स्वाइन फ्लू म्हणजे काय?
स्वाइन फ्लू हा एक प्रकारचा विषाणू आहे जो सामान्यत: डुकरांना प्रभावित करतो परंतु माणसांना देखील जगभर प्रभावित केले होते.
हा एच1एन1 व्हायरस म्हणूनही ओळखला जातो आणि एक प्रकारचा इन्फ्लूएंजा व्हायरस आहे.
याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- स्वाइन फ्लूमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात आणि हा अत्यंत सांसर्गिक असतो.
- श्वासोच्छवासाच्या प्रणालीवर सर्वात जास्त प्रभाव होतो व वाहते नाक, घश्यात खवखव होणे आणि गंभीर खोकला असे त्रास होतात.
- संसर्गामुळे ताप, अशक्तपणा आणि थकवा येतो.भूक कमी होऊ शकते.
- इतर लक्षणे जसे डोळे जळजळणे किंवा डोळ्यांना पाणी येणे ही आहेत.
- स्वाईन फ्लू ग्रस्त व्यक्तीला ओटीपोटात वेदना, मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात.
याचे मुख्य कारणं काय आहेत?
- एच1एन1 व्हायरसच्या संसर्गाला स्वाइन फ्लू म्हणतात कारण हे डुकरांना प्रभावित करणाऱ्या व्हायरस सारखेच आहे. या व्हायरसमध्ये मनुष्य, पक्षी आणि डुकर यांना प्रभावित करणारे उपद्रव/ स्ट्रेन्स आहेत.
- व्हायरस असलेल्या हवेमध्ये श्वास घेतल्याते हे विषाणू प्राण्यांमध्ये पसरतात.
- व्हायरस असलेल्या हवेमध्ये श्वास घेतल्याने हा व्हायरस मनुष्यांना प्रभावित करतो.
- याचा अर्थ असा आहे की पोल्ट्री कामगारांना स्वाइन फ्लूचा जास्त धोका असतो.
- जेव्हा स्वाइन फ्लूची महामारी पसरली होती तेव्हा त्या व्हायरसविरूद्ध रोग प्रतिकारशक्ती नसल्यामुळे मनुष्यांना त्वरीत संसर्ग झाला.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- जर तुम्हाला फ्लूसारखी लक्षणे असतील आणि जर स्वाइन फ्लूची शंका असेल तर डॉक्टर निदानादरम्यान स्वाईन फ्लू साठी तपासणी करतील.
- स्वाइन फ्लूच्या निदानाची पुष्टी करण्याकरिता नाकातून किंवा घश्यातून स्वाब घेऊन त्याची सूक्ष्मदृष्ट्या तपासणी केली जाते.
- काही इतर आण्विक चाचणी आणि रॅपिड इन्फ्लूएंझा डायग्नोस्टिक चाचण्या आहेत, परंतु ते पूर्णपणे पुष्टी करू शकत नाही.
उपचार
- या आजाराने ग्रस्त रुग्णांना अँटीव्हायरल औषधे दिली जातात.
- बहुतेक प्रकरणांमध्ये व्हायरस वेगाने पसरत असल्याने हॉस्पिटलायझेशन आणि अलगावाची शिफारस केली जाते.
- जर विषाणू विशिष्ट औषधांना प्रतिकार दर्शवत असतील तर इतर प्रकारची अँटीव्हायरल औषधे दिली जातात.
- या व्हायरसविरूद्ध लस तयार केली आहे आणि ती अत्यंत प्रभावी आहे. हा व्हायरस पोल्ट्री आणि मनुष्यांमध्ये आगीसारखा पसरू शकतो त्यामुळे महामारी दरम्यान लसीकरण, विशेषतः मुलांमध्ये, वृद्ध आणि गर्भवती महिलांमध्ये, महत्वाचे आहे.