पाठीच्या कण्याला दुखापत म्हणजे काय?
पाठीच्या कण्याला दुखापत म्हणजे पाठीच्या कण्यापासून निघणाऱ्या नसांना आघात किंवा दुखापत होय. अशा प्रकारची इजा सामान्यत: संवेदना मध्ये बदल घडवून आणते, स्नायूंची ताकद कमी करते आणि कधीकधी पक्षाघात होऊ शकतो. पडल्यामुळे, दुर्घटनेमुळे किंवा पाठीच्या हाडाला संसर्ग झाल्याने पाठीच्या कण्याला दुखापत होऊ शकते. दुखापत लहान असल्यास, रोगनिदान योग्यरीत्या झाल्यास ठीक आहे, पण दुखापत गंभीर असल्यास त्याचे कायमचे नुकसान होऊ शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
पाठीच्या कण्याच्या दुखापतीचे चिन्हे आणि लक्षणे दुखापतीची किंवा आघाताची जागा आणि ती किती मोठ्या प्रमाणावर आहे यावर अवलंबून असतात.
- पॅराप्लेजिया किंवा क्वाड्रिप्लेजिया - एक किंवा सर्व चार अवयवांना पक्षाघात.
- संवेदना गमावणे किंवा बदललेली संवेदना, विशेषतः गरम किंवा थंड स्पर्श.
- मूत्राशय किंवा आतड्यांचे नियंत्रण कमी होणे.
- हालचाल न होणे.
- प्रतिक्षिप्त क्रिया वाढणे किंवा कमी होणे.
- बदललेले लैंगिक कार्य.
- खोकणे आणि श्वास घेण्यात अडचण येणे.
गंभीर दुखापत दर्शविणारी चिन्हे आणि लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :
- असह्य पाठदुखी ज्यामुळे मान आणि डोक्याचे दुखणे वाढते.
- प्रभावित भागाला पक्षाघात.
- चालण्याची ढब आणि चालणे टिकवून ठेवण्यात अडचण.
- दुखापतीनंतर श्वास घेण्यात अडचण.
- मूत्राशय आणि आंत्र यावरील नियंत्रण कमी होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
पाठीचे मणके, दोन मणक्यांमधील डिक्स किंवा स्नायू आणि मणक्यांना आधार देणारे अस्थिबंध यांना क्षती पोहोचल्यास पाठीच्या कण्याचा विकार उद्भवू शकतो. या संरचनेला दुखापत संधीवात, जळजळ, संसर्ग, कॅन्सर किंवा डिस्क निकामी झाल्यामुळे होऊ शकते.
पाठीच्या कण्याला झालेल्या फ्रॅक्चर व्यतिरिक्त सूज, जळजळ, द्रव जमा होणे आणि पाठीच्या कण्याच्या आसपास रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते, ज्यामुळे पाठीच्या कण्यावर दाब पडतो. ही दुखापत पडणे, वाहनाचा अपघात, शारीरिक हिंसा, खेळांच्या दुखापती किंवा रोगांमुळे होऊ शकते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
पाठीच्या कण्याला दुखापतीला एक इमर्जन्सी म्हणून बघितले जाते, पाठीच्या कण्याला दुखापत झालेली जागा आणि दुखापतीची तीव्रता यांची सखोल वैद्यकीय तपासणी आणि प्रतिक्षिप्त क्रियांचे मूल्यांकन केले जाते. वैद्यकीय इतिहासाव्यतिरिक्त काही इमेजिंग पद्धतींची दुखापतीचा इतिहास तपासण्याकरिता मदत मिळते. या इमेजिंग पद्धतीमध्ये खालील बाबींचा समावेश होतो :
- एक्स-रे- फ्रॅक्चर, डिस्क हर्निनेशन इ. तपासण्यात मदत.
- सीटी स्कॅन - एक्स-रेवर एक स्पष्ट दृश्य मिळते आणि हाडे आणि डिस्कबद्दल कल्पना देते आणि व्हर्ट्रिबल कॉलमच्या हाडातील संक्रमण किंवा कॅन्सरची तपासणी करण्यात मदत करते.
- एमआरआय स्कॅन - ही सर्वात प्रगत पद्धत आणि तपासणीचा पर्याय आहे, कारण हाडे, स्नायू, आणि इंटरव्हर्ट्रिब्रल डिस्कचे स्पष्ट चित्र देते. हे कण्यावरचा दबाव निश्चित करण्यात मदत करते.
पाठीच्या कण्याच्या दुखापतीचे उपचार विकलांगता आणि वेदना आणि अस्वस्थता यांचे लक्षणे यावर लक्ष केंद्रित करते कारण पाठीच्या कण्याला होणारा त्रास कमी करण्यासाठी मर्यादित साधने आहेत.
गंभीर दुखापतींमध्ये खालील पद्धतींचा समावेश आहे:
- पाठीच्या कण्याच्या नसांचा दाह आणि सूज कमी करण्यासाठी औषधे.
- मणके स्थिर ठेवण्यासाठी उपचार
- मणक्यांची हाडं आणि अस्थिंची दुखापत दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया.
तीव्र दुखापतींसाठी उपचार पद्धती:
- औषधे - वेदना कमी करणारी काही औषधे, स्नायू विश्रांतीस कारणीभूत असतात आणि मूत्राशय आणि आंत्र नियंत्रण सुधारित करतात.
- फिजिकल थेरपी - याला पुनर्वसन उपचार म्हणून देखील ओळखले जाते, याचा वापर दुखापतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि अंगाच्या गमावलेल्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासाठी केला जातो. यासाठी अनेक आधुनिक तंत्रांचा वापर केला जातो, ज्यामध्ये खालील समाविष्ट आहेत:
- इलेक्ट्रिक मज्जातंतू उत्तेजित करणे.
- रोबोट गेट ट्रेनिंग.
- आधुनिक विद्युत व्हीलचेअर्सचा वापर.