पोटात कळ येणे म्हणजे काय?
पोटात कळ येणे ही छातीच्या खाली आणि पेल्विक क्षेत्राच्या वरच्या भागात होणारी एक वेदना आहे. जेव्हा स्नायू संकुचित होतात तेव्हा वेदना होतात. क्रॅम्प्स खूप सामान्य आहेत आणि यांचा प्रत्येकाने त्याच्या आयुष्यात किमान एकदातरी अनुभव घेतला असतो. त्यांची तीव्रता व वारंवारता मूळ कारणांवर अवलंबून असते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
- कळाशी संबंधित सौम्य लक्षणे
- अपचन आणि जेवतांना अस्वस्थता जाणवणे.
- बद्धकोष्ठता किंवा अतिसार.
- ढेकर येणे आणि पोटात फुगणे किंवा पोट गॅस.
- छातीत जळजळ किंवा पित्त आणि उलट्या.
- ताप, आल्यास मायक्रोबियल संसर्गाचा धोका असू शकतो.
- पोटात कळ येण्याची गंभीर लक्षणे
- वेदनादायक लघवी आणि आतड्यांची हालचाल.
- लघवी किंवा विष्ठा मध्ये रक्त.
- अतिसार (शरीरात पाण्याची कमतरता).
- भूक न लागणे आणि वजन कमी होणे.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
कळ ही पोट, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड किंवा पोटात असलेल्या इतर अवयवाशी निगडित अंतर्गत वैद्यकीय स्थितीमुळे येते. याचा परिणाम हलक्या संक्रमणापासून कर्करोगा सारख्या अधिक गंभीर आजारांपर्यंत असू शकतो. खालील सामान्य कारणांमुळे सुद्धा कळ येऊ शकते:
- अन्नातील विषबाधे मुळे पोटात संसर्ग किंवा सूज येणे.
- उलट्या आणि गॅस्ट्रोइसोफेगल रीफ्लक्स रोग (एक आजार ज्यामध्ये पोटातील अन्न परत अन्ननलिके मध्ये प्रवेश करतं).
- मासिक पाळीच्या वेदना.
- लॅक्टोज इनटॉलरंस (लॅक्टोज किंवा दूधातील साखर न पचवता येणे).
- मुतखडा किंवा पित्ताचे खडे.
- इरीटेबल बाउल सिंड्रिम (आतड्यांना सूज येणे).
- आन्त्रपुच्छाचा रोग/अपेंडिक्स.
- जठराचा किंवा पोटाचा अल्सर.
- कोलॉन किंवा पोटाचा कर्करोग.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
योग्य उपचार करण्यासाठी कळ येण्याच्या कारणाचे निदान होणे आवश्यक आहे. कळ येण्याचे कारण, तीव्रता, वेदनांची पुनरावृत्ती आणि इतर लक्षणांच्या आधारावर तुमचे डॉक्टर मुख्य कारणांपर्यंत पोहचतात.
खालील तपासण्यांद्वारे निदान केले जाऊ शकते:
- रक्त तपासणी करुन संसर्गाचे निदान करणे.
- लघवी आणि मल चाचणी करुन त्यामधील सूक्ष्म जिवाणू, रक्त, पस आणि इतर तपासणी करणे.
- पित्ताच्या खड्यांची किंवा मुतखड्याची तपासणी करण्यासाठी पोटाचा एक्स-रे काढणे.
- एंडोस्कोपी करुन पोट किंवा लहान आतड्यांमध्ये काही अडथळा आहे का हे तपासणे.
- कोलॉनोस्कोपी करुन कोलॉन ची तपासणी करणे.
- संगणकीकृत टोमोग्राफी किंवा सीटी स्कॅन.
- अल्ट्रासाऊंड.
काही कारणास्तव कळ येण्याच्या उपचारांमध्ये खूप वेगवेगळे असतात आणि त्यात खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
- संसर्ग किंवा सूज यासाठी डॉक्टर आपल्याला औषधे देतील आणि आहार बदलण्यास सांगतील.
- जर एखाद्या अवयवामध्ये ब्लॉकेज असेल तर मग शस्त्रक्रिया करुन तो काढण्यात येतो.
- कर्करोगाच्या उपचारासाठी शस्त्रक्रिये सोबत किमोथेरपी आणि रेडिओथेरपी याचा वापर करावा लागू शकतो.ते कर्करोग कुठे होतो आणि किती पसरतो यावर अवलंबून असतं.
पोटातील कळेसाठी स्वत:हून घ्यायची काळजी
जरी कारणांप्रमाणे उपचार बदलत असतील तरी काही सोप्या टीप्स आहेत ज्या आपला त्रास कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. जसे की:
- पित्तवर्धक आणि मसालेदार खाणे टाळा. यामुळे पोटात आणि लहान आतड्यांमधील जळजळ वाढते.
- भरपूर पाणी प्या तसेच भरपूर प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करा. पण, गॅस निर्माण करणारे कार्बोनेटेड पेय टाळा.
- झोपण्यापूर्वी पचायला जड असलेलं खाऊ नका. झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवण करा म्हणजे तेवढ्या वेळेत जेवण पचेल.
- पोटाचा अवघड व्यायाम टाळा.