पेरिटोनायटीस - Peritonitis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 09, 2019

March 06, 2020

पेरिटोनायटीस
पेरिटोनायटीस

पेरिटोनायटीस म्हणजे काय?

पेरिटोनायटीस हे पेरिटोनिअम मधील जळजळ. पेरिटोनिअम टिश्यू पोटाच्या आतल्या भागात लायनिंग तयार करतो व पोटातील अवयवांना सुरक्षित करतो. पेरिटोनायटीस हा सामान्य पण गंभीर विकार आहे, जो बॅक्टरियाच्या संसर्गाने होतो किंवा शस्त्रक्रियेतील कॉम्प्लिकेशनमुळे किंवा पेरीटोरियल डायलिसिस मुळे होतो. या विकारावर लवकर लगेच उपचार न केल्यास ही स्थिती गंभीर होऊ शकते.

याची प्रमुख कारणे व लक्षणे काय आहेत?

याची करणे व लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:-

  • पोटावर सूज व स्पर्श केल्यावर दुखणे.
  • पोटामध्ये खूप दुखणे.
  • थंडी व ताप.
  • भूक न लागणे.
  • खूप तहान लागणे.
  • गॅस पास करणे व विष्ठा यामध्ये त्रास.
  • पोट फुगणे.
  • मळमळ व उलट्या.
  • डिसओरिएंटेशन.
  • चंचलपणा भावना.
  • आघात.

याची प्रमुख कारणे काय आहेत?

पेरिटोनायटीस चे प्रमुख कारण म्हणजे बॅक्टरियाचा अक्यूट संसर्ग जो प्राथमिक पणे (कोणताही आजार नसताना) किंवा सेकंडरी असतो. हा संसर्ग एका अवयवातून दुसऱ्यात पसरतो. तरी, पेरिटोनायटीससाठी इतर कारणे असू शकतात. पेरिटोनायटीस ची इतर कारणे पुढीलप्रमाणे आहेत:-

  • पोटातील जखम किंवा दुखापत.
  • पेरिटोनियल डायलिसिस:पेरिटोनियल द्रव्याचे डायलिसिस, ज्यात द्रव मशीन द्वारे गाळले जाते.
  • पोटाची शस्त्रक्रिया.
  • अपेंडिसायटीस.
  • पोटाचा अल्सर.
  • क्रॉन रोग- बाऊल मधील जळजळीचा आजार.
  • पेल्व्हिस किंवा स्वादुपिंडामधील जळजळ.
  • पित्ताशयातील जळजळ।
  • डायलिसिस नंतरचे फंगल संसर्ग.
  • फूड ट्यूब चा वापर.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

जर वरील लक्षणे दिसली तर तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. रुग्णाच्या वैद्यकीय इतिहासापासून सुरुवात होते. निदानासाठी खालील चाचण्या केल्या जातात:-

  • पोटाची शारीरिक तपासणी.
  • रक्ताची तपासणी.
  • ब्लड कल्चर, पेरिटोनियम वरील बॅक्टेरिया चे परिणाम जाणून घेण्यासाठी.
  • पोटातील द्रवाचे परीक्षण.
  • जर तुम्ही पेरिटोनियल डायलिसिस वर असाल तर, डायलिसिस एफ्युलंट परीक्षण.
  • अल्ट्रासाऊंड इमॅजिंग.
  • पेरिटोनियम मधील छिद्र शोधण्यासाठी सीटी स्कॅन्स व एक्स रे चाचण्या.
  • लॅपरोस्कोपी:- पोटाची आतील बाजू बघण्यासाठी कॅमेरा असलेली ट्यूब सोडून निरीक्षण केले जाते.

पेरिटोनायटीस चे योग्य उपचार आवश्यक आहेत कारण न केल्यास त्याचा परिणाम अवयव निकामी होण्यात होतो. याच्या उपचार पद्धती खालीलप्रमाणे आहेत:-

  • औषधे- अँटी बायोटिक्स व अँटी फंगल्स.
  • संसर्गित टिश्यू काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते.
  • पोटाचा आतील भाग साफ करण्यासाठी पोटाच्या आतील भागाचा लव्हेज. याने जळजळ व संसर्ग कमी होते.
  • काही रुग्णांना री- लॅप्रोटोमी (ओपन सर्जरी) ची गरज भासते. यात ताजे इन्सिजन करुन पोटात कॅव्हिटी बनवून पोटातील संसर्ग बघितले जातात.

जर पेरिटोनायटीस वर उपचार केले नाहीत तर तो पसरू शकतो व कॉम्प्लिकेशन होऊ शकतात जसे सेप्टीसेमिया ( रक्तामध्ये होणारा संसर्ग) आणि शॉक. हे पुढे जाऊन पोटातील फोड किंवा टिश्यू च्या मारण्यासाठी कारणीभूत ठरतात, जे प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे पेरिटोनायटीस च्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.



संदर्भ

  1. OMICS International[Internet]; Peritonitis.
  2. Sujit M. Chakma et al. Spectrum of Perforation Peritonitis. J Clin Diagn Res. 2013 Nov; 7(11): 2518–2520. PMID: 24392388
  3. K Soares-Weiser. Antibiotic treatment for spontaneous bacterial peritonitis. BMJ. 2002 Jan 12; 324(7329): 100–102. PMID: 11786457
  4. R.J.E.Skipworth and K.C.H.Fearon. Acute abdomen: peritonitis. Surgery,March 2008, 26 (3); 98-101. Volume 26, Issue 3, Pages 98–101
  5. Carlos A Ordonez,Juan Carlos Puyana. Management of Peritonitis in the Critically Ill Patient. Surg Clin North Am. 2006 Dec; 86(6): 1323–1349. PMID: 17116451