टक्कल पडणे म्हणजे काय?
टक्कल पडणे, जे अलोपेशियाचे दुसरे नाव आहे, म्हणजे डोक्यावरील त्वचेपासून (टाळू) केस गळणे. थोड्याफार प्रमाणात केस गळणे ही बऱ्याच लोकांमध्ये अगदी सामान्य बाब आहे कारण ते पुन्हा उगवतात. पण जसजसे वय वाढते परिस्थिती अशीच राहात नाही.
तारुण्यानंतर दोन्ही लिंगांमध्ये (स्त्री-पुरुषांमध्ये) ठराविक पद्धतीने केसगळती दिसून येते. पस्तिशीच्या सुरुवातीला दोन तृतीयांश पुरुषांना टक्कल पडते तर 40% (पुरुषांमध्ये) केसगळती लक्षणीय असते. भारतामध्ये, 0.7% लोकसंख्येची टक्कल पडते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
टक्कल पडण्यास कारणीभूत असलेल्या घटकांनुसार ते निरनिराळ्या स्वरुपात दिसू शकते. यामुळे अचानक अथवा मंदगतीने टक्कल पडू शकते आणि तुमच्या डोक्याची त्वचा (टाळू) किंवा पूर्ण शरीरावर परिणाम करू शकते. ते तात्पुरते अथवा कायमस्वरूपी असू शकते.
प्रमुख चिन्हे आणि लक्षणांमध्ये यांचा समावेश होतो:
- केसांचा वाढता पातळपणा.
- टाळूवरचे केस मंदगतीने कमकुवत होणे.
- गोलाकार किंवा ठिगळासारखे डाग.
- अचानक केस गळणे.
- संपूर्ण केस गळणे.
- डोक्यावरील त्वचेच्या भागात खपली पडल्यासारखे डाग.
याची मुख्य कारणे काय आहे?
हे आनुवंशिक असू शकते किंवा याची बाधा होऊ शकते. पुरुषांच्या केस गळती संदर्भात अँड्रोजेनेटिक अलोपेशिया (95 % हून अधिक ) सर्वात सामान्य कारण आहे.
- आनुवंशिकता
- हे कौटुंबिक आहे आणि वयानुसार निर्माण होते तसेचयाचा अगोदर अंदाज येतो
- हार्मोन्समधील बदल आणि वैद्यकीय परिस्थिती
- गरोदरपणा, रजोनिवृत्ती, थायरॉइड विकार आणि डोक्यावरील त्वचेला झालेले संक्रमण (इन्फेक्शन) हे केसगळतीसाठी कारणीभूत असू शकतात
- औषधांमुळे
- कर्करोग, सांधेदुखी/संधिवात, डिप्रेशन/नैराश्य, संधिरोग यांसाठी वापरली जाणारी औषधे तसेच रक्तदाबाच्या समस्येमुळे टक्कल निर्माण होऊ शकते
- रेडिएशन उपचार पद्धती
- हानिकारक किरणोत्सर्जनाला सामोरे गेल्याने परिणाम कायमस्वरूपी केसगळती होऊ शकते
- ताण /तणाव
- ताण/तणाव तसेच भावनिक किंवा शारीरिक धक्का केसगळतीसाठी कारणीभूत ठरू शकतात
- केसांचे उपचार
- केस घट्ट बांधणे किंवा कॉर्नरोज यासारख्या केशरचनामुळे ट्रॅक्शन अलोपेशिया होऊ शकतो
- पोषणाची कमतरता
- अत्यावश्यक अमिनो आम्लाच्या विशेषतः लायसिनच्या कमतरतेमुळे टक्कल पडू शकते
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
पुरुषी टक्कलाचे दर्शनी स्वरूप आणि केसगळतीचा नमुना (प्रकार) तसेच वैद्यकीय इतिहास यावरून निदान केले जाते. हॅमिल्टन - नॉरवूड वर्गीकरण प्रणालीच्या वापर करून याचे वर्गीकरण केले जाते तर स्त्री टक्कलाचे लुडविग प्रणालीचा वापर करून वर्गीकरण केले जाते. डोक्यावरील त्वचेला जखमेचे व्रण असतील तर तुम्हाला त्वचारोगतज्ञाकडे पाठवले जाऊ शकते. चट्टेविरहित अलोपेशियामध्ये जखमेचा एक छोटासा नमुना बुरशीजन्य संक्रमणाच्या (फंगल इन्फेक्शन) चाचणीसाठी घेतला जाऊ शकतो. नंतर, कोणतेही स्पष्ट कारण न आढळल्यास डोक्यावरील त्वचेची बायोप्सी केली जाऊ शकते. विस्कळीत स्वरूपाच्या केस गळतीमध्ये, तुम्हाला सेरम फेरिटीन आणि थायरॉईड चाचण्या घेण्यास सांगितले जाऊ शकते.
उपचार
- केसांच्या पुनरुत्पादनासाठी प्रामुख्याने 5-अल्फा रिडक्टेज इन्हिबिटर्स चा वापर केला जातो. बहुसंख्य उत्पादनांमध्ये त्याचा कोरडेपणाविरोधी (अँटी फ्रीझ) गुणधर्मामुळे सर्प तेल वापरले जाते.
- ताणतणाव दूर केल्यास केस पुन्हा वाढण्यास मदत होऊ शकते.
- लेझर उपचार पद्धती केसांच्या वाढीला उत्तेजन देते आणि याचे चांगले परिणाम दिसले आहेत.
- शस्त्रक्रियेनेसुद्धा केस गळती भरून काढता येते.
- केसांचा गुणाकार (हेअर मल्टिप्लिकेशन) करुन, ज्यामध्ये सेल्फ रिप्लेनेशिंग फॉलिसील स्टेम सेल्स प्रयोगशाळेत वाढवणे आणि ते डोक्यावरील त्वचेमध्ये इंजेक्ट करणे, याचा अंतर्भाव होतो, केस पुन्हा उगवण्यास मदत होते.
- केसांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक पौष्टिक घटक, जसे कि अत्यावश्यक अमिनो ऍसिड आणि इतर सूक्ष्म पौष्टिक घटक, घेतले जाऊ शकतात.
स्वतःची काळजी घेण्यासाठी टिपा:
- ट्रायकोलॉजिस्टसोबत सल्लामसलत करून तुमची केसांसाठी वापरली जाणारी उत्पादने बदला.
- गरम शॉवर घेणे टाळा कारण ते डोक्याच्या त्वचेवरील अत्यावश्यक तेल धुवून टाकते.
- केसांच्या तेलाने डोक्याच्या त्वचेला मसाज करा.
- प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) करून घ्या.
- धूम्रपान सोडा आणि ताण तणाव टाळा.
- रक्ताभिसरण सुधारण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा.
- रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि वाढीला उत्तेजन देण्यासाठी केस रुंद कंगव्याने नियमित विंचरावेत.
केवळ औषधोपचार नव्हे तर जीवनशैलीतील परिवर्तनसुद्धा अधिक चांगले परिणाम देऊ शकतात तसेच सध्या असलेल्या केसांचे अजून हानी किंवा नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकतात.