नॉन ॲलर्जीक राइनाइटिस काय आहे?
नॉन-ॲलर्जीक राइनाइटिस ज्याला नासिकाशोथ देखील म्हणतात तो नाकात दाह किंवा सूजे म्हणून ओळखला जातो, जो कोणत्याही ॲलर्जीक पदार्थांमुळे होत नाही. ही स्थिती विविध नॉन-ॲलर्जीक घटकांमुळे होते जसे की धूर, वातावरणातील दाबांमध्ये बदल, कोरडी वायु, संसर्ग इ. स्थितीच्या यंत्रणेमध्ये ॲलर्जीला प्रतिसाद देणे समाविष्ट नसते पण सुजेला दाह असतो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
एखाद्या व्यक्तीला नॉन-ॲलर्जीक राइनाइटिस आहे, त्यांच्या मध्ये पुढील लक्षणे दिसू शकतात:
- बंद नाक.
- नाकाच्या आत आणि सभोवती चिडचिड आणि अस्वस्थता.
- जास्त प्रमाणात शिंका.
- नाकातून पाणी वाहणे.
- वास आणि चवीच्या कमीची जाणीव.
- भूक कमी लागणे.
नाक, गळा आणि डोळ्यांमध्ये खाज सामान्यत: ॲलर्जीक राइनाइटिसमध्ये दिसून येते पण नॉन-ॲलर्जीक राइनाइटिस असलेल्या लोकांमध्ये ही लक्षणे क्वचितच प्रकट होतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
जरी या स्थितीचे अचूक कारण अस्पष्ट असेल तरी, नॉन-ॲलर्जीक राइनाइटिसमध्ये विविध नॉन-ॲलर्जीक घटकांचे योगदान आहे. या घटकांमध्ये हे समाविष्ट आहे:
- वायू प्रदूषण.
- मद्यपान.
- मसालेदार अन्न.
- आयबूप्रोफेन आणि ॲस्पिरिन सारखी काही औषधे.
- ड्राय वातावरण.
- परफ्युम आणि ब्लिचिंग एजंटचा मजबूत गंध.
- बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन्स.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
डॉक्टर स्थिती ओळखण्यासाठी पुढील एक किंवा अधिक निदानात्मक उपाय वापरू शकतात:
- शारीरिक तपासणी.
- स्थितीमुळे उद्भवणाऱ्या ॲलर्जी ची ओळख करण्यासाठी त्वचा तपासणी. हे ॲलर्जीक राइनाइटिस बाहेर काढण्यात मदत करते.
- इम्यूनोग्लोबुलिन ई च्या पातळीचा शोध घेण्यासाठी रक्त तपासणी, जी ॲलर्जीच्या प्रतिक्रियेत प्रतिरक्षा प्रणालीद्वारे उत्पादित अँटीबॉडी आहे. संपूर्ण रक्त गणना (कम्प्लिट ब्लड काऊंट सीबीसी-CBC) रक्ता मध्ये इसोफिल गणना (एक प्रकारचा पांढऱ्या रक्त पेशी) निश्चित करण्यात मदत करेल, जे ॲलर्जीचे आणखी एक संकेतक आहे. म्हणूनच, रक्त तपासणीमुळे ॲलर्जीक रीॲक्शन बाहेर करण्यात मदत होईल.
नॉन-ॲलर्जीक राइनाइटिसचा उपचारामध्ये, कारणीभूत लक्षणांपासून दूर राहणे आणि त्यातून बचाव करणे समाविष्ट आहे.
- जर औषध हे कारण असेल तर डॉक्टर काही वैकल्पिक औषधे लिहून देतील.
- नॅझल डिकंजेस्टन्टच्या जास्त वापरामुळे स्थिती उद्भवल्यास, याचा वापर करणे थांबवा.
- खारट द्रावणाने (सलाईन सोल्युशन) नाक स्वच्छ करण्यासाठी नॅझल इरीगेशन.
- कॉर्टिकोस्टेरॉईड, डिकंजेस्टन्ट, ॲन्टिकॉलिनर्जिक किंवा अँटीहास्टॅमिनिक नॅझल स्प्रेचा वापर बंद झालेल्या नाकाला साफ करण्यासाठी केला जातो.