सेलेनियमची कमतरता काय आहे?
सेलेनियमची कमतरता म्हणजे शरीरात सेलेनियमचे कमी झालेले प्रमाण. सेलेनियम एक ट्रेस खनिज आहे जो रोगप्रतिकारक प्रणालीच्या कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. सेलेनियमची कमतरता क्वचितच आढळते. ज्या ठिकाणी मातीमध्ये सेलेनियम कमी असते त्या ठिकाणी सेलेनियमची कमतरता होण्याची शक्यता जास्त असते. या कमतरतेमुळे कोणताही आजार उद्भवत नाही, पण यामुळे शरीर इतर आजारांसाठी अधिक संवेदनाक्षम होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सेलेनियमची कमतरतेत आढळणारे सर्वसामान्य लक्षणं विशिष्ट रोगांशी संबंधित आहेत:
- केशन रोग: मायोकार्डियल नेक्रोसिसमुळे हृदयाचे कमकुवत होणे, हृदय निकामी होणे, हृदयाशी संबंधित झटके आणि मोठे झालेले हृदय.
- काशीन-बेक रोगः सांध्यांचे कार्टिलेजिनेस टिश्यूचे खंडन, पेशींचे अधःपतन आणि मृत्यू.
- मायक्सोएडेमॅटस इंडेमिक क्रेटिनिझमः शरीरात कमी सेलेनियम आणि आयोडीनची मात्रा असलेल्या मातेने जन्म दिलेल्या नवजात मुलांमध्ये आढळते. शिशुमध्ये मानसिक मंदपणाचे लक्षण आढळते.
इतर लक्षणांमध्ये खालील बाबी समाविष्ट असतात:
- हायपोथायरॉईडीझम.
- वाढलेला थकवा.
- गॉइटर.
- मानसिक दुर्बलता.
- गर्भपात.
- केस गळणे.
- वंधत्व.
- कमकुवत रोगप्रतिकारशक्ती.
याची मुख्य कारणं काय आहेत?
- सेलेनियमच्या कमतरतेचे सर्वात सामान्य कारण अपूर्ण सेलेनियम असलेला आहार आहे, जेव्हा जमिनीत सेलेनियमचे प्रमाण कमी असलेल्या क्षेत्रांमध्ये खाद्यपदार्थ वाढतात तेव्हा सेलेनियमची कमतरता होते.
- क्रोन रोगामुळे किंवा एखादा भाग किंवा संपूर्ण पोटाच्या शस्त्रक्रियामुळे सेलेनियमयचे कमी प्रमाणात शोषण झाल्यामुळे सेलेनियमयची कमतरता देखील होऊ शकते.
- वृद्ध लोकांमध्ये सेलेनियमची अयोग्य शोषण अधिक सामान्य आहे.
- स्टेटिन्स आणि अमायनोग्लायकोसाइड्स सारखी औषधे घेतल्याने देखील सेलेनियमची कमतरता होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
सेलेनियमच्या कमतरतेचे निदान सामान्यत: तपशीलवार इतिहास आणि शारीरिक तपासणीनंतर केले जाते.
तुमचे डॉक्टर पुढील तपासण्याचा सल्ला देतील:
- थायरॉईड उत्तेजक हार्मोन मोजण्यासाठी रक्त चाचणी (हा हार्मोनचा उच्च स्तर सेलेनियम किंवा आयोडीनची कमतरता दर्शवणारा एक सांकेतांक आहे).
- सेलेनियम, ग्लूटाथिओन पेरॉक्साइड आणि सेलेनोप्रोटीन पातळी मोजण्यासाठी रक्त चाचणी.
सेलेनियमच्या कमतरतेच्या उपचारात आपल्या आहारात सेलेनियम समृद्ध खाद्य पदार्थांचा समावेश करणे आणि सेलेनियम सप्लीमेंट घेणे हे समाविष्ट आहे.
अनेक मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेटमध्ये देखील सेलेनियम असते.
सेलेनियम समृद्ध खाद्य पदार्थांमध्ये हे समाविष्ट आहे:
- सीफूड
- मांस
- अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ
- ब्रेड, अन्नधान्य, ओटमिल आणि इतर अन्नधान्य.