पार्किन्सन रोग काय आहे?
पार्किन्सन रोग मज्जासंस्थेशी संबंधित विकार आहे ज्यात मज्जातंतू (नर्व्ह सेल्स) वर परिणाम होऊन मेंदूला हानी पोहोचते. मज्जातंतू संपूर्ण मेंदूमध्ये न्यूरोट्रान्समीटर, ज्याला डोपामाईन म्हणतात, मेंदूकडून संदेश पोहोचवण्याचे काम करण्यासाठी जबाबदार असतात. सामान्य परिस्थितीत, डोपामाईन च्या मदतीने अलगद, संतुलन साधून स्नायूंशी समन्वय साधण्याचं काम पार पाडल्या जाते. न्यूरोट्रान्समीटर च्या कमतरतेमुळे पार्किन्सन रोगाची लक्षणे दिसू लागतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
पार्किन्सन रोगाच्या अनेक लक्षणांमधून एक सुरवातीचे आणि सामान्य लक्षण म्हणजे शरीराच्या एका भागाला, हात किंवा पाय किंवा जबड्यात कंपन जाणवू लागतात. हात स्थिर असताना कंपने किंवा थरथरणे दिसू शकते,मुख्यत्वे अंगठ्याची हालचाल तर्जनीच्या विरुद्ध बाजूच्या दिशेने दिसते.
दुसरे लक्षण म्हणजे स्नायू कडक होणे. स्नायू अनियंत्रित व कडक झाल्यामुळे त्यांच्या हालचालीवर निर्बंध येतात. अशी व्यक्तीचा कोणतेही काम करताना वेग हळूहळू मंदावतो. साधे काम जसे आंघोळ करणे किंवा जेवण करणे अशा कामाला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो.
या तुलनेत कधी कधी दिसून येणाऱ्या लक्षणांमध्ये भिती, लाळ गळणे, त्वचेच्या समस्या, मूत्राशयासंबंधित समस्या आणि लैंगिक असंतुष्टी समाविष्ट आहेत. कंपनाचा साधारणपणे बोलण्यावर आणि लिहिण्यावर परिणाम होतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
जरी याचे संभाव्य कारण जाणून घेण्यासाठी संशोधन सुरु आहे, तरीही अजूनपर्यंत काहीही माहिती मिळाली नाही आहे. पार्किन्सन्स रोगाचा धोका वाढण्यामागे काही अनुवांशिक घटक आणि वातावरणातील घटक असण्याचे मानले जाते.
जेनेटिक बदल सुद्धा पार्किन्सन्स रोगसाठी कारणीभूत एक धोकादायक घटक म्हणून ओळखले जाते, पण याची रोगप्रवृत्ती अजूनपर्यंत ठळकपणे स्पष्ट नाही आहे.
शेतामधील वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकांच्या संपर्कात येणे हा एक मोठा पर्यावरणीय घटक आहे ज्यामुळे हा रोग होण्याचा धोका वाढतो.इतर दुर्मिळ कारणांमध्ये व्यक्ती काही मानसोपचाराची औषधे घेत असेल किंवा मेंदूच्या आजाराने ग्रस्त असेल किंवा भूतकाळात एखादी व्यक्तीला लकव्याचा अटॅक आला असेल तर याची बाधा होण्याची शक्यता असते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
पार्किन्सन्स रोगाचे निदान अवघड असू शकते, कारण यामध्ये रोगाची खात्री करण्यासाठी विशिष्ट ब्लड किंवा प्रयोगशाळेत कोणतीच चाचणी उपलब्ध नाही आहे. आणखी, इतर परिस्थिती जसे ऑर्थोपेडिक कमतरता किंवा व्हिटॅमिन ची कमतरता यासारखी लक्षणे दिसू शकतात.
म्हणून, मागील वर्षात घेतलेल्या औषधांच्या दीर्घ इतिहासा बरोबर इतर वैयक्तीक माहितीच घेऊन त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. मेंदूवर होणारा परिणाम बघण्यासाठी सीटी किंवा एमआरआय स्कॅन करण्यात येतो.
न्यूरॉलॉजिस्ट कडून तपासणी करणे आवश्यक आहे, जो वेळेबरोबर लक्षणांवर आणि रोगाच्या प्रसाराकडे लक्ष ठेवेल.
उपचारासाठी, डोपामाईन च्या कमतरतेसाठी बरीचशी औषधे उपलब्ध आहे.ते प्रभावित मेंदूच्या जागेला उत्तेजित करण्याचे काम करतात. तरीही, बऱ्याच काळासाठी वापरल्याने, या औषधाचे दुष्टपरिणाम दिसून येतात.
जर औषधांमुळे लक्षणे कमी झाली नाही, तर शस्त्रक्रियेचा पर्याय आहे. हे मेंदूला उत्तेजित करण्यासाठी इलेक्ट्रोड ठेवून केल्या जाते आणि मज्जातंतूतून दिले जाणारे कंपनाचे संदेश नियंत्रित केले जातात.
पार्किन्सन्स रोग वयोपरत्वे होणारा विकार आहे. या परिस्थिती साठी स्पष्ट उपचार नाही आहे;तरीही,हा रोग झालेल्या व्यक्तीने मानसिक शांतता ठेवण्याचे आणि नियमित शारीरिक व्यायाम करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.