व्हिटॅमिन के ची कमतरता म्हणजे काय?
व्हिटॅमिन के एक चरबीत- विरघळणारा व्हिटॅमिन आहे, म्हणजे मानवी शरीरात त्याचे शोषण करण्यासाठी चरबी आवश्यक आहे. व्हिटॉमिन के दोन स्वरूपात आढळते, उदा. व्हिटॅमिन के 1 (फायलोक्वीनोन), जे वनस्पती स्त्रोतापासून मिळते आणि के 2 (मेनक्विनोन), जे आतड्यां मध्ये सहजपणे संश्लेषित केले जाते. फायलोक्विन्स हे व्हिटॅमिन के चे प्रमुख आहार स्त्रोत आहे, हे सामान्यतः हिरव्या पालेभाज्या जसे पालक, ब्रोकोली आणि कोबीमध्ये आढळते. मेनाक्विनोन सामान्यत: विशिष्ट पशु पदार्थ आणि किण्वित पदार्थांमध्ये सापडते. ते मुळात फरमेंट करणाऱ्या जिवाणूद्वारे उत्पादित केले जाते आणि बहुतेक लोकांमध्ये पुरेश्या प्रमाणात आतड्यात तयार केले जाते.
व्हिटॅमिन के, शरीरातील रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असणारे, महत्वपूर्ण प्रोटीन्स तयार करते. व्हिटॅमिन केची कमतरता असल्यास शरीरात हे प्रोटिन्स बनत नाही ज्यामुळे रक्तस्रावाचा धोखा असतो.
याचे चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
याची काही चिन्हे आणि लक्षणे खाली दिली आहेत:
- खूप जास्त रक्तस्त्राव.
- लगेच जखम होणे.
- नखांमध्ये रक्तस्त्राव.
- अन्ननलिके मधून रक्तस्त्राव.
- निस्तेजपणा आणि अशक्तपणा.
- गडद किंवा रक्त असलेले मल.
- लघवीतून रक्त येणे.
- हाड कमकुवत होणे.
- पुरळ.
- हृदयाचे ठोके वाढणे.
याची कारणं काय आहेत?
व्हिटॅमिन केची कमतरता कोणत्याही वयात होऊ शकते पण नवजात बालकांना जास्त धोका असतो. व्हिटॅमिन के च्या कमतरतेची इतर कारणे खालील प्रमाणे आहेत:
- कुपोषण.
- यकृताचे रोग.
- अपर्याप्त आहार.
- चरबी शोषणात असमर्थता.
- अँटीकोआग्युलंट्स आणि संसर्गाचा उपचार करणारे औषधे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
व्हिटॅमिन केच्या कमतरतेचे कारण शोधण्यासाठी रुग्णाचा इतिहास जाणून घेतला जातो. रक्तस्रावाची वेळ ओळखण्यासाठी कोआग्युलेशन चाचणी केली जाते. व्हिटॅमिन केच्या कमतरतेच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी केलेल्या इतर चाचण्या जसे प्रोथ्रॉम्बिन टाईम, ब्लीडींग टाईम, क्लॉटिंग टाईम आणि सक्रिय आंशिक प्रोथ्रॉम्बिन टाइम केल्या जातात.
उपचार पद्धतींमध्ये हे समाविष्ट आहे
- व्हिटॅमिन के चे तोंडी किंवा इंजेक्शन चे सप्लिमेंट्स.
- व्हिटॅमिन के-युक्त आहार घेणे जसे हिरव्या पालेभाज्या, मोहरी, कोबी आणि ब्रोकोली.