सारांश
मानदुखी ही एक आरोग्याशी निगडीत सामान्य समस्या आहे आणि प्रत्येक तीनपैकी एक व्यक्ती मानदुखीची तक्रार करत असते.साधारण मानेच्या स्नायूंमधील ताणासारखी ते कणाच्या तंतूंतील संप्रेषणा सारख्या गंभीर स्वरुपाची करणे यामागे असू शकतात.मणक्याचे आजार (कणाची हाडे) जसे संधिवात, मानेचा स्पॉन्डिलायटीस आणि अशा इतर अवस्थांमुळे मानदुखी होऊ शकते आणि त्वरित वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते.महिला, विशेषत: ज्यांना एकापेक्षा जास्त मुले आहेत आणि अस्वस्थ लोकांना मानेच्या दुखण्याचा त्रास लवकर होऊ शकतो.धक्का किंवा झटक्यामुळे (जो सामान्यत: अपघाताच्या वेळी बसतो) होणारा मानेचा त्रास अनेक वर्षेपर्यंत टिकून राहतो.मानदुखीवरील उपचारांचे खूप प्रकार आहेत आणि वेदनेच्या मूळ कारणांवर ते अवलंबून असतात.बऱ्याच वेळा मानदुखी एका आठवड्यात बरी होते. ती क्वचितच वर्षोनुवर्षे राहते. व्यायाम, औषधोपचार आणि शारीरिक ढब सुधारणे ही मानदुखीच्या नियोजनासाठी असलेल्या मुख्य उपचार योजना आहेत. सामान्यतः शस्त्रक्रिया करणे हा प्रथम उपचाराचा पर्याय नाही आणि सर्व पर्याय संपेपर्यंत ते टाळले जाते.गंभीर मानदुखीसाठी, बहुपयोगी दृष्टीकोनातून व्यायाम, स्नायूंची शक्ती वृद्धिंगत करण्याचे प्रशिक्षण, औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल यांचा समावेश होतो.