सारांश
गजकर्ण मुले आणि प्रौढ अशा दोघांमध्ये दिसणारे एक सामान्य त्वचा संक्रमण आहे. डर्मटोफाइट नावाच्या बुरशी यांमुळे गजकर्ण होतो. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला टिनिआ या नावाने ओळखले जात असते आणि गजकर्ण हा आजार मानव आणि प्राण्यांना देखील प्रभावित करू शकतो. गजकर्ण संक्रमण त्वचेच्या त्या भागांमध्ये होतो, जे सामान्यपणें गरम आणि आर्द्र असतात उदा. चवड्यांमधील त्वचेच्या दुमड्या, पोट आणि मांडीचे मध्यभाग, डोक्याची त्वचा, बोटा इ. प्रभावित होत असलेल्या भागाच्या नावावर गजकर्णच्या विभिन्न प्रकारांची नावे पडतात. उदा. टिनएक्युरिस पोट आणि मांडीच्या मध्यभागात, टिनकॅपिटिस डोक्याच्या त्वचेत, टिनेऑन्गिनिअम चवड्यांच्या नखांमध्ये, टिनएपेडिस (एथ्लीट्स फुट) तळपायांमध्ये आणि टिनएमॅन्युम हातांमध्ये होतो. टिनएपोरिस शरिराच्या कुठल्याही भागात होणार्र्या बुरशीजन्य संक्रमणाची सामान्य व्याख्या आहे.
गजकर्ण वर्तुळाकार अंगठीच्या आकारात असून, केंद्रात स्वच्छ क्षेत्र असते. या अंगठीच्या किनारी उभारी असलेल्या, लाल रंगाच्या आणि ढलप्या असतात. गजकर्णामध्ये प्रभावित क्षेत्रात असह्य खाज होते. टिनिआ याला गजकर्ण हे नाव त्याच्या विशिष्ट आकारामुळे पडले आहे. गजकर्ण प्रभावित व्यक्ती, प्राणी किंवा पाळीव प्राण्याच्या माध्यमातून, बुरशी असलेली माती किंवा थरामार्फत सहज पसरतो. अशक्त रोग प्रतिकार असलेल्या लोकांमध्ये, उदा. एचआयव्ही, मधुमेह किंवा कर्करोगाच्या रुग्णांमध्येही तो सामान्यपणें आढळतो. डॉक्टर संक्रमित त्वचेच्या नमुन्याच्या शारीरिक व सूक्ष्मदर्शी चाचणीच्या आधारे गजकर्णाचे निदान करतात. सौम्य प्रकाराचा गजकर्ण बुरशीरोधी लेपन आणि लोशनच्या बाह्य अनुप्रयोगाद्वारे बरा होतो. तथापी, गंभीर प्रसंगांमध्ये, मौखिक बुरशीरोधी औषधेही हवी असतात. तसेच, निरोगी सवयी उदा. त्वचा स्वच्छ ठेवणें आणि एकूण स्वच्छता ठेवणें, याद्वारेही गजकर्ण टाळण्यात मदत मिळते.