मधमाशी चावणे म्हणजे काय?
बी स्टिंग, म्हणजे सोप्या शब्दात मधमाशी चावणे. हे अत्यंत त्रासदायक असू शकते. इतर किड्यांच्या तुलनेत मधमाशी चावल्यामुळे जास्त दुःख होतं कारण ते ॲसिडिक असतात, आणि त्यामुळे शरीर त्यांच्यावर वेगळी प्रतिक्रिया देते.
जर एखाद्या व्यक्तीला भूतकाळात मधमाशी चावल्यामुळे ॲलर्जी झाली असेल, तर ती जीव-घेणी ठरू शकते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मधमाशी चावल्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया होऊ शकतात किंवा एकाच व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या वेळी विविध प्रतिक्रिया होऊ शकतात. प्रतिक्रियांचे वर्गीकरण साधारणपणे सौम्य, माध्यम आणि तीव्र असे केले जाते.
- सौम्य प्रतिक्रिया एका दिवसात बऱ्या होतात.
- जिथे चावल्या गेले आहे तिथे जळजळणे आणि दुखणे.
- लाल होणे आणि थोडे सूजणे.
- मध्यम प्रतिक्रिया जवळपास एका आठवड्यात बऱ्या होतात.
- सूज हळूहळू वाढणे.
- काही दिवस सतत लाल राहणे.
- तीव्र प्रतिक्रिया म्हणजे ॲनाफिलेक्टिक प्रतिक्रिया जीवघेण्या असू शकतात आणि वैद्यकीय इमर्जन्सी मानली जातात, त्वरित उपचार आवश्यक आहेत.
याची मुख्य कारणं काय आहेत?
- जेव्हा एखाद्या व्यक्तीला मधमाशी चावते, तेव्हा तिचा डंख त्वचेमध्ये विष सोडतो. यामुळे वेदना होतात आणि सूज येते.
- जे व्यक्ती मधमाशीच्या पोळाभोवती राहतात किंवा मधमाशांवर काम करतात त्यांना मधमाशी चावण्याची शक्यता जास्त असते.
- भूतकाळात मधमाशी चावलेल्या व्यक्तीला अधिक गंभीर प्रतिक्रिया होण्याचा धोका असतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
- आपणास मधमाशी चावल्यास, तुम्ही मधमाशीच्या विषाला ॲलर्जीक आहात का हे तपासण्यासाठी टेस्ट केली जाते. यामध्ये खालील चाचण्या समाविष्ट आहे:
- आयजीई अँटीबॉडी नावाच्या विशिष्ट अँटीबॉडीजची पातळी तपासण्यासाठी रक्त तपासणी.
- एक स्किन पॅच टेस्ट, ज्यामध्ये थोडेसे विष इंजेक्ट करून आपण काय प्रतिक्रिया देता हे बघितले जाते.
- जर प्रतिक्रिया सौम्य असेल तर, विष कमी करण्यासाठी डंख काढणे आणि नंतर स्टेरॉईड क्रीम लावणे आवश्यक असते. अँन्डिहिस्टामाइन्स देखील कोल्ड कंप्रेससह, वापरली जाऊ शकतात.
- अधिक तीव्र प्रतिक्रियांमध्ये, ॲनाफिलेक्सिससाठी त्वरित उपचार आवश्यक आहे, ज्यामध्ये इपाइनफ्राइन इंजेक्शन, पूरक ऑक्सिजन आणि इंट्राव्हेनस फ्लुइड देणे समाविष्ट आहे. ॲनाफिलेक्सिसला वैद्यकीय इमर्जन्सी मानली जाते आणि त्वरित उपचार करणे आवश्यक आहे.