शिसेमुळे विषबाधा होणे म्हणजे काय?
शिसा, जे सामान्यतः आपल्या पर्यावरणात असते, शरीरात गेल्याने शिसेमुळे विषबाधा होते. जरी विकसित देशांनी शिसेच्या वापर नियंत्रित करायला नियम बनवले असतील, तरी अजूनही विकसनशील देशांमध्ये याचा उपयोग केला जातो. असे दिसून येते की मुलांच्या खेळण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पेंट्समध्ये शिसे असते यामुळे प्रौढांपेक्षा मुले शिसेच्या संपर्कात जास्त येतात. आकडेवारीनुसार शिसेमुळे विषबाधा, सर्व विषारी रसायनांच्या प्रकरणांच्या सुमारे 0.6% प्रकरणात आढळते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
शरीरात, सामान्यतया वारंवार संपर्काच्या माध्यमातून शिसे हळू हळू साचत असते. जेव्हा त्याचे रक्तामधील प्रमाण वाढते, यामुळे क्रोनिक लक्षण, कोमा आणि घातक प्रतिक्रिया असे परिणाम दिसू शकतात. लहान मुलांनामध्ये विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे त्यांच्या मेंदू आणि तंत्रिका तंत्राचा विकासामध्ये अडचण येऊ शकते.लीड विषबाधाच्या नैदानिक स्वरुपांमध्ये खालील समाविष्ट आहेत:
- वाढलेला रक्तदाब.
- ओटीपोटात दुखणे.
- आठवण्यात अडचणी.
- नरांमध्ये प्रजनन समस्या.
- गर्भपात.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
मुख्य पर्यावरणीय कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- रस्त्यावरची धूळ, सिमेंट बांधकाम.
- शिसेने बनलेले जुने पाण्याचे पाईप्स.
- लीड ग्लेझिंगसह अन्नपदार्थांचे डब्बे.
- स्टेशनरी वस्तू जसे पेन्सिल, शाई आणि इतर वस्तू जसे खेळणे आणि दागिने.
- काही आयुर्वेदिक उपचार.
प्रौढांमध्ये, व्यावसायिक धोके आणि वाहतुकीच्या धुरामुळे विषबाधा होऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
संपूर्ण शारीरिक तपासणी आणि इतिहासाच्या अभ्यासामुळे कारणं समजण्यास महत्त्वपूर्ण ठरू शकते. रक्तातील शिसेचे प्रमाण तपासून हे ओळखले जाते. या तपासणीमुळे संपर्काची तीव्रता कळते आणि हे मुख्यपणे मुलांकरिता केले जाते. प्रौढांमध्ये, खूप वेळापर्यंत शिसेशी संपर्क असल्यास झिंक प्रोटोपोर्फिन (ZPP) चाचणीद्वारे मोजले जाऊ शकते
प्रथम, लीड एक्सपोजर टाळणे या उपचारांचा उद्देश असतो. घरातून शिसा पूर्णपणे काढून टाकणे आणि हे एक अनुभवी माणसाकडून करून घेणे. शरीरातून लीड काढून टाकण्यासाठी मुलाला चिलेटिंग एजंट दिले जाऊ शकतात.
काही स्व-काळजीच्या टिप्स:
- शिसे असणाऱ्या सगळे जुने पाईप्स किंवा इतर नलिका सामग्री काढून टाका.
- आपले घर नियमितपणे स्वच्छ करा.
- ननियमित संतुलित आहार घ्या.
- गर्दीच्या क्षेत्राजवळ फिरू नका किंवा खेळू नका.
शिसे खूप विषारी पदार्थ आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये. पुढील कोणताही घात टाळण्यासाठी शरीरातून शिसा पूर्णपणे काढणे आवश्यक आहे.