भय म्हणजे काय?
भय म्हणजे एखाद्या वस्तू किंवा परिस्थितीची अनुपस्थिती असूनही कोणताही खरा धोका नसताना फार भीती वाटणे. ज्या वस्तू किंवा परिस्थितीला तुम्ही घाबरता त्याचा विचार करताना आपल्याला चिंता देखील वाटू शकते. तणावपूर्ण परिस्थितीत चिंता करणे पूर्णपणे सामान्य आहे पण कोणत्याही वास्तविक कारण किंवा धोक्याशिवाय चिंताग्रस्त होणे हे सामान्य नाही. अशा प्रकारे, भय आपल्या दैनंदिन क्रियाकलापांवर नकारात्मक प्रभाव पाडू शकतो. सर्वसाधारणपणे नोंदवलेल्या भयामध्ये प्राणी, कीटक, इंजेक्शन, उंची, सार्वजनिक ठिकाणी बोलणे आणि गर्दी समाविष्ट आहेत.
भारतीय संशोधनातील एक लेखानुसार, भय हा एक चिंताजनक विकार आहे आणि भारतात 4.2% लोकांमध्ये हा पाहिला जातो.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
भीती आणि चिंतासह, तुम्ही पुढील लक्षणे देखील अनुभवू शकता:
- चक्कर येणे किंवा जसे बेशुद्ध होणार आहोत असे वाटते.
- हृदयाची गती वाढणे.
- श्वासोच्छवासास त्रास होणे आणि गिळताना त्रास होणे.
- घाम येणे.
- छातीत दुखणे.
- मळमळ आणि उलटी.
- भीतीने किंवा थंडीने थरथरणे.
- सुन्न होणे.
- सभोवतालची जागरूकता कमी होणे.
या लक्षणांची तीव्रता एका व्यक्तीनुसार बदलते. गंभीर परिस्थितीत, भयामुळे इतर चिंताग्रस्त विकार देखील होऊ शकतात जसे की पॅनिक अटॅक डिसऑर्डर.
याची मुख्य कारणं काय आहेत?
भयाचे अचूक कारण ओळखले जाऊ शकत नाही. पण खालील कारणांमुळे हे होण्याची शक्यता आहे:
- भूतकाळातील परिस्थिती (उदाहरणार्थ, उडताना किंवा सार्वजनिक बोलताना वाईट अनुभव, लिफ्टमध्ये अडकणे, बालपणात कुत्रा चावणे, अपघाती मृत्युचा अनुभव इत्यादी).
- समान भय असलेला कौटुंबिक सदस्य.
- आनुवांशिक.
- ज्यांना तणाव आहे किंवा जे चिंतेच्या विकारांनी पीडित आहेत.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तुम्हावा काही वस्तू किंवा परिस्थितीचे भय असल्यास, सर्व प्रथम त्याबद्दल एखाद्याशी बोला. हे आपले कुटुंबिय किंवा मित्र असू शकतात. दुसरे म्हणजे, योगा, ध्यान आणि श्वास नियंत्रण शिकून यासारख्या विश्रांती तंत्रज्ञानाद्वारे तुमच्या मनाला शांत राहण्यास शिकवू शकता.
तुम्ही विशेषज्ञाची मदत घेऊ इच्छित असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे भय आणि तीव्रता ओळखल्यानंतर ते उपचाराचा पर्याय देतील. बहुतेक बाबतीत, भयासाठी उपचार आवश्यक नसतात. उपलब्ध उपचारांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- टप्प्या टप्प्याने भीतीचा सामना करण्यासाठी आणि समस्याबद्द्ल विचारांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी काउंसिलिंग आणि थेरपी.
- भीती संबंधित चिंतेचा उपचार करण्यासाठी औषधे.
- समान भयग्रस्त व्यक्तींसह ग्रूप थेरपी.
- कॉग्निटिव्ह बिहेवियिरल थेरपी.
- योग आणि ध्यान असे आरामदायी तंत्र.