सनबर्न काय आहे?
सूर्याच्या अल्ट्राव्हायलेट (यूव्ही) किरणांच्या अतिसंपर्कात आल्यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर लालसरपणा आणि जळजळ होऊ शकते याला सनबर्न म्हणतात. बराच वेळ सूर्यकिरणांत असणाऱ्या व्यक्तींमध्ये हे सामान्य आहे.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- उन्हामुळे त्वचेवरील सनबर्नचे पहिले लक्षण खाजेसह लाली आहे.
- यामुळे प्रभावित क्षेत्रावर वेदना, अस्वस्थता आणि जळजळ होण्याची शक्यता असते.
- बरेचदा, प्रभावित भागात आपल्याला फोड आणि एडिमा (द्रव जमा होण्यामुळे सूज) होऊ शकतो.
- फोड त्वचेच्या अंतर्भागाच्या खोलपर्यंत असू शकतात. ते पाण्याने भरलेले असतात आणि बऱ्याचदा वेदनादायक असतात.
- इतर लक्षणांमध्ये ताप, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश आहे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
सनबर्नचे प्रमुख कारण बराच वेळ युव्ही रेडिएशनचा संपर्क हे आहे. सूर्याव्यतिरिक्त, युव्ही किरणांचे इतर स्रोत कृत्रिम दिवे असू शकतात.
धोक्याच्या घटकांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत :
- ओझोनचा थर पातळ किंवा कमी असलेल्या भागात राहणा-या लोकांना सनबर्नचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो.
- मध्यमवयीन आणि किशोरवयीन व्यक्तींच्या तुलनेत लहान मुले व वृद्धांना सनबर्नचा त्रास होण्याचा धोका जास्त असतो.
- पातळ त्वचेचा थर असलेल्या व्यक्तींना सनबर्न विकार होण्याचा जास्त धोका असतो कारण त्यांच्या त्वचेवर मेलेनिन नसल्यामुळे त्यांची सूर्यकिरणात राहण्याची क्षमता मर्यादित असते.
- दुर्मिळपणे, एखाद्या अनुवांशिक स्थितीमुळे एखाद्या व्यक्तीला सनबर्न विकार होण्याची शक्यता असते. या स्थितीला झिरोडर्मा पिगमेंटोसम म्हणतात.
- सल्फा औषधे, डायफेनहायड्रॅमिन, प्रोमेथेझिन, एमिट्रिप्टाईन ही आणि यासारखी इतर काही औषध घेणाऱ्या व्यक्तींना सनबर्नचा धोका जास्त असतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- सनबर्न एक वैद्यकीयदृष्ट्या सुस्पष्ट त्रास आहे, म्हणून निदानात मुख्यत: ॲलर्जी, फोटो-ॲलर्जी आणि फोटो-टॉक्सिसिटी प्रतिक्रिया यासारखे इतर त्वचेचे विकार नसल्याचे तपासले जाते.
- सूर्यप्रकाशाचा संपर्क संपला की बहुतेक वेळा सनबर्न काही आठवड्यांमध्ये सहजपणे बरा होतो.
- जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी अँटी इन्फ्लेमेटरी औषधे मदत करतात. ॲस्पिरिनसारखे औषध देखील निर्धारित केली जाऊ शकतात.
- लालसरपणा कमी करण्यासाठी मॉइस्चराइजिंग क्रीम, जेल आणि थंड शॉवर याची शिफारस केली जाते.
- सनबर्नमुळे त्वचेतून बऱ्याच प्रमाणात पाणी शरीरातून फेकले जाते म्हणून रुग्णाला पुरेसे हायड्रेट / सजलीत राहण्यास सांगितले जाते.