मान अकडणे म्हणजे काय?
मान अकडणे म्हणजे दुसरे काही नसून मानेच्या संरचनेत आलेला अवघडलेपणा आहे. जर योग्यवेळी काळजी घेतली नाही तर, यामुळे मानेच्या हालचालींमध्ये वेदना आणि अडचण येऊ शकते. अकड मुख्यत्वे करून मानेचे आकुंचन पावल्यामुळे येते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मान अकडल्यामुळे तुमच्या मानेत वेदना होतात, ज्यामुळे मान वळवणे अवघड होते. एखादा मज्जातंतू संकुचित झाला असल्यास, त्याच्या परिणामस्वरूप बाहु आणि हाताला मुंग्या येणे, बधिरता आणि अशक्तपणा अनुभवला जाऊ शकतो.
याची मुख्य कारणं काय आहेत?
तुम्ही दररोज करत असलेल्या क्रियांना मानेच्या अकड्याकरिता सामान्यपणे जबाबदार धरले जाऊ शकते. यामध्ये लॅपटॉप किंवा मोबाईल फोनवर सतत काम करणे, बसण्याची चुकीची पद्धत, सतत मान खालीच ठेवणे, जड वस्तू उचलणे इत्यादी समाविष्ट आहेत. या सर्व क्रियांमुळे तुमच्या मानेवर ताण पडतो आणि दीर्घ काळापर्यंत असुविधाजनक स्थितीत राहणे भाग पडते. इतर महत्वाचे घटक म्हणजे मानसिक ताण ज्यामुळे मानेच्या स्नायूंमध्ये तणाव निर्माण होतो आणि दीर्घकाळ टिकून राहतो. खेळतांना दुखापत आणि दुर्घटना ही देखील मान अकडण्याची काही सामान्य कारणं आहेत. सर्व्हाईकल स्पॉन्डीलायसिस, टोर्टिकोलिस आणि फायब्रोमायल्जीया यासारख्या काही वैद्यकीय परिस्थितींमध्येदेखील मान अकडते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
लक्षणांवर आधारित, तुमचे डॉक्टर तुमची मान तपासतील आणि तुम्हाला होत असलेल्या त्रासाची तीव्रता बघण्यासाठी तुमच्या हालचाली तपासतील. साधारणतः स्कॅनची आवश्यकता नसते.
उपचारांमध्ये स्नायू शिथिल करणारी औषधं, वेदनाशामक आणि आवश्यक असल्यास अँटी-इंफ्लेमेटरी समाविष्ट असतात.
घरगुती उपचार आणि स्वत:ची काळजी करण्याचे उपाय अतिशय उपयुक्त आहेत आणि केले पाहिजे. यात हे समाविष्ट आहेत:
- दिवसात 10-15 मिनिटे गरम आणि थंड असे दोन्ही शेक देणे.
- लक्षण पूर्णपणे जात नाही तोपर्यंत मानेला संपूर्ण विश्रांती देणे आणि व्यायाम करणे.
- अकडणे कमी करण्यासाठी सौम्य मालिश केली जाऊ शकते.
- कडक गादीवर झोपल्याने मानेला चांगला आधार मिळतो आणि अकडण्यापासून मुक्तता मिळते.
तुमच्या जीवनशैलीत काही किरकोळ बदल केल्यास मानेचे अकडणे प्रतिबंधित केले जाऊ शकते, जसे की:
- तुमचे लॅपटॉप आणि मोबाईल फोनवर काम करण्याची वेळ मर्यादित करणे.
- तुमच्या खुर्चीची उंची ॲड्जस्ट करणे, जेणेकरून संगणक तुमच्या डोळ्याच्या पातळीवर असेल.
- सतत एकाच स्थितीत न राहता वारंवार ब्रेक घेणे किंवा स्थिती बदलणे.
- नियमित व्यायाम आणि बसण्याची योग्य स्थिती ठेवणे.