प्ल्युरल एफ्युजन म्हणजे काय?
प्ल्युरल एफ्युजन ही वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये फुफूसाच्या अवरणांमधील जागांमध्ये द्रव्य तयार होते. सामान्यपणे, ही जागा प्ल्युरल स्पेस म्हणून ओळखली जाते, कमीतकमी द्रव्य, जे फुफूसाचे श्वसन प्रक्रियेतील आकुंचन व प्रसरणामधील घर्षण कमी करण्यासाठी मदत करते. प्ल्युरल इफ्युजन असणारी व्यक्ती च्या या प्ल्युरल स्पेस मध्ये जास्त द्रव्य जमा होते आणि छातीत तीव्र दुखते.
याची प्रमुख कारणे व लक्षणे काय आहेत?
प्ल्युरल एफ्युजन मधील लक्षणे प्ल्युरल स्पेस मध्ये जास्त प्रमाणात एकत्र होण्यास सुरुवात होते. ही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- कोरडा व सततचा कफ.
- श्वसनात त्रास.
- छातीत दुखणे.
- ताप.
- उचक्या.
- वेगाने श्वसन.
काही व्यक्तींमध्ये, प्ल्युरल एफ्युजन जास्त प्रमाणात असेपर्यंत कोणतेही लक्षणे तयार करत नाही.
प्रमुख कारणे काय आहेत?
प्ल्युरल एफ्युजन ची कारणे खालीलप्रमाणे आहे:
- हृदय निष्फळ होणे.
- फुफूस संसर्ग.
- फुफूसाचा कर्करोग.
- अकार्यक्षम यकृत.
- किडनी चे आजार.
- छाती व फुफूसातील जखम.
जास्त प्रमाणात धुम्रपान व दारू सेवन यामुळे प्ल्युरल एफ्युजन चा धोका वाढू शकतो. काही बाबतीत, शस्त्रक्रियेमधील जखमेमुळे प्ल्युरल एफ्युजन होऊ शकते.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
प्ल्युरल एफ्युजनचे निदान शारीरिक लक्षणांचे परीक्षण करून सुरू केले जाते. इतर निदानाच्या चाचण्या खालीलप्रमाणे आहेत:
- छातीचे सी टी स्कॅन.
- छातीचे एक्स-रे.
- रक्त तपासणी.
- फुफूसाची बायोप्सी.
- प्ल्युरल द्रव्याचे लॅब टेस्टिंग.
स्थितीचे योग्य निदान करून, डॉक्टर जास्तीचे द्रव्य काढून टाकतात व द्रव्याचे पुन्हा तयार होणे थांबवतात, उपचार सुरू करतात. डॉक्टर नक्की कारण शोधून काढतात व प्ल्युरल एफ्युजन ची पुन्हा निर्माण होऊ देत नाहीत.
जर प्ल्युरल एफ्युजन हृदयाच्या निष्फळतेमुळे होत असेल तर डाययुरेटिक्स चा सल्ला दिला जातो.प्ल्युरल एफ्युजन च्या संसर्गित जागेवर उपचार करण्यासाठी अँटी बायोटिक्स चा वापर केला जातो.
प्ल्युरल स्पेस मधून द्रव्य काढून टाकण्यासाठी छातीच्या ट्यूब चा वापर केला जातो.
प्ल्युरल एफ्युजन ही गंभीर स्थिती असून वेळीच उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते.