टेस्टिक्युलर कॅन्सर - Testicular Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 03, 2019

March 06, 2020

टेस्टिक्युलर कॅन्सर
टेस्टिक्युलर कॅन्सर

टेस्टिक्युलर कॅन्सर काय आहे?

टेस्टीज (टेस्टिकल्स) हा पुरुषांचे पुनरुत्पादक अवयव आहे, जो शुक्राणुंचे उत्पादन करतो आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्रवतो. टेस्टिक्युलर कर्करोग हा एक दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर आहे. तो 15 ते 45 वर्षांच्या वयोगटातील पुरुषांना मुख्यतः प्रभावित करतो. यामुळे सुरक्षित क्षेत्रात वेदनाहीन गाठी होतात. या कॅन्सरचा उपचार केला जाऊ शकतो आणि त्याचा यशाचा दरही खूप जास्त आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

टेस्टिक्युलर कॅन्सरचे चिन्हे आणि लक्षणे स्क्रोटल भागामध्ये बदलणाऱ्या तणाव आणि होणाऱ्या सूज तसेच टेस्टोस्टेरोन हार्मोनच्या जास्त उत्पादनामुळे उद्भवतात. या लक्षणांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

  • एक किंवा दोन्ही टेस्टिकल्सला गाठ किंवा सूज.
  • स्क्रोटममध्ये जडत्वाची संवेदना.
  • स्क्रोटल भागात द्रवाचा संग्रह.
  • स्क्रोटममध्ये वेदना किंवा अस्वस्थता.
  • ओटीपोटात कळा.
  • पाठीच्या खालच्या भागात वेदना.
  • स्तनामध्ये अल्वारपणा किंवा वाढ.

याची मुख्य कारणं काय आहेत?

टेस्टिक्युलर कॅन्सरचे अचूक कारण अस्पष्ट आहे, परंतु असे बरेच पूर्वसूचक किंवा धोकादायक घटक आहेत जे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला टेस्टिक्युलर कॅन्सर होऊ शकतो. या धोक्याच्या  घटकांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

  • टेस्टिक्युलर वाढीत असामान्यता - क्लिन्फेल्टर सिंड्रोम नावाच्या जेनेटिक डिसऑर्डरमध्ये पाहिल्या गेलेल्या टेस्टीजचा अयोग्य किंवा असामान्य विकासामुळे टेस्टिक्युलर कॅन्सर होऊ शकतो.
  • अंडिसेन्डेड टेस्टिस (क्रिप्टोर्चिडिझम) - गर्भाच्या जीवनादरम्यान, टेस्टीज हे ओटीपोटापासून डोक्यापर्यंत खाली उतरतात, पण काही बाबतीत हे कधीही होत नाही आणि टेस्टीज पोटातच राहतात.
  • टेस्टीजच्या कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास.
  • वय - 15-45 वयोगटातील व्यक्ती टेस्टिक्युलर कॅन्सरला बळी पडण्याची शक्यता अधिक असते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

शारीरिक तपासणीसह, संपूर्ण वैद्यकीय इतिहास,हे टेस्टिक्युलर कॅन्सरच्या निदानाच्या दिशेने इशारा करू शकतो, पण निदानाची खात्री करण्यासाठी आणि रोगाचा उपचार निश्चित करण्यासाठी आणखी काही तपासण्या अनिवार्य आहे. यात खालील तपासण्यांचा समावेश होतो:

  • रक्त तपासणी - अल्फा-फेरोप्रोटीन, बीटा एचसीजी आणि लॅक्टेट डिहायड्रोजिनेजसारखे ट्यूमर मार्कर्स टेस्टिक्युलर कर्करोगाचे निदान करण्यात मदत करू शकतात.
  • सोनोग्राफी - स्क्रोटल भागाचे अल्ट्रासाऊंड मूल्यमापन कॅन्सरचा प्रसार किती प्रमाणात झाला आहे निश्चित करण्यात आणि गाठीचा प्रकार निश्चित करण्यात मदत करते.
  • सीटी स्कॅन - कॅन्सरचा प्रसार किती प्रमाणात झाला आहे हे ठरविण्यात मदत करते.
  • हिस्टोपाथोलॉजी - ट्यूमरची गाठ काढल्यानंतर, कॅन्सरच्या प्रकाराचे मूल्यांकन करण्यासाठी सूक्ष्मदर्शकाखाली त्याची तपासणी केली जाते.

आवश्यक उपचार आणि त्याचा कालावधी पूर्णपणे कॅन्सरचा टप्पा आणि प्रकारावर अवलंबून असतो.  कधीकधी, संपूर्ण आरोग्याची स्थिती आणि रुग्णाची प्राधान्ये देखील उपचार पद्धतीची निवड प्रभावित करतात. उपचार पर्यायांमध्ये खालील समाविष्ट आहेत:

  • शस्त्रक्रिया (ऑर्किडेक्टोमी) - प्रभावित लिम्फ नोड्स (लोको-प्रादेशिक नोड्स) काढून टाकण्याबरोबरच प्रभावित टेस्टिकल्स देखील शल्यक्रिया काढून टाकणे आदर्श उपचार आहे. हा उपचार सहसा कॅन्सरचा पूर्ण नायनाट करतो.
  • रेडिएशन थेरेपी - कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी उच्च ऊर्जा एक्स-रे बीमचा वापर केला जातो, पण रेडिएशन थेरपीचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि ती केवळ विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्येच उपयुक्त आहेत.
  • किमोथेरपी - किमोथेरपी एजंट कॅन्सरच्या पेशींचा नाश करण्यात मदत करतात. उरलेल्या कॅन्सरच्या पेशी काढण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर हे नेहमी वापरले जाते. त्याचे अनेक साइड इफेक्ट्स देखील आहेत.

 

 



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Testicular cancer.
  2. American Society of Clinical Oncology [Internet] Virginia, United States; Testicular Cancer: Symptoms and Signs
  3. Canadian Cancer Society. Testicular cancer. [Internet]
  4. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; Testicular Cancer.
  5. Cancer Research UK. Testicular cancer. [Internet]

टेस्टिक्युलर कॅन्सर साठी औषधे

Medicines listed below are available for टेस्टिक्युलर कॅन्सर. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.