लुपस काय आहे?
ऑटोम्यून्यून रोगात एखाद्या व्यक्तीच्या निरोगी पेशींवर आणि शरीरातील टिश्यूंवर) त्याचीच रोगप्रतिकारक प्रणाली आक्रमण करते. यामुळे शरीरातील विविध अवयव आणि शारीरिक प्रणाली जसे कि हृदय, फुफ्फुसे, त्वचा, सांधे, मूत्रपिंड, रक्तवाहिन्या आणि मेंदूला हानी पोहोचते. लुपस हा एक प्रकारचा ऑटोइम्यून रोग आहे, जो अनेक प्रकारांचा असू शकतो जसे:
- सिस्टेमिक ल्यूपस एरिथेमॅटोसस (एसएलई).
- डिस्कॉइड लुपस.
- सब-अक्यूट क्युटेनियस लुपस.
- ड्रग- इंड्यूस्ड लुपस (औषधांमुळे होणारा लुपस).
- निओनेटल लुपस.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जेव्हा लुपसची लक्षणे दिसू लागतात तेव्हा त्यांना फ्लेअर असे म्हटले जाते आणि त्याची तीव्रता, सौम्य पासून गंभीरपर्यंत बदलते. त्याच्या लक्षणांचा पॅटर्न लाटांसारखा म्हणजेच अनियमित असतो - कधी कधी अनेक महिने काहीच लक्षणे दिसत नाही (एक्झासरबेशन) आणि नंतर पुन्हा काही आठवडयांनी किंवा महिन्यांनी लक्षणे दिसू लागतात (रेमिशन). जरी लुपस ची चिन्हे आणि लक्षणे प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळी असली तरी काही सामान्य लक्षणे खाली नमूद केली आहेत :
- थकवा किंवा खूप थकल्यासारखे वाटणे.
- ताप.
- केस गळणे.
- सूर्यप्रकाशामुळे त्रास होणे.
- तोंडात अल्सरेशन होणे.
- सांधे आणि पेशींवर सूज येणे आणि सांधेदुखणे.
- दीर्घ श्वास घेताना छातीत दुखणे.
- हातापायाची बोटे निस्तेज किंवा जांभळी होणे.
- चेहऱ्यावर लाल रॅश दिसणे. याला “बटरफ्लाय रॅश” म्हणतात.
- पायावर, डोळ्याभोवती किंवा ग्रंथींवर सूज येणे.
लुपसची मुख्य कारणे काय आहेत?
लुपसची कारणे अज्ञात आहेत. पण ऑटोइम्युनिटी हे लुपसचे मुख्य कारण मानले जाते.
लुपसचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लुपसचे निदान करणे फार कठीण आहे आणि त्याच्या निदानासाठी अनिश्चित वेळ लागू शकतो (त्याचे निदान होण्यासाठी अनेक महिने किंवा वर्ष पण लागू शकतात) कारण बऱ्याचदा याच्या लक्षणांमुळे दुसरा रोग असल्याचे वाटू शकते. आजाराचे निदान करण्यापूर्वी डॉक्टर संपूर्ण मेडिकल हिस्टरी विचारतात, आणि त्याची सूक्ष्म चिन्हे शोधण्यासाठी विस्तृत शारीरिक तपासणी करतात.
निदानामध्ये मदद मिळवण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात :
- अनेक रक्त तपासण्या.
- त्वचेची बायोप्सी.
- मूत्रपिंडाची बायोप्सी.
लुपसचे उपचार कायमस्वरूपी परिणाम करत नसल्यामुळे, उपचारांचा हेतू फ्लेअर्सना टाळणे किंवा त्यावर उपचार करणे आणि अवयवांना अधिक नुकसान होण्यापासून वाचवणे हा असतो.
औषधांमुळे लुपसच्या उपचारात ही मदत मिळू शकते:
- फ्लेअर्स टाळणे किंवा कमी करणे.
- सांध्यांना होणारे नुकसान टाळणे किंवा कमी करणे.
- सूज आणि वेदना कमी करणे.
- रोगप्रतिकार यंत्रणा कार्यान्वित करणे.
- हार्मोनल बेलेन्स राखू शकणे.
गंभीर स्थिती टाळण्यासाठी, लुपस संभंधित (संबंधित) इतर समस्यांवर (इन्फेकशन, हाय कोलेस्ट्रॉल किंवा हाय ब्लड प्रेशर) देखील उपचार केले गेले पाहिजेत.