मायग्रेन - Migraine in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

December 20, 2018

April 27, 2023

मायग्रेन
मायग्रेन

सारांश

माइग्रेन एक मज्जातंत्रीय अवस्था आहे, ज्यामध्ये पुनरावर्ती, तीव्र ते सौम्य प्रकारच्या डोकेदुखींची वैशिष्ट्यपूर्ण मालिका अनुभवली जाते. माइग्रेनमुळे साधारणपणें डोक्याच्या एका बाजूला थोपटण्यासारखा त्रास होतो. हे लक्षात आले आहे की, माइग्रेनची तीव्र लक्षण असलेली व्यक्ती अंधारात, आणि अधिक करून शांत जागेत पूर्ण विश्रांती घेऊ इच्छिते. काही लोकांमध्ये माइग्रेनपूर्वी व त्यावेळी, लाइट फ्लॅश, काही ठिकाणी अंधार दिसणें, बाह किंवा पायात झिणझिण्या, आणि सोबत मळमळ आणि उलटीही येऊ शकते. माइग्रेनवर संपूर्ण औषधोपचार उपलब्ध नसले, तरी काही औषधे, जीवनशैली बदल इ. माइग्रेनची वारंवारता व तीव्रता कमी करू शकतात.

मायग्रेन काय आहे - What is Migraine in Marathi

डोकेदुखींचे अनेक प्रकार असतात, आणि त्या सर्वांमुळे गैरसोय आणि वेदनेच्या संवेदना अनुभवल्या जातात. माइग्रेनमुळे साधारणपणें डोक्याच्या एका बाजूला थोपटण्यासारखी वेदना होते आणि त्याला सर्वांत  त्रासदायक प्रकारची डोकेदुखी समजले जाते. माइग्रेनच्या रुग्णांवरील लक्षणीय संशोधन दाखवते की स्त्रियांना पुरुषांपेक्षा तीनपट अधिक माइग्रेन असतो. काही तीव्र माइग्रेनच्या झटक्यांसह, दृश्य चेतावणी चिन्हे किंवा प्रकाशाची वर्तुळे दिसतात. तुमचे चिकित्सक विशिष्ट वेळेच्या अंतराळांमध्ये, डोकेदुखीची वारंवारता आणि गहनेतेचे विश्लेषन करून माइग्रेनचे प्रकार ओळखतात. असे सांगितले जाते की, माइग्रेनचे झटके जितक्या वेळी येतात, त्यावरून त्याचे प्रकार ठरतात. काही माइग्रेन वर्षांतून एकदा, तर काही आठवड्यात खूप वेळा होतात.

तुम्हाला माहीत आहे का?

  • वारंवार माइग्रेन असलेल्या काही लोकांमध्ये अलर्जी, तणाव, प्रकाश आणि काही विशिष्ट खाद्यपदार्थांसारखी काही संप्रेरके स्वतः ठरवू शकतात, जी त्यांची डोकेदुखीची कारणे असतात.
  • अधिकतर रुग्णांना झटक्यापूर्वी एखादे चेतावणीचे लक्षण मिळते उदा. उलटी, मळमळ किंवा लाइट फ्लॅश.
  • माइग्रेन प्रभावितांपैकी बहुतांश, चेतावणीची लक्षणे ओळखून आणि तात्काळ आरामाकरिता औषधे घेऊन झटक्याची तीव्रता टाळू शकतात.
  • तीव्र झटके येणारे लोक तुळनेने कमी माइग्रेन घटना होण्याची खात्री करण्यासाठी निवारणात्मक औषधे घेऊ शकतात.
Lords L 142 Migraine & Neuralgia Drops
₹136  ₹160  15% OFF
BUY NOW

मायग्रेन ची लक्षणे - Symptoms of Migraine in Marathi

माइग्रेन बालपण, पौगंडावस्था किंवा प्रौढत्त्वाच्या सुरवातीला आरंभ होऊ शकतात. माइग्रेन असलल्या व्यक्तींना खालीलप्रमाणें काही किंवा सगळी लक्षणे अऊ शकतात

माइग्रेनची सामान्य लक्षणे

  • साधारणें एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना होणारे मध्यम ते तीव्र स्वरूपाची वेदना
  • थोपटण्यासारखा त्रास
  • शारीरिक हालचालीने वेदना अधिक तीव्र होणे
  • वेदनेमुळे दैनंदिन गतिविधींना आडा बसू शकतो
  • उलटीसह किंवा त्याविना मळमळ
  • प्रकाश व ध्वनीला संवेदनशीलता

सामान्य लाइग्रेनची लक्षणे

  • डोक्याच्या एका बाजूला थोपटण्यासारखी वेदना
  • प्रकाश,गंध व ध्वनी सहन न होणें
  • अतिशय थकवा येणें
  • मळमळ आणि उलटी
  • खाज येणे आणि मूड बदलणें
  • कामावर लक्ष न लागणें
  • हालचालीने परिस्थिती बिघडणे

वैशिष्ट्यपूर्ण माइग्रेनची लक्षणे

  • लाइट फ्लॅश किंवा नजरेत धुळसर डाग
  • बधिरता किंवा झिणझिण
  • बोलणें कठिन जाणें आणि संभ्रम
  • विस्मयकारी गंध येणे किंवा कानांत घंटी वाजण्यासारखा आवाज येणें
  • मळमळ आणि भूक न लागणें
  • अतिगंभीर प्रकरणांमध्ये संपूर्ण किंवा आंशिक दृष्टिहीनता

घातक माइग्रेनची लक्षणे

  • दिवसभर असह्य डोकेदुखी होत राहणें
  • सतत मळमळ आणि उलटी
  • दृष्टि जाणें आणि भूक न लागणें

फॅमिअल हॅमिप्लेगिक माइग्रेनची लक्षणे

  • शरिराच्या एका बाजूला पक्षाघात
  • डोके अचानक घरघरू लागणें
  • टोचण्याची किंवा भोसकण्याची संवेदना
  • धुळसर नजर आणि बोबडे बोलणें
  • स्ट्रोकसारखी लक्षणे (वेदना, उलटी,बेशुद्ध पडणे).

बेसिलर आर्टरी माइग्रेनची लक्षणे  

  • डोक्याच्या एका बाजूला अगर दोन्ही बाजूंना आकस्मिक किंवा थोपटल्यासारखी वेदना.
  • संपूर्ण किंवा आंशिक दृष्टिहीनता
  • उलटी आणि मळमळ
  • घेरी येणे, तोल जाणें आणि शुद्ध हरपणें
  • वाचा विस्कळीत पडणें
  • स्नायूंमधील समन्वय कमी होणें.
Krishnas Herbal & Ayurveda Migraine Care Juice 500ml
₹300  ₹300  0% OFF
BUY NOW

मायग्रेन चा उपचार - Treatment of Migraine in Marathi

तुम्हाला कधी माइग्रेन झाले, की तुम्हाला ते होणें टाळण्याइतकेच लक्षणे सुरु होताच थांबवणे महत्त्वाचे आहे, हे तुम्ही समजाल. म्हणून माइग्रेन उपचाराच्या दोन विभागणी असतात:

  • निवारणात्मक (होण्यापूर्वी डोकेदुखी थांबवणें) आणि
  • गंभीर/अपरिवर्तनीय (होताच डोकेदुखी थांबवणें).

निवारणात्मक उपचार 

  • जीवनशैलीतील बदल
  • औषधोपचार
  • इतर बिगरऔषध उपचार (बिगर औषधशास्त्रीय उपचार उदा. फिझिओथॅरपी, मसाज. एक्युपंक्चर किंवा किरोपॅक्टरला भेट देणें).
  • पोषक पूरक तत्त्वे (मॅग्निशिअम, सिओक्यू10 किंवा जीवनसत्त्व B2 किंवा B12)

गंभीर आणि अपरिवर्तनीय उपचार

  • सहज मिळणारी औषधे: काही मूळभूत वेदनाशामक (उदा. एस्प्रिन, आयबूप्रोफेन, नॅप्रोक्सेन आणि एसेटमिनोफेन ) आणि काही समायोजनात्मक असतात (एक्सेरिड माइग्रेन, एस्प्रिन, कॅफीन आणि एसेटमिनोफेनचे मिश्रण आहे, तर अल्का सेट्झर एस्प्रिन आणि दोन एंटॅसिड्सचे मिश्रण आहे).
  • विहित औषधे
  • पृथक्करण आणि जलीकरण (अंधारी, शांत खोलीत जाणें, पाणी पिणें आणि झोपण्याचे प्रयत्न करणें)

डॉक्टरांना कधी संपर्क करावे:

  • सहज मिळणारी औषधे आणि जीवनशैलीतील बदलांनी आराम मिळत नसल्यास
  • सहज मिळणारी औषधे दिवसातून 10 ते 15 वेळापेक्षा अधिक वेळ घेऊनही डोकेदुखीची घडण न बदलल्यास 


संदर्भ

  1. Science Direct (Elsevier) [Internet]; Brazilian Journal of Anesthesiology (English Edition)
  2. ICHD-3 The International Classification of Headache Disorders. [Internet]. International Headache Society. London, United Kingdom. Migraine.
  3. National Health Service [internet]. UK; Retinal migraine
  4. National institute of neurological disorders and stroke [internet]. US Department of Health and Human Services; Migraine Information Page
  5. US Food and Drug Administration (FDA) [internet]; Treating Migraines: More Ways to Fight the Pain

मायग्रेन साठी औषधे

Medicines listed below are available for मायग्रेन. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.