आंबट ढेकर म्हणजे काय?
पोटात गॅस अतिरिक्त प्रमाणात असल्याने येणाऱ्या सल्फरच्या ढेकरांना आंबट ढेकर म्हणतात. भरभर खाल्ल्याने, धूम्रपानामुळे किंवा च्युईंग गममुळे अतिरिक्त हवा आत गेल्याने हा गॅस होतो. गॅस साठी कारणीभूत काही खाद्यपदार्थांमुळे देखील गॅस होऊ शकतो.
याची चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
रिफ्लक्स च्या रोगाने ग्रासित रुग्णांना आंबट ढेकरचा त्रास होतो. यामुळे त्यांना छातीत जळजळ, पोट फुगणे, गॅस झाल्यासारखे वाटणे, फ्लॉटन्स, मळमळ आणि तोंडाचा घाण वास हे सारे अनुभव येतात. हेच याशी संबंधित लक्षणे देखील आहेत. जेवणानंतर आणि रात्री हा त्रास वाढतो. म्हणून झोपतांना वर होऊन झोपावे लागते.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
हायड्रोजन सल्फाइड गॅसच्या निर्मितीमुळे आंबट ढेकर येतात. तोंडात आणि पचनसंस्थेत बॅक्टेरिया खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया करतात आणि यामुळे हा गॅस बनतो.प्रथिन सम्रुद्ध खाद्यपदार्थ आणि ब्रोकोली सारख्या भाज्या आणि दारु हायड्रोजन सल्फाइड रिलीझ करतात. वारंवार होणाऱ्या आणि क्रोनिक आंबट ढेकरांचे इतर सामान्य कारणं गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स डिझीज(जीईआरडी) आणि इरिटेबल बाउल सिंड्रोम सारखे पचनाचे विकार आहेत. यामध्ये पोटातील गॅस वर फेकला जातो आणि वारंवार ढेकर येतात. याची इतर कारणं अन्नाची विषबाधा, काही औषधे, तणाव आणि गर्भधारणा आहेत.
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
लक्षणे आणि विस्तृत इतिहासावर आधारित आंबट ढेकरांचे निदान केले जाते. जीईआरडी ची शक्यता वगळायला एंडोस्कोपी केली जाऊ शकते.
या नकोश्या आणि त्रासदायक आंबट ढेकरांपासून मुक्ती मिळवायला आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे उपयुक्त ठरते. काही घरगुती उपायांनी आंबट ढेकरांचा त्रास कमी होऊ शकतो. पचनासाठी ग्रीन टी सर्वात जास्त उपयोगी असते. हे अँटीबॅक्टेरियल म्हणून पण कार्य करते. ॲपल सायडर व्हिनेगर असेच एक सुपर इंग्रिडियंट आहे. याने पण पचनसंस्था स्वस्थ राहते. यामुळे आंत्रातील बॅक्टेरियाची वाढ नियंत्रित राहते. ब्रोकोली, कडधान्य आणि लसणासारखे गॅस निर्माण करणारे पदार्थ टाळावे. धूम्रपान बंद करावे. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करावे.आंबट ढेकरांसाठी मुख्यतः कारणीभूत, कार्बोनेटेड पेयांचे आणि मद्याचे सेवन बंद करावे.
वरील उपचार निकामी झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. ते काही अँटासिड्स सुचवू शकतात ज्याने गॅसची निर्मिती कमी होते. लक्षणे कमी न झाल्यास आणखी काही पचनसंस्थेचे विकार आहेत का हे तपासायला ते काही चाचण्या सांगू शकतात.