सारांश
जागतिक स्तरावर दातदुखी ही मौखीक दंतचिकित्सेतील सर्वाधीक प्रमणात अढळणारी अवस्था आहे. या विशिष्ट परिस्थितीत, दात दुखणे म्हणजे काही अप्रिय भावनांचा असा अनुभव आहे जो काही उत्तेजकांमूळे सुरू होतो आणि केंद्रीय मज्जासंस्था प्रणालीतील विशिष्ट पेशींवरून प्रसारित केला जातो. यात कमीअधीक प्रमाणात अस्वस्थता, वेदना आणि यातना या संवेदना समविष्ट आहेत. दातांचे आजार, दातांतील पोकळी किंवा दातांच्या जखमांमुळे दातदुखी होऊ शकते. दातदुखीची उपचारपद्धती दोन स्तरांवर आहे, प्रथम निदान केले जाते व नंतर त्या आजाराचे निवारण आणि उपचार केले जातात. दातदुखी सामान्यतः, 2 ते 3 दिवसांत मौखीक स्वच्छता ठेवल्याने आणि दातांवरील आवश्यक प्रक्रीयांसोबत औषधोपचार केल्याने बरी होते.