उघडी जखम - Open Wound in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

April 26, 2019

March 06, 2020

उघडी जखम
उघडी जखम

उघडी जखम काय आहे?

जेव्हा त्वचा फाटून उघडी पडते आणि आतील टिश्यू पर्यावरणात उघडे पडतात तेव्हा त्या जखमेला उघडी जखम असे म्हणले जाते. याचा परिणाम म्हणून, जखमांमधून रक्तस्त्राव होतो आणि त्या संक्रमणास बळी पडतात. बहुतेक उघड्या जखमा त्वचेच्या पृष्ठभागावर होतात आणि किरकोळ असतात. काही जखमा गंभीर असतात आणि त्यांचा खोल टिश्यूं, जसे नसा, रक्तवाहिन्या आणि स्नायू वर परिणाम होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

उघड्या जखमांची मुख्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:

 • वेदनादायक जखमा.
 • सौम्य किंवा गंभीर रक्तस्त्राव.
 • त्वचेच्या जखमी भागाचा रंग निळसर किंवा लालसर होणे.
 • प्रभावित भागाचे कार्य कमी होणे.
 • जळजळ होणे.

याची मुख्य कारणे काय आहेत?

उघड्या जखमांची मुख्य कारणे आणि परिणामी जखमांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत:

 • जेव्हा त्वचा पृष्ठभागावर घासली जाते किंवा खरचटते, तेव्हा त्या किरकोळ जखमेला घर्षण म्हणतात.
 • टक्कर किंवा दुर्घटनांमध्ये एखाद्या वस्तूसह संपर्कात आल्यास खोलवर कापले जाते याला लॅसीरेशन म्हणतात.
 • चाकू किंवा स्केलपेल सारख्या तीक्ष्ण वस्तूने कापल्या गेलेल्या त्वचेला, उघड जखमेचा एक रेषीय प्रकार म्हणजेच इन्सीशन म्हणतात.
 • नखे, सुई किंवा दात (प्राणी किंवा माणसाच्या चावण्यामुळे) यासारख्या धारदार निमुळते टोक असलेल्या वस्तूंच्या संपर्कात आल्यामुळे उद्भवलेल्या जखमेला पंचर जखम असे म्हणतात.
 • एखाद्या वस्तूमुळे जेव्हा त्वचा खूप फाटते, जसे की बुलेट, तेव्हा गंभीर उघडी जखम होते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

खुल्या जखमेची शारीरिक तपासणी डॉक्टरांना जखमेचे आकलन करण्यास मदत करते आणि त्यानुसार योग्य उपचार केले जातात.

उघड्या जखमेच्या उपचारांसाठी पुढील पद्धती वापरल्या जातात:

 • जर जखमेतून रक्तस्त्राव होत असेल, तर थोडा दाब देऊन स्वच्छ पट्टी वापरून रक्तस्त्राव थांबविला जातो.
 • एखाद्या वस्तूमुळे, जर जखम झाली असेल तर ती जखमेतून काढून जखम धुतली जाते, पाण्याने धुतली जाते आणि जखमेमधील उर्वरित अवशेष काढण्यासाठी जखमेचे निर्जंतुकीकरण करून काढले जाते, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
 • जखमेवर अँटीबायोटिक मलमांचा पातळ थर लावला जातो.
 • घाव बंद करण्यासाठी स्टेपल्स, निर्जंतुक पट्टीचे ड्रेसिंग, टाके किंवा त्वचेवर चिकटणाऱ्या बँडचा वापर केला जाऊ शकतो.
 • शेवटच्या लसीकरणानंतर पाच वर्षापेक्षा जास्त काळ झाला असल्यास टिटॅनस शॉट दिला जातो, विशेषतः जर जखम दूषित असेल किंवा प्राणी किंवा माणसाच्या चावण्यामुळे झाली असेल.संदर्भ

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Cuts and puncture wounds
 2. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Wounds - how to care for them
 3. Department of Health. Care of open wounds, cuts and grazes. State Government of Victoria [Internet]
 4. Rúben F. Pereira, Paulo J. Bártolo. Traditional Therapies for Skin Wound Healing . Adv Wound Care (New Rochelle). 2016 May 1; 5(5): 208–229. PMID: 27134765
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; How wounds heal
 6. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Emergency Wound Management for Healthcare Professionals

उघडी जखम साठी औषधे

Medicines listed below are available for उघडी जखम. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.