सारांश
कोणत्याही व्यक्तीच्या उतारवयात किंवा इतर शब्दांत म्हटल्यास वाढत्या वयात, गुडघे दुखणें ही साधारण बाब आहे. गुडघे दुखणें म्हणजे विश्रांती करत असतांना, चालतांना किंवा दैनंदिन कृती करत असतांना गुडघ्याच्या सांध्यामध्ये जाणवणारी वेदना. बहुतांश वेळा, तिचे कारण तंतूच्या वाढीव अशक्ततेमुळे शेजारील तंतूंना झालेली हानी असे असते. या कारणाशिवाय, गुडघे दुखणें अपघातात्मक इजा किंवा गुडघ्याच्या सांध्याच्या अतिशय वापरामुळेही होऊ शकते. गुडघे दुखण्याचे निदान व्यक्तीच्या संपूर्ण वैद्यकीय इतिहास, रक्तचाचणी आणि क्षकिरण आणि अल्ट्रासोनोग्राफी यांसारख्या काही रेडिओलॉजिकल चाचणींच्या आधारे डॉक्टरांद्वारे सहज केले जाऊ शकते. गुडघे दुखण्यावर उपचार या वेदनेमागील अंतर्निहित कारणाला हाताळून केले जाऊ शकतात उदा. लठ्ठ व्यक्तींमध्ये वजन कमी करणें. सोबत लक्षणात्मक उपचार उदा. आइस पॅक लावणें आणि विश्रांती हे सुद्धा दिले जातात. यावरील इतर उपचार पर्यायांमध्ये फिझिओथेरपी आणि एक्युपंचराचाही सल्ला दिला जाऊ शकतात. गुडघे दुखणें या उपचारानंतरही टिकून राहत असल्यास, शस्त्रक्रियेची गरज देखील पडू शकते. गुडघे दुखण्यावरील उपचारात प्रगती झपाट्याने होते, पण यामागील कारणाचे निदान डॉक्टरांना वेळेवर न झाल्यास, वेदनेत बिघाड किंवा गुडघ्याचा सांधा पूर्णपणें खराब होणें असे होऊ शकते. गुडघ्याचा सांधा विविध शारीरिक हालचाली उदा. चालणें, पळणें, एखादा खेळ खेळणें आणि दैनंदिन कामांसाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. म्हणून, गुडघ्याची कायमस्वरूपी क्षती टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घेणें हितावह आहे.