स्नायूंमध्ये वात येणे म्हणजे काय?
स्नायूंमध्ये वात येणे किंवा स्नायू आखडणे हे जेव्हा स्नायू बळजबरी आखडतो, कठीण होतो व त्याला आराम मिळत नाही तेव्हा होते. यामुळे त्या व्यक्तीला चालणे किंवा तो विशिष्ट भाग हलवणे अवघड होते. वात कोणत्याही स्नायू मध्ये येऊ शकतो, पण हे मुख्यतः पोटरी, गुडघ्या खालील भाग व पाय व पोटाच्या स्नायूंमध्ये परिणाम करतो.
याचीशी संबंधित मुख्य कारणं व लक्षणं काय आहेत?
स्नायूंमध्ये वात हा कधीही, कोणालाही, कुठेही व कोणत्याही वयात होऊ शकतो. बरीच लक्षणे दिसून येतात त्यात स्नायूंचे कठीण होणे, सांधे हलवणे कठीण होणे, काही अंतरापर्यंत हालचाल करता येणे, सामान्य पणे बसणे कठीण होणे, सांध्यांमध्ये कठीण पण येणे आणि दुर्मिळ बाबतीत, परिणाम झालेल्या सांध्यांची हालचाल कठीण होणे यांचा समावेश होतो. परीक्षण केल्यावर, जास्त तीव्रतेचा रिफ्लेक्स येतो व त्या स्नायूला स्पर्श झाल्यास वेदना होतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
स्नायूंमध्ये वात येण्याने काही विशिष्ट घटक समाविष्ट असतात. त्यामध्ये स्नायूंचा अतिवापर, वजनाचे जास्त प्रमाणात ट्रेनिंग घेणे, नियमित व्यायाम न करणे, अतिसार आणि मासिक पाळीच्या आधी काही महिलांमध्ये दिसून येणे, हे घटक समाविष्ट असतात.
स्नायूंमध्ये वात येणे हे काही ठराविक वैद्यकीय स्थितीमुळे पण दिसून येते, जसे इलेक्ट्रोलाईट चे असंतुलन, स्नायुला पुरेसा रक्त पुरवठा न होणे, मज्जातंतू चा दबाव, गर्भारपण, स्पस्टिक पॅरालिसीस, स्ट्रोक आणि दुर्मिळ पणे क्रॅब आजार (एक आजार ज्यामध्ये मज्जातंतू च्या प्रक्रियेला धोका निर्माण होतो)
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
निदान हे कोणत्याही परिणाम कारक घटकाचा वैद्यकीय इतिहास पाहून मगच केला जातो. इतिहासामुळेच उपचार कसे करावे हे लक्षात घेतले जाते व त्यामुळे कोणत्याही रक्त तपासणी ची गरज भासत नाही.
अवयव ताणून करायचे व्यायाम, मसाज, उष्णतेचे पॅड ठेवून केलेले उपचार यामुळे स्नायूंना आराम मिळतो. जर वात गंभीर असेल किंवा जास्त काळ राहणारा असेल किंवा जर अस्वस्थ करणारी भावना असेल तर उपचारांची गरज भासते. लक्षणांची तीव्रता व स्वभाव पाहून तुमचे डॉक्टर तुम्हाला काही स्नायूंना आराम देणारी, मज्जातंतू ना अडथळे निर्माण करणारी, जळजळ कमी करणारी, शाकाहारी औषधे सुचवतात. ही मुख्यतः 5 दिवस घ्यायची असतात. स्ट्रोईडस् वापरली जात नाहीत, त्यांचे परिणाम म्हणजे उष्णता, मळमळ, गोंधळात असणे,असे असू शकतात. जेव्हा औषधे मदत करत नाहीत, तेव्हा शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवला जातो आणि परिणाम झालेल्या भागावरील टेंडन काढले जाते.
स्वतः ची काळजी घेताना नियमित ट्रेनर च्या सल्ल्याने अवयव ताणण्याचे व्यायाम, जास्त घट्ट कपडे न घालणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे, आवश्यक झोप घेणे.
स्नायूंमध्ये वातचा उपचार करणे खूप महत्वाचे आहे, नाहीतर त्यामुळे स्नायूंचा कडकपणा, हलता न येणे आणि स्नायू वाया जाणे होऊ शकतो.