स्यूडोमोनास संसर्ग म्हणजे काय?
स्युडोमोनास प्रजातीमुळे होणाऱ्या जीवाणूजन्य संसर्गास स्यूडोमोनास संसर्ग म्हणून ओळखले जाते. हे जिवाणू पर्यावरणामध्ये व्यापक रूपात आढळतात त्यामुळे हे एक सामान्य संक्रामक जीव आहेत. स्यूडोमोनासच्या जवळपास 200 प्रजाती आहेत. पण केवळ तीन प्रजाती मानवांमध्ये रोगाचे कारण बनतात. त्या जे पी. एरुजिनोसा, पी. मालली आणि पी. स्यूडोमल्ली या आहेत. स्यूडोमोनास मधील सर्व प्रजातींमध्ये, पी. एरुगिनोसा ही मानवांमध्ये संसर्गाचे सर्वात प्रचलित कारण आहे.
त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
स्यूडोमोनास संसर्गाचे लक्षणे शरीराच्या प्रभावित प्रणालीवर आधारित असतात, जसे की:
- मूत्रमार्ग
मूत्रातून रक्त, लघवी करताना वेदना आणि जळजळीची संवेदना, आणि धुकट/गडद रंगाचे मूत्र. - कान
कानामध्ये वेदना, ऐकण्यात अडचण, कानातून पिवळा / हिरवा स्राव आणि कान मध्ये जळजळ / खाज. - घसा
डोकेदुखी,ताप, घसा खवखवणे, त्वचेला रॅशेस, गळ्यातील लिम्फ नोड सूजणे
याचे मुख्य कारणं काय आहेत?
खालील व्यक्ती स्यूडोमोनास संक्रमणास बळी पडण्याची शक्यता असते:
- शस्त्रक्रिया किंवा जळण्याच्या जखमा.
- युरिनरी कॅथेटर्ससारख्या साधनांचा वापर.
- ब्रिदींग मशीनवर वापरणारी व्यक्ती.
- अंतर्निहित रोग किंवा इम्यूनोसप्रेसंट्स थेरपीमुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तपशीलवार इतिहास आणि शारीरिक तपासणीनंतर, टिश्यू बायोप्सी, संपूर्ण रक्त गणना, छातीचा एक्स-रे, मूत्र सूक्ष्मदर्शक आणि कल्चर हे संक्रमणांचे निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सामान्य चाचण्या आहेत. या बॅक्टीरियाच्या संसर्गाच्या शोधात पुढील निदान उपाय उपयुक्त असतात:
- फ्लोरोसेन चाचणी
वूड अल्ट्राव्हायलेट लाईट मधून बघताना संक्रमित क्षेत्र फ्लोरोसेंट दिसून येईल. - पायोसियानिन फॉर्मेशन
बहुतेक प्रकरणांमध्ये पायोसायनिन तयार केले जाते, जे पसाला निळसर हिरवे बनवते.
स्यूडोमोनास संसर्गाच्या उपचारांमध्ये खालील समाविष्ट आहे:
- जखमेची घाण (मृत ऊतक काढणे) काढून टाकणे.
- इम्यूनोथेरपी ज्यामध्ये लसीकरण सामिल असते.
- अँटीबायोटिक्स सारखी औषधे. खालील अँटीबायोटिक्स सामान्यतः सुचविले जातातः
- कार्बेनिसिलिन.
- टोब्रामायसिन
- जेंटामायसिन
- सिल्व्हर सल्फाडायझिन
- सायप्रोफ्लॉक्सासिन
स्यूडोमोनास संसर्ग या प्रतिबंधात्मक उपायांनी रोखला जाऊ शकतो:
- योग्य असेप्टिक तंत्रांचे पालन करणे.
- योग्य अलगाव प्रक्रिया.
- कॅथेटर आणि इतर साधनांची पुरेशी साफसफाई.
- जखमांवर स्थानिक अँटीबॅक्टीरियल क्रीम आणि लोशन वापरून उपचार करणे.