रोटाव्हायरस म्हणजे काय?
रोटाव्हायरस एक संसर्गजन्य व्हायरस आहे जो पचन संस्थेला संसर्गित करतो, ज्यामुळे उल्ट्या आणि अतिसार होतो. लहान मुले आणि बाळांमध्ये हा आजार सामान्य आहे. पण, लसीकरण अणि वैयक्तिक स्वच्छता पाळून याला प्रतिबंध घातले जाऊ शकते. मुलांचे पोटबिघडण्याचे सर्वात सामान्य कारण या विषाणूचा संसर्ग आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
दूषित अन्न किंवा पाण्याच्या सेवनानंतर दोन दिवसांनी रोटाव्हायरसची लागण झाल्याची लक्षणे दिसून येतात. त्याची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत :
- ताप.
- अतिसार.
- उल्ट्या.
- पोटदुखी.
- भूक न लागणे.
- निर्जलीकरण.
- लघवी कमी होणे.
- घसा अणि तोंड कोरडे पडणे.
- चक्कर येणे.
- चिडचिडेपणा.
रोटाव्हायरसची पूर्वी बाधा झालेल्या मुलांना रोटाव्हायरस परत होऊ शकतो कारण या व्हायरसला मात देण्यासाठी रोगप्रतिकारत्मक शक्ति विकसित होत नाही. तरीही,या व्हायरसची पहिली लागण गंभीर नसते.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
रोटाव्हायरस एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो खालील कारणांमुळे पसरतो :
- संसर्गित मुलाच्या विष्ठेच्या संपर्कात येणे.
- संसर्गित माणसाच्या संपर्कात येणे.
- प्रसाधनगृह, अंथरूण आणि अन्न या सर्वांशी असलेला संपर्क.
- स्वच्छता न बाळगणे.
रोटाव्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे कुटुंब, शाळा अणि सार्वजनिक संस्थांद्वारे लवकर पसरतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
गंभीर स्वरुपातील रोटाव्हायरसमुळे निर्जलीकरणाशी संबंधित कॉम्प्लीकेशन्स निर्माण होऊ शकतात. माणसाच्या विष्टेत असलेल्या विषाणूवरुन त्याचे निदान केले जाऊ शकते. निश्चित आजार सांगण्यासाठी डॉक्टर स्टूल टेस्ट करायला सांगू शकतात. याशिवाय एन्झाइम इम्युनोसे अणि रिव्हर्स ट्रांस्क्रिप्टेझ पॉलीमरेज चेन रिॲक्शन (पीसीआर) यासारख्या चाचण्या निदनात मदत करतात.
उपचारः
उपचारांपेक्षा प्रतिबंध जास्त चांगला असतो हे आपण रोटाव्हायरस संसर्गाबाबत म्हणू शकतो. म्हणून, सार्वजनिक ठिकाणे टाळणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे याची शिफारस केली जाते. तसेच, संक्रमित रुग्णाच्या अंथरुणाला आणि कपड्यांना स्पर्श करायचे टाळून स्वत:ला.वाचवू शकता.
मीठ आणि द्रवपदार्थ भरून काढण्यासाठी घरी बनवलेले लिंबाचे सरबत, ताक, नारळचे पाणी, साखरेचे सोल्यूशन(एक लिटर उकळलेल्या पाण्यात 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ) इत्यादींचे सेवन करावे. पूर्णपणे बरे होईपर्यंत बाहेरील अन्न टाळणे खूप महत्वाचे आहे.
रोटाव्हायरस संसर्गाचा उपचार सहसा लक्षणांवर आधारित असतो आणि त्यानुसार डॉक्टर बेडरेस्ट घेण्यास सांगू शकतात. भरपूर पाणी पिणे आणि न शिजवलेले अन्न टाळणे महत्वाचे आहे.
त्याचप्रमाणे, विषाणूंविरूद्ध इष्टतम संरक्षण मिळवण्यासाठी नवजात बालकांना दोन लसी दिल्या जाऊ शकतात.
- रोटाटेक (आरव्ही 5) 2,4 आणि 6 महिन्यांच्या बालकांसाठी.
- रोटारिक्स (आरव्ही 1) 2 आणि 4 महिन्यांच्या नवजात मुलांसाठी.