झिंकची कमतरता म्हणजे काय?
झिंक हा एक महत्वाचा खनिज आहे जो आपल्याला अन्न आणि आहाराच्या पूरकांमधून मिळतो. हा शरीराचे प्रोटीन आणि डीएनए संश्लेषण, गर्भधारणा आणि बाल्यावस्थेत वाढ आणि विकास, गंध आणि चवीची योग्य जाण, जखम भरून येणे आणि प्रतिकारशक्ती यासारख्या विविध कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. शरीरात झिंक साठवून ठेवण्याची प्रणाली नसल्यामुळे पुरेशा प्रमाणात झिंक नियमितपणे घेणे आवश्यक आहे. शरीरात झिंकची कमी झालेली मात्रा आणि ते कमी प्रमाणात घेतले जाणे यालाच झिंकची कमतरता असे म्हटले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
झिंकच्या कमतरतेची सामान्य लक्षणं खालील प्रमाणे आहेत:
- भूक कमी होणे.
- वाढ मंदावणे.
- प्रतिकारशक्ती कमी होणे.
दुर्मिळ आणि गंभीर कमतरतेत ही लक्षणं दिसून येतात:
- अतिसार.
- केसांची गळती.
- वंधत्व.
- उशिरा तारुण्य येणे.
- त्वचा आणि डोळ्यात दोष.
- पुरुषांमध्ये हायपोगोनॅडिझम.
इतर लक्षणे जसे की जखम बरी होण्यास उशीर लागणे, वजन कमी होणे, सुस्तपणा आणि चवीचे ज्ञान कमी होणे हे देखील झिंकच्या कमतरतेशी संबंधित असू शकतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
झिंकची कमतरता असण्याची ही मुख्य कारणे आहेत :
- झिंकचे अपूर्ण सेवन.
- अयोग्य शोषण.
- शरीराची वाढलेली झिंकची गरज.
- खूप प्रमाणात शरीरातून होणारी झिंकची हानी.
खालील घटक झिंकची कमतरता वाढवितात:
- योग्य आहार न घेणे.
- मद्यपान.
- गॅस्ट्रोइंटेस्टीनल रोग जसे क्रॉन्स रोग, अल्सरेटिव्ह कोलायटिस, आतड्यात जळजळीची लक्षणे, उष्णकटिबंधीय स्प्रू, ज्यात अन्नातील झिंकचे शोषण कमी होते.
- गर्भधारणा आणि स्तनपान यादरम्यान झिंकची गरज वाढलेली असते.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
झिंकची गंभीर कमतरता ओळखण्यासाठी रक्त तपासणीत रक्तातील झिंकचा स्तर पाहिला जातो. क्षारीय फॉस्फेटेस एंझाइम आणि अल्ब्युमिनचा स्तर देखील झिंकच्या कमतरतेचे निदान करण्यात मदत करतात.
झिंकच्या कमतरतेला झिंकची पुनर्स्थापना हा मुख्य उपचार आहे. झिंकच्या पुरकाचा डोज अंतर्निहित कारणांवर अवलंबून असतो.
झिंकच्या कमतरतामुळे निर्माण झालेल्या त्वचेच्या विकृतींचा उपचार मॉइस्चरायझर आणि टोपिकल स्टेरॉईड्सचा वापर करुन केला जाऊ शकत नाही.
आहारात झिंकची मात्रा वाढविणे देखील स्थितीच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरू शकते. कालव/शिंपला, लाल मांस, चिकन, दाणे, कडधान्य, संपूर्ण धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ यात शरीराची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसे झिंक असते.