छिन्नमनस्कता - Schizophrenia in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

January 27, 2019

March 06, 2020

छिन्नमनस्कता
छिन्नमनस्कता

सारांश

स्किझोफ्रेनिआ अवस्थेबद्दल कमी माहिती उपलब्ध आहे. ही अवस्था अतीशय घाबरवणारी आहे, आणि याबद्दलची बरीचशी महिती चुकीची आहे. या बौद्धिक अवस्थेत एखाद्या व्यक्तीची आकलनशक्ती विकृत होते आणि तिच्या वास्तविकतेच्या संकल्पना विकृत होतात.स्किझोफ्रेनिआचे परिणाम गंभीरआहेत. त्याने पीडित लोकांचे जीवनमान कमी असते, ज्यामुळे स्किझोफ्रेनिआ ही एक गंभीर स्वास्थ्य समस्या ठरते आहे. स्किझोफ्रेनिआच्या लक्षणांमध्ये असमंजसपणा, भ्रामकता, गोंधळाची वर्तणूक आणि अनिष्ट सामाजिक संवाद यांचा समावेश होतो. स्किझोफ्रेनिआची अचूक कारणे शोधण्यासाठीची संशोधने अद्याप सुरू आहेत. आजाराच्या कौटुंबिक पूर्वेतिहासामुळे एखाद्या व्यक्तीलादेखील सतत स्किझोफ्रेनिआची जोखम असते. उपचारांमध्ये, औषधोपचार व दीर्घकाळ उपचार, सोबतच मित्र आणि कुटुंबातील सदस्यांचे सततचे सहकार्य व आधार समाविष्ट आहे. तथापि, गर्भधारणेदरम्यान कधीकधी गुंतागुंती होऊ शकतात. स्किझोफ्रेनिआच्या व्यवस्थापनात सामाजिक सहभाग आवश्यक असतो ज्यामुळे स्किझोफ्रेनिआतून मुक्त होणारे लोक सक्षम आणि समाधानी जीवन जगू शकतात. अवस्थेच्या पुनरावृत्तीची शक्यता तुलनेने जास्त असते.स्किझोफ्रेनिआपीडित व्यक्ती सोबत अधिक सकारात्मक संवाद ठेवावा,धुंदी आणणाऱ्या औषधांना व धूम्रपानास दूर ठेवावे आणि व्यावसायिक सहाय्याची तरतुद करावी, जेणेकरून त्यांना स्वतंत्रपणे आणि जबाबदारीने जीवन जगण्यास मदत होते.

छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) ची लक्षणे - Symptoms of Schizophrenia in Marathi

स्किझोफ्रेनिआची भिन्न लक्षणे आहेत, आणि बौद्धिक आजार असल्यामुळे, दोन भिन्न प्रकरणांतील साम्याचा शोध घेणे कठीण आहे. तथापि, काही लक्षणे या अवस्थेत सामान्य आहेत. यापैकी काही लक्षणे:

किशोरवयीन मुलांमध्ये

स्किझोफ्रेनिआ असलेल्या किशोरांना,त्यांच्या किशोर समवयस्कांमध्ये दिसतो तो समंजसपणा असण्याची शक्यता कमी असते आणि संभ्रमीत होण्याची प्रवृत्ती अधिक असते. या मुलांमध्ये चिडचिडेपणा असतो, प्रेरणेची कमतरता असते, झोपेच्या समस्या असतात.तसेच यांना मित्रांकडून व कुटुंबातून ते बाहेर काढले जाण्याची शक्यता असते व हे शाळेत वाईट कामगिरी करतात असे दिसून आले आहे.

प्रौढांमध्ये

  • प्रौढांमध्ये असमंजसपणाची अवस्था अतिशय व्यापक आहे.वास्तविकतेचा आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे, याचादेखील समावेश होतो. यांना, आपल्यावर कुणी प्रेम करीत नसल्याची, आपली छळवणूक होत असल्याची, किंवा आपल्या विरोधात कुणी कटकारस्थान रचत असल्याची भावना असणे यासारखे काही समज सामान्यपणे असतात.
  • संभ्रम असणे हे व्यापक लक्षण, स्किझोफ्रेनिआचे वैशिष्ट्य आहे. काहीतरी अस्तित्वात नसलेले संवेदनात्मक अनुभव येणे म्हणजे संभ्रमितपणा होय. संभ्रमित अवस्था अनेक प्रकारची असू शकते, परंतु नसलेला आवाज ऐकायला येणे ब-याचदा अनुभवास येते.
  • स्किझोफ्रेनिआ असलेल्या लोकांमध्ये तुटक संवादाचे भिन्न प्रकार दिसतात.त्यांत प्रश्नांची अप्रासंगिक उत्तरे देणे, बोलताना चुकीचे उच्चार करणे आणि संरचना नसलेली किंवा अर्थ नसलेली वाक्ये वापरणे यांचा समावेश होतो.
  • गबाळ वर्तनासोबत अप्रगत बालपणा असणे, अचानकपणे स्फोटक क्रोध आणि उत्तेजना येणे, सुचना घेण्यास व पालन करण्यासविरोध करणे, भरपूर आणि निरर्थक हालचाली करणे आणि अयोग्य शारिरीक ढब ठेवणे  यांचा समावेश असू शकते.
  • सामान्य क्रियांमधील स्वारस्य कमी होणे, ज्यांत लोकांशी संवाद साधणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, भावनिकरित्या अभिव्यक्त होणे आणि आनंद मिळवणे यांचा समावेश आहे.

छिन्नमनस्कता (स्किझोफ्रेनिया) चा उपचार - Treatment of Schizophrenia in Marathi

स्किझोफ्रेनिआचा उपचार हा समस्येच्या स्तरांवर विचार करून अनेक मार्गांनी करता येतो. उपचार पद्धतींमध्ये समाविष्ट आहे:

  • औषधोपचार
    आजाराच्या परिणामी दिसून येणारी लक्षणे हाताळणे आणि व्यवस्थापित करणे हे उपचारांचे पहिले आणि महत्त्वाचे चरण आहे. सर्वसाधारणपणे सुचवलेल्या उपायामध्ये, एंटीस्कायोटिक औषधे निर्धारित करणे समाविष्ट आहे. विविध घटकांच्या आधारावर, प्रथम किंवा द्वितीय-पिढीतील एंटीसाइकोटिक औषधे निर्धारित केली जाऊ शकतात. सद्य अवस्थेसाठी अनुकूल असलेली पद्धती आणि मात्रा सूचित केली जाते. रुग्णाची संवेदनशीलता लक्षात ठेवून आणि अशा औषधांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अधिक दृढ दृष्टीकोन ठेवला जातो. प्रथम चरणातील रुग्णांसाठी, विकृती परतून आलेल्या रुग्णांसाठी आणि आजारातून मुक्ततेच्या मार्गावर असलेल्या लोकांसाठी भिन्न औषधोपचार आहेत. ज्यांनी औषधांना कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यांच्यासाठी सुधारित उपचार आहेत. व्यक्ती पोटातून औषधे घ्यायला इच्छुक नसल्यास लसीकरण वापरले जाऊ शकते. काही प्रकरणांमधे, इस्पितळात दाखल करणे देखील आवश्यक होऊ शकते. धूम्रपानासारख्या समस्यांसाठी एकाच वेळी वैद्यकीय उपचार सुरू केला जाऊ शकतो.
  • इतर उपचार
    औषधांच्या मर्यादित किंवा प्रतिकूल परिस्थितीच्या बाबतीत, विजेच्या झटक्यांच्या उपचारांचा सल्ला दिला जाऊ शकतो. संभ्रमाचा अनुभव होत असलेल्या लोकांमध्ये, मेंदूच्या काही भागांत चुंबकीय पद्धतीने उत्तेजना तयार करणे उपयुक्त ठरू शकते.
  • मानसिक-सामाजिक सेवा
    हे सहसा औषधोपचारांसह एकाच वेळी केले जाते आणि अत्यंत उपयुक्त आहे. एकाच वेळी अनेक घटकांवर कार्य केले जाऊन व्यक्ती संमिलीत समाजीक जीवन जगू शकतील याची सुनिश्चिती करणे हा या उपचारांचा उद्देश आहे.
  • संज्ञानात्मक वर्तणूक उपचार
    मनस्थिती समजून घेण्यासाठी आणि लक्षणांवर काम करण्यासाठी सहा महिने देखरेख केली जाते व त्यावरून योग्य धोरण वा प्रतीकार योजना तयार करावी असा सल्ला दिला जातो.
  • मद्यपान आणि धुंदीच्या पदार्थांचा गैरवापर
    या दोन्ही समस्यांचे निराकरण झाले आहे हे सुनिश्चित केले जावे आणि व्यक्तीपरतीने या व्यसनांमध्ये पडत नाही याची काळजी घेतली जावी. यामुळे तणाव सांभाळणे, प्रेरणा वाढवणे आणि वर्तणूक योग्य करण्यात देखील मदत होते.
  • प्रतीके व आर्थीक
    व्यक्तिमत्त्वाच्या अवांछित वर्तणूकींवर मर्यादा घालण्यासाठी असे अनेक प्रकारचे उपचार आहेत, या प्रकारात प्रदर्शित अनुकूल वर्तनासाठी आणि सामाजिक कौशल्यांसाठी पुरस्कार देणे यावर भर दिला जातो.
  • कौशल्ये प्रशिक्षण
    हा उपक्रम स्किझोफ्रेनिआ असलेल्या लोकांची सामाजिक कौशल्ये विकसित करून त्यांना समाजाचा भाग म्हणून मान्यता मिळवून देतो वा त्यांना कार्यक्षम बनवतो.
  • रोजगार आधार
    या अवस्थेतील लोकांच्या गरजा आणि व्यावसायिक कौशल्य संच ओळखून त्यांना अधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ही सेवा प्रयत्न करते. व्यवसायात, त्यावर आधारीत सुविधा पुरविल्या जातात.  
  • कौटुंबिक सेवा
    स्किझोफ्रेनिआ असलेल्या लोकांना हाताळतना परिवाराचा सहभाग अत्यंत मोलाचा ठरतो. स्किझोफ्रेनिआ असलेल्या त्या व्यक्तिंमधील पुनरावृत्ती कमी आहेत ज्यात औषधोपचारासह कुटुंबाचा सहभाग व निरंतर कौटुंबिक संबंध यांचा समावेश आहे.

जीवनशैली व्यवस्थापन

उपचारांसोबतच स्किझोफ्रेनिआला जीवनभर सेवेची आवश्यकता असते जेणेकरून ती व्यक्ती परिस्थीतीसोबत जुळवून घेऊन, अडचणींचा प्रतिकार करून, कार्यक्षम जीवन जगण्यासाठी सक्षम होऊ शकेल. स्कोझोफ्रेनिआला लढा  देत  असलेल्या व्यक्तिला कुटुंबाचा वा मित्रांचा आधार सर्वोच्च महत्वाचा आहे. स्किझोफ्रेनिआ असलेल्या व्यक्तिंना सांभाळताना घेतल्या जाव्या असल्या महत्वाच्या गोष्टींमध्ये समावेश आहे:

  • पुनरावृत्ती टाळा
    स्किझोफ्रेनिआची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बरेच काही करायचे असते. या प्रक्रियेतील सर्वात महत्वाच्या घटकांमध्ये  औषधांचे नियमित सेवन, परतून येऊ पाहत असलेल्या छोट्या लक्षणावर बारीक लक्ष, आधारव्यवस्था असलेल्या कुटुंबाच्या व मित्रांच्या सतत  संपर्कात राहणे हे समाविष्ट आहे.
  • समुपदेशन आणि सामाजिक हस्तक्षेप
    यामुळे भावनिक शक्तीची बांधणी होऊ शकते आणि ज्या समायोजन समस्यांना तोंड द्यावे लागू शकते त्याचे निराकरण होऊ शकते. उपचार संपूर्ण झाल्यानंतरही या उपक्रमांमध्ये गुंतून राहणे उपयुक्त आहे. त्यामुळे पुनरावृत्तीच्या घटना लक्षणीयरीत्या कमी होतात.
  • सुदृढ जीवनशैली अंगीकारा
    हे सुदृढता सुधारण्यास मदत करते, स्वास्थ्य उत्तम ठेवते, आणि मनोविकाररोधक औषधे घेतल्याने दुष्परिणाम म्हणून येणाऱ्या लठ्ठपणाला कमी करण्यास देखील मदत करते.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळणे
    स्किझोफ्रेनिआपीडित व्यक्ती मध्ये अतिप्रमाणात प्रतिबंधित औषधे वापरणे, धुम्रपान करणे आणि मद्यपान करणे याकडे अधिक कल असतो. सुदृढ वातावरण निर्मिती केल्यास मुक्ती मिळवण्यास मदत होते. यांमुळे स्किझोफ्रेनिआ बाधित व्यक्ती निर्मळ राहतात आणि पुनरावृत्ती टाळता येते.


संदर्भ

  1. Palmer BA, Pankratz VS, Bostwick JM. The lifetime risk of suicide in schizophrenia: a reexamination. Arch Gen Psychiatry. 2005 Mar;62(3):247-53.PMID: 15753237.
  2. Simon GE, Stewart C, Yarborough BJ, Lynch F, Coleman KJ, Beck A, Operskalski BH, Penfold RB, Hunkeler EM. Mortality Rates After the First Diagnosis of Psychotic Disorder in Adolescents and Young Adults.. JAMA Psychiatry. 2018 Mar 1;75(3):254-260. doi: 10.1001/jamapsychiatry.2017.4437. PMID: 29387876
  3. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Schizophrenia. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
  4. Robert E. Hales, Stuart C. Yudofsky, M.D., Laura Weiss Roberts [Internet]. The American Psychiatric Association; The American Psychiatric Publishing Textbook Of Psychiatry, Sixth Edition.
  5. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Schizophrenia treatment recommendations updated. Published: June, 2010. Harvard University, Cambridge, Massachusetts.
  6. van Os J1, Kapur S. Schizophrenia. Lancet. 2009 Aug 22;374(9690):635-45. doi: 10.1016/S0140-6736(09)60995-8. PMID: 19700006
  7. Sarah D. Holder, Amelia Wayhs. Schizophrenia. Am Fam Physician. 2014 Dec 1;90(11):775-782 [Internet] American Academy of Family Physicians; Schizophrenia.
  8. National Health Service [Internet]. UK; Schizophrenia.

छिन्नमनस्कता साठी औषधे

Medicines listed below are available for छिन्नमनस्कता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.