स्कार म्हणजे काय?
जखम बरी झाल्यानंतर त्वचेवर कायमचे खूण /चट्टा पडण्याला स्कार म्हणतात. शरीरावर काप, खरुज किंवा भाजल्या नंतर बरे झाल्यावर ते होतात; याशिवाय त्वचेचे रोग जसे कांजण्या आणि पिंपल, उपचार केल्यावर काही खूणा मागे सोडतात. स्कार गुलाबी किंवा लाल आणि चमकदार दिसते आणि त्वचेवर होते.
याचे चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जखमांच्या प्रकार, प्रभाव आणि त्याचे प्रमाण यावर अवलंबून, या स्कारचे आकार,माप आणि दिसणे भिन्न असते.
- हायपरट्रॉफिक स्कार.
- त्वचेतून उंचावलेला / बाहेर आलेला.
- लालसर किंवा गुलाबी रंगाचा.
- जखमेच्या सीमेत असणारा.
- केलोइड्स.
- त्वचेतून उंचावलेला / बाहेर आलेला.
- तपकिरी लाल रंगाचा.
- सामान्य त्वचेवर पसरणारा.
- यौवनपीटिका /पिंपलची खूण.
- तीव्र पिंपल गेल्यानंतर देखील खूण राहते.
- कॉन्ट्रॅक्चर स्कार.
- भाजल्यानंतर दिसतात.
- त्वचा घट्ट आणि आकसून जाते.
- प्रभावित क्षेत्रात कमी हालचाल आणि स्नायू आणि नसा प्रभावित होऊ शकतात.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
जेव्हा त्वचेवर जखम होते आणि ऊतक फाटतात तेव्हा जखमेच्या जागेवर कोलेजन प्रोटीन सोडले जाते आणि गोळा होते. घाव बरा होण्यास सुरवात होते आणि क्लॉट/खपली मजबूत होण्यास सुरू होते. जर जखम मोठी असेल तर कोलेजन तंतुं बनवण्यासाठी आणि जमा होण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात आणि ते जाड, उंच, लाल,आणि गोळा झाल्यासारखे दिसतात.
या खुणांचे काही विशिष्ट कारणं नाहीत, परंतु मोठ्या जखमांवरील, कापल्यास, भाजल्यास आणि कधीकधी शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते होण्याची जास्त शक्यता असते. जे लोक वृद्ध आहेत किंवा ज्यांची गडद त्वचा असते त्यांना स्कार होण्याची शक्यता अधिक आहे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?
सामान्यतः, योग्य वैद्यकीय इतिहास आणि संपूर्ण क्लिनिकल तपासणी निदानात मदत करतात. ती कोणत्या प्रकारची खूण आहे हे देखील ठरवण्यास मदत करते. पण, निदानाची पुष्टी करण्यासाठी कधीकधी त्वचेची बायोप्सी (खुणाच्या टिश्यूची बायोप्सी) केली जाते.
या खुणा पूर्णपणे काढून टाकणे कठीण आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक काही वर्षांत स्वत: निघून जातात. काही उपचार पद्धती या खुणांना लवकर काढण्यात मदत करतात किंवा त्यांना कमी दृश्यमान बनवण्यास मदत करतात:
- स्कारवर सिलिकॉन जेल लावणे.
- स्कारचा आकार कमी करण्यासाठी स्कारच्या टिश्यूवर आणि सभोवताल भागावर स्टेरॉईडचे इंजेक्शन देणे.
- एक्सीशन / छेदन आणि स्किन ग्राफ्टिंग यासारख्या शस्त्रक्रिया करणे.
- उंचावलेला स्कार खाली करायला लेझर थेरपी, तर कधी स्कार काढून टाकायला अब्लेटिव्ह लेझर थेरपी.