बरगड्यांमधील वेदना म्हणजे काय?
बरगड्यांच्या एका किंवा दोन्ही बाजूस वेदना होणे याला बरगड्या दुखणे असे म्हणतात. ह्या वेदना एकाच वेळेस एका किंवा त्यापेक्षा जास्त बरगड्यांमधे होऊ शकतात.
याच्याशी निगडीत प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
बरगड्यांमधील वेदनांमध्ये छातीत दुखते त्याशिवाय इतरही काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात जसे:
- कोस्टोकॉंड्रॉइटीसच्या बाबतीत बरगड्यांच्या पिंजऱ्याला सूज येउन त्याचा दाह होतो आणि छातीच्या भागात टेंडरनेस येतो. बरगड्यांच्या वरच्या बाजूला आणि स्टर्नमच्या जवळ वेदना जाणवतात. याची गंभीरता वाढल्यास शरीराच्या खालील भागातही सतत वेदना होऊ लागतात. अशी लक्षणे दिसू लागल्यास त्वरित वैद्यकिय मदत घ्यावी.
- त्याचप्रमाणे छातीची भिंत आणि फुफ्फुसे यांच्या मधील पडद्याचा दाह होणे याला प्लुरसी म्हणतात. वेदना होणे हे याचे महत्त्वाचे लक्षण आहे. हा त्रास सहसा आपोआपच कमी होतो पण काही वेळा ॲंटीबायोटीक उपचारांची गरज भासते. त्याशिवाय ब्रॉंकायटीस म्हणजेच श्वास्नलिकेचा दाह होणे यामुळेही बरगड्यांच्या आसपास वेदना होतात.
- फुफ्फुसाच्या कर्करोगामुळेही बरगड्यांच्या किंवा छातीच्या आसपासच्या भागात वेदना होतात. हसण्यामुळे किंवा खोकल्यामुळे या वेदना अतिशय त्रासदायक होतात. यामुळे व्हीजींग, फ्लेगम किंवा श्वास घेण्यास अडचण यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- फायब्रोमायल्जीया असल्यास वेदना या जळजळीत किंवा खुपल्यासारख्या किंवा अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
बरगड्यांमधे वेदना होण्याची कारणे सर्वसामान्य ते दुर्मिळ अशा प्रकारात मोडतात. यामुळे छातीत दुखणे वाढते तसेच त्याबरोबर पोटदुखी आणि तापही येतो. सर्वसामान्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:
- कोस्टोकॉंड्रॉइटीस.
- थोरॅसिक स्पाईनमधे वेदना.
- स्टेरनॅलीस सिंड्रोम - हा एक दुर्मिळ प्रकारचा सिंड्रोम आहे ज्यात छातीच्या भिंतीमध्ये वेदना होतात.
- एखादी इजा झाल्यामुळे, खेळ, अपघात, हल्ला किंवा पडल्यामुळे बरगड्या मोडणे.
दुर्मिळ अशी कारणे म्हणजे:
- स्ट्रेस फ्रॅक्चर्स.
- रुमेटॉइड (हाडांमधे किंवा सांध्यान्मध्ये सूज येणे किंवा वेदना होणे) फॅक्टर्स.
- फायब्रोमायल्जीया - स्नायूदुखी आणि सांधेदुखी तसेच कडकपणा.
- सिकल सेल ॲनिमिया - सिकलच्या आकाराच्या लाल रक्तपेशीन्मुळे रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होणे.
- पॉलीकॉंड्रायटीस - कार्टीलेजचा दाह किंवा सूज येणे.
- ऑस्टिओपोरायसीस - मेनॉपॉजनंतर हाडांची घनता कमी होणे.
- लुपस एरीथिमॅटोसस - ऑटोइम्युन कंडिशन.
- स्लिपिंग रिब सिंड्रोम - हा एक दुर्मिळ प्रकार आहे ज्यात खालच्या बाजूच्या बरगड्यांचा कार्टिलेज घसरतो ज्यामुळे वेदना होतात.
- ट्युमर्स.
- गॉलस्टोन.
- प्ल्युरसी.
- पल्मनरी एंबॉलिजम.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
वरील प्रकार लक्षणांवरून लक्षात येतात. यासाठी डॉक्टर विविध प्रकारच्या चाचण्या करून घेण्यास सुचवतात जसे की छातीचा एक्स रे, सीटी स्कॅन, एमआरआय, सी-रिॲक्टीव्ह प्रोटीन लेव्हल्स इत्यादी ज्यामुळे अचूक कारण शोधून काढता येते. याशिवाय डॉक्टर पुढील काही गोष्टीही सुचवू शकतात:
- ॲनल्जेसिक किंवा वेदनाशामक औषधे.
- काही काळापुरता शारिरीक ताण टाळणे.
- उष्ण / थंड पॅक उपचार
- फिजीओथेरपी
- कॉर्टीकोस्टेरॉइड उपचार
गंभीर प्रकारात कॅंसर किंवा मोडलेल्या बरगड्यांसाठी डॉक्टर विशिष्ट उपचार सुचवतात.