सूज येणे - Swelling (Edema) in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

January 27, 2019

April 27, 2023

सूज येणे
सूज येणे

सारांश

ओडेमा एक अवस्था आहे. या अवस्थेत शरिराच्या तंतूंमध्ये तरळ पदार्थाचे अत्यधिक संचय होऊ शकते. सुजलेल्या तंतूवरील त्वचा गरम, मऊ व ताणलेली अशी होते. ओडेमा या अवस्थेत सामान्यतः हात व पाय (पेरिफेरल ओडेमा) यांचा समावेश असतो, तथापी शरिराचे इतर भागही सामील असू शकतात. त्यांच्या भोवतीचे तंतू व डोळे ही पॅपिलेडेमा आणि मॅक्युलर ओडेमामध्ये प्रभावित होतात, एसायटीसमध्ये पोट, अनासार्कामध्ये संपूर्ण शरीर, एंजिओडेमा मध्ये त्वचा व म्युकस मेंब्रेन (सामान्यतः घसा, चेहरा, ओठ आणि जिभेतील), पल्मनरी ओडेमामध्ये फुफ्फुसे आणि सेरेब्रल ओडेमामध्ये मेंदू. हात आणि पायांमध्ये होणारा पेरिफेरल ओडेमा, सामान्यतः रक्तसंचारातील एक दोष (व्हेनल इन्सफिशिअंसी), कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युर, मूत्रपिंडातील समस्या, रक्तातील सेरम प्रथिनांमध्ये घट, यकृताचे आहार, फुफ्फुसांतील विकार आणि लिंफ प्रणालीला झालेल्या क्षतीमुळे (लिंफेडेमा) होते.

ओडेमा अंतर्निहित आरोग्य व्यवस्थेप्रमाणें शरिराच्या एक किंवा दोन्ही बाजूंमध्ये होतो. पेरिफेरल ओडेमा गरोदरपणा, मासिक धर्म आणि मौखिक गर्भनिरोधक गोळ्यांच्या प्रदीर्घ वापरादरम्यान स्त्रियांमध्ये सामान्यपणें आढळते. प्रदीर्घ काळापासून रक्तक्षय आणि थायरॉड ग्रंथी विकार असलेल्या लोकांमध्येही ते सामान्य आहे. काही औषधे उदा. अवसादशामक, कॅल्शिअम चॅनल ब्लॉकर (उच्च रक्तदाबासाठी) आणि स्टेरॉयड्स यांमुळेही पेरिफेरल ओडेमा होतो. अंतर्निहित कारणानुसार, ओडेमा लहान किंवा मोठ्या काळावधीसाठी टिकतो. अंतर्निहित कारणाच्या व्यवस्थापनात अंतर्निहित कारणावरील उपचार पहिला टप्पा आहे. इतर उपायांमध्ये, स्टॉकिंग्झचे वापर, वजन कमी करणें, पडतांना पाय उभारीच्या स्थितीत ठेवणें  आणि कमी मिठाचे आहार घेणें सामील आहे.

सूज येणे ची लक्षणे - Symptoms of Swelling in Marathi

ओडेमाच्या प्रगतीबरोबर काही लक्षणे शरिरात दिसतात. उदा. :

  • पाय किंवा प्रभावित भाग सुजतात किंवा भुसभुशीत होतात.
  • सुजलेल्या भागातील त्वचेचे रंग बदलते.
  • आपण किंवा इतर कुणी बोटाने दाबल्याने, ओडेमा असलेले भाग खडा किंवा डेंट दाखवते (पिटिंग ओडेमा) . अधिकतर प्रकरणांमध्ये, लिंफोडेमा सोडून, ओडेमामध्ये असे दिसते, जो कर्करोग, विकिरण पद्धतीमुळे लिंफ नोड्सना क्षती आणि थायरॉयड विकार (मायक्सोडेमा हायपोथायरॉयडिझममुळे) .
  • प्रभावित शरिराचा भाग जड जाणवतो आणि सांध्यांवरही प्रभाव पडलेले असल्यास, हलण्यास अडचण होते.
  • शरिराच्या सुजलेल्या भागावरील त्वचा गरम आणि ताण पडलेली होते. सामान्य ओडेमामध्ये, तुम्हाला कपडे घालणें असहज होऊ शकते.
  • रक्तनलिका किंवा व्हॅरिकोझ नलिका यांमधील थक्क्यामुळे असलेल्या ओडेमामध्ये, प्रभावित पाय मऊ आणि वेदनामय होतो.
  • श्वसनहीनता ओडेमाशी निगडीत एक लक्षण आहे, जे हृदय निकामी पडणें मूत्रपिंडविकार, यकृतातील समस्या किंवा फुफ्फुसांतील विकारामुळे होतो.
  • सामान्य ओडेमामध्ये तुमचे वजनही वाढते.
ADEL 33 Apo-Oedem Drop
₹225  ₹250  10% OFF
BUY NOW

सूज येणे चा उपचार - Treatment of Swelling in Marathi

ओडेमावरील उपचार व व्यवस्थापन अंतर्निहित कारणामुळे होत असून, खालील रणनीती आखल्या जाऊ शकतात:

  • विशेष करून पडले असतांना, उभारीच्या स्थितीमध्ये पायांना ठेवणें आणि कॉंप्रेशन व स्टॉकिंग्झ वापरल्याने प्रारंभिक टप्प्यातील ओडेमा कमी होण्यास थोडी मदत होते. प्लाक बनल्यामुळे (एथेरोस्क्लेरोसिस यामुळे) कडक किंवा अरुंद पायाच्या नलिका असलेल्या लोकांना डॉक्टर स्टॉकिंग्झ लावणें टाळतात. अशा प्रकरणांमध्ये, न्युमॅटिक कंप्रेशन डिव्हाइस नावाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरून थक्के होणें टाळले जाते. पायातील क्षता (अल्सर), जळलेले असल्यास किंवा पेरिफेरल रक्तवाहिनी विकार असल्यास न्युमॅटिक उपकरण कॉंट्राइंडिकेट केले जाते. हे तेथील तंतूंना पिळते आणि नलिकांच्या मधून रक्तसंचारास योग्य तो वाव देऊन, रक्ताचे थक्के होणें पुष्कळ टाळते.
  • व्हेनस इंसफिनिशिअंसीसह कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युर असे असल्यास, डाययुरेटिक औषधे ही वापरली जातात, ज्यांमुळे लघवीची वारंवारता वाढते आणि  शरिरातील अतिरिक्त पाणी निचरा होऊन निघते.
  • व्हेनस इंसफिशिअंसीमध्ये होणार्र्या ओडेमामध्ये त्वचेची काळजी एक महत्त्वाचे घटक आहे. मॉश्चराइझिंग क्रीम आणि सौम्य कॉर्टिकोस्टेरॉयड ऑयंटमेंट, सुजलेल्या भागावरील त्वचेचा कोरडेपणा व दाह कमी करतात.
  • डीप वेन थ्रोंबोसिस हा आजार थक्का रोखणारी औषधे उदा. हेपॅरिन किंवा व्हारफेरिन यांच्या वापराने बरा केला जातो. असाध्य व्हेनस इंसफिशिअंसी (रक्तनलिकांतील कमतरता) आणि डीप वेन थ्रोंबोसिस हा रोग असलेल्या रुग्णांमध्ये रक्ताचे थक्के बनण्यापासून रोखण्यासाठी स्टॉकिंग्झ आणि बॅंडेज वापरले जातात.
  • लिंफेडेमामध्ये, रक्ताभिसरणास वाव देणें व लिंफ वाहिनीमधील अडसर नष्ट करणें यासाठी फिझिओथेरपी ही उपचारपद्धत, बाह्य मसाज आणि बॅंडेज यांचा वापर करून ओडेमा कमी केला जातो. लिंफेडेमा या आजारामध्ये ओडेमा बहुतांश कमी करण्यासाठी न्युमॅटिक कंप्रेशन उपकरण हे अधिक प्रभावी असते. लिंफेडेमा या रोगाचे विविध प्रकारचे उपचार  व उपायांना प्रतिसाद न दिल्यास, सर्जिकल डिबल्किंग (अडसर झालेले लिंफ वाहिनी बायपास करण्यासाठी शस्त्रक्रिया) केली जाते.
  • औषधमूलक ओडेमा यामध्ये, एसीई इन्हिबिटर या नावाची औषधे तुमचे डॉक्टर कॅल्शिअम चॅनल ब्लॉकरच्या ऐवजी वापरतात उच्च रक्तदाबाचे उपचार केले जाते, ज्यामुळे दोन्ही पायांमध्ये ओडेमा होतो.
  • प्रथिन क्षतीस कारणीभूत असणारे यकृतातील आजार, मूत्रपिंडाच्या समस्या आणि आतडीच्या विकारांमुळे होणार्र्या ओडेमावरील उपचार प्रथिनांचे इंजेक्शन, प्रारंभिक चरणांमध्ये पाणी व मीठ घेणें कमी करणें आणि डाययुरेटिक्स यांद्वारे केले जाते.
  • स्लीप एप्निआ यामुळे झालेला ओडेमा वजन कमी करणें आणि निरंतर सकारात्मक वायुदाब उपकरण (सीपीएपी) वापरल्याने कमी होतो आणि फुफ्फुसे बळावतात.
  • अज्ञात कारणामुळे पायात झालेला ओडेमा (आयडिओपॅथिक ओडेमा) आल्डोरेस्टोन एंटस्टनिस्ट ही औषधे आणि जीवनशैली बदलांद्वारे बरा केला जातो.
  • इजामुळे झालेल्या ओडेमामध्ये, वेदना व सुजेत आराम मिळावा म्हणून सिस्टमिक स्टॅरॉयड आणि ट्रायसायकलिक एंटिडेप्रेसेंट औषधे वापरली जातात.

जीवनशैली व्यवस्थापन

सोपी पावले उचलल्याने दिवसागणिक ओडेमा यावर फरक पडतो:

  • आहारात मीठ व साखर याचे वापर कमी केल्याने ओडेमा आणि शरिरातील पाण्याचे संचय कमी होण्यास मदत होते.
  • चालणें, जॉगिंग, लेग रेझ आणि इतर व्यायामांमुळे रक्ताभिसरण सुधारून, ओडेमा कमी होण्यास मदत होते.
  •  नियमित मसाज करून घेतल्याने रक्ताभिसरण सुधारून, हृदयाकडील रक्तसंचार वाढतो.
  • वजनवाढीचे निवारण व नियंत्रण यासाठी निरोगी व संतुलित आहार घ्या.
  • धूम्रपान व मद्यपान टाळा.
  • दर सहा महिन्यांनी संपूर्ण शारीरिक तपासणी करवून घेऊन कोणत्याही आजारांची शक्यता टाळवून घ्या.
SBL Arnica Ointment
₹64  ₹75  14% OFF
BUY NOW


संदर्भ

  1. InformedHealth.org [Internet]. Cologne, Germany: Institute for Quality and Efficiency in Health Care (IQWiG); 2006-. Causes and signs of edema. 2008 Nov 5 [Updated 2016 Dec 30].
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Foot, leg, and ankle swelling
  3. OMICS International [Internet]; Edema
  4. Huffman MD, Prabhakaran D. Heart failure: epidemiology and prevention in India. . Natl Med J India 2010; 23:283-8. PMID: 21250584
  5. Varma PP. Prevalence of chronic kidney disease in India - Where are we heading? . Indian J Nephrol 2015; 25:133–135. PMID: 26060360
  6. Natarjan K. Practical approach to pedal edema. Association of Physicians of India. Chapter 72. [Internet]
  7. Sabesan S, Vanamail P, Raju K, Jambulingam P. Lymphatic filariasis in India: Epidemiology and control measures. J Postgrad Med, 2010; 56:232-8. PMID: 20739779
  8. Ciocon JO, Fernandez BB, Ciocon DG. Leg edema:clinical clues to the differential diagnosis. Geriatrics 1993; 48:34–40, 45. PMID: 7695655
  9. National Health Service [internet]. UK; Swollen ankles, feet and legs (oedema)
  10. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Swelling
  11. Belcaro G, Cesarone MR, Shah SS, et al. Prevention of edema, flight microangiopathy and venous thrombosis in long flights with elastic stockings. A randomized trial: The LONFLIT 4 Concorde Edema-SSL Study. . Angiology. 2002 Nov;53(6):635-45. PMID: 12463616
  12. Ochalek K, Pacyga K, Curyło M, Frydrych-Szymonik A, Szygula Z. Risk Factors Related to Lower Limb Edema, Compression, and Physical Activity During Pregnancy: A Retrospective Study. Lymphat Res Biol. 2017 Jun;15(2):166-171. Epub 2017 Mar 27. PMID: 28346850
  13. National Health Service [Internet]. UK; Prevention - Lymphoedema.
  14. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Edema. Harvard University, Cambridge, Massachusetts.
  15. TRAYES KP, STUDDIFORD JS, PICKLE S, TULLY AS, Am Fam Physician. 2013 Jul 15;88(2):102-110. [Internet] American Academy of Family Physicians; Edema: Diagnosis and Management.
  16. Johns Hopkins Medicine [Internet]. The Johns Hopkins University, The Johns Hopkins Hospital, and Johns Hopkins Health System; DVT Prevention: Intermittent Pneumatic Compression Devices
  17. Aboussouan LS, Ricaurte B, Theerakittikul T. Noninvasive positive pressure ventilation for stable outpatients: CPAP and beyond. Cleveland Clinic Journal of Medicine. 2010 October;77(10):705-714. [Internet]
  18. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Lymphedema . Harvard University, Cambridge, Massachusetts.
  19. National Eczema Association [Internet]; Stasis Dermatitis

सूज येणे साठी औषधे

Medicines listed below are available for सूज येणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.