठी डॉक्टर लक्षणांचा पूर्ण इतिहास घेतात. यानंतर खालील तपासण्यांची शिफारस केली जाऊ शकते:
- संधिवाताचे निदान करण्यासाठी, इम्यूनोलॉजिकल रक्त तपासणी, मूत्र तपासणी, बायोप्सीज (स्नायू, मूत्रपिंड आणि त्वचा), आणि सांधे द्रव तपासणी (जॉईंट आस्पिरेशन किंवा वेदनांपासून आराम) केल्या जाऊ शकतात.
- इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ईसीजी), इकोकार्डिओग्राफी (2 डी-इको), आणि अँजीओग्राफी हे हृदयविकाराचे आकलन करण्यासाठी केले जाऊ शकते.
- टेम्पोरोमंडिब्युलर सांध्यांचा एक्स-रे (टीएमजे विकार), छातीचा एक्स-रे (हृदय विकार) आणि एका दाताचा किंवा पूर्ण तोंडाचा एक्स-रे (सिंगल टूथ किंवा पिरियोनॉन्टल समस्या) यांच्या एक्स-रे संबंधित क्रमांचे निदान करण्यासाठी केले जाऊ शकते.
- कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी स्कॅन), मॅग्नेटिक रिसोनन्स इमेजिंग (एमआरआय) आणि स्किन्टीग्राफी (हाडाचे स्कॅन) या तपासण्या टेम्पोरोमंडिब्युलर सांधे बाबतीत करण्याचे सांगितले जाऊ शकते.
जबडा दुखण्याचे कारण शोधल्यानंतर, त्याचे खालीलप्रमाणे उपचार केले जातात:
- सांधेदुखी पासून आराम मिळण्यासाठी व्यायाम.
- अँटिबायोटिक्स- जर इन्फेक्शन हा वेदनेचा स्रोत असेल तर.
- वेदना दाहामुळे होत असल्यास दाह शामक औषधे.
- स्नायू अकडले असल्यास स्नायुसंकुचन शिथिल करण्यासाठी औषधे.
- जर दुखण्याचे कारण दात असेल तर रूट कॅनल थेरपी किंवा किडलेला दात काढणे.
- माऊथ प्रोटेक्टर - टेम्पोरोमंडिब्युलर सांध्यांचे सदोष कार्य.
- पेरीओडॉन्टल त्रासाच्या बाबतीत पेरीओडॉन्टल उपचार (अधिक वाचा: पेरीओडॉन्टायटीस उपचार).
- कार्डियाक उपचार - जेव्हा हृदयाशी संबंधित वेदना असतील.