सारांश
भय म्हणून आपल्या समोर आलेल्या कशाचाही सामना करण्यासाठीची यंत्रणा म्हणजे मानसिक तणाव आहे. तणाव हा भयाला दिलेला ‘लढा किंवा पळा’ प्रतिसाद आहे आणि व्यक्तीला समोर उभ्या ठाकलेल्या घटनेस किंवा उत्तेजक अवस्थेस देता यावी अशी प्रतीक्रिया ठरवण्यात मदत करतो. आपल्या कर्तबगारीच्या सीमा आणि क्षमता जाणून घेण्यासाठी कही प्रमाणात तणाव असणे आवश्यक आहे. तथापी, अतिरिक्त प्रमाणातील तणाव लोकांना त्रासदायक आहे आणि व्यक्ती कोलमडू शकतात. तणाव अंतर्गत, बाह्य किंवा दोन्हींच्या संयुक्त कारणांनी येतो. पारिवारिक मतभेद, व्यावसायिक व शैक्षणिक दबाव, आणि पैसा हे बाह्य कारणांमधे समाविष्ट आहेत. कमी आत्म-सन्मान, नकरात्मक मानसिकता, आणि ताठरपणा ही अंतर्गत कारणे आहेत. हा कुठल्याही पुढीलपैकी कुठल्या एका रुपात वाढू शकतो जसे –तीव्र तणाव, क्षणिक तीव्र ताण, किंवा दीर्घकालीन तणाव. प्रत्येक चरणात भिन्न लक्षणे दिसत असली तरी कही सर्वसाधारण घटकांमधे अतिरिक्त घाम येणे, विचारांमधे स्पष्टता नसणे, स्व-संभ्रम, राग येणे आणि भिती वाटणे.उत्तेजीत करणाऱ्या घटकांना ओळखणे व सतर्क राहणे आणि सुद्रुढ विकल्प शोधणे या दोन महत्वाच्या सुत्रांनी तणाव टळू शकतो.परिस्थितीचे निदान करण्यासाठी काही चाचण्या आणि तपासण्या आहेत, तरी पात्र व्यावसायिकांसोबत विस्तृत चर्चा केल्याने सर्वात योग्य निदान होते. उपचारांमध्ये औषधोपचार, समुपदेशन, व वैकल्पिक निवारण आणि जीवनशैलीतील फेरबदल यांचा संयुक्त समावेश आहे.