मेंदुला मार लागणे - Brain Injury in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

November 28, 2018

July 31, 2020

मेंदुला मार लागणे
मेंदुला मार लागणे

मेंदुला मार लागणे म्हणजे काय?

मेंदूला मार लागणे म्हणजे कुठल्याही अशा प्रकारची दुखापत ज्यामध्ये मेंदूच्या पेशी नाश होतात किंवा त्यांची हानी होते. असे बाहेरून इजा झाल्यामुळे किंवा अंतर्गत विकारांमुळे होऊ शकते. मेंदू हे सर्व शरीराच्या हालचालींचे  नियंत्रण केंद्र आहे म्हणून मेंदूला झालेली कोणतीही दुखापत शरीराच्या कार्यावर परिणाम करू शकते. मेंदूची इजा जन्मापासून (जन्मतः) असू शकते किंवा नंतर झालेली असू शकते. दुखापतीच्या तीव्रतेवर ती सौम्य,मध्यम किंवा गंभीर असू शकते, आणि कधी कधी जीव-घेणी देखील असू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मेंदूच्या इजेचे चिन्हे आणि लक्षणे इजा कुठे झाली आहे त्यावर अवलंबून असतात. ही लक्षणे व्यापकपणे मानसिक, वर्तनात्मक, संवेदनशील आणि शारीरिक स्वरूपात वर्गीकृत केले जाऊ शकतात.

मानसिक लक्षणे अशी आहेत:

  • आकलनशक्ती कमी होणे.
  • विचार करण्यात आणि व्यक्त करण्यात अडचण.
  • लक्ष न लागणे.
  • निर्णय घेता न येणे.
  • स्मरणशक्ती कमी होणे.

वर्तनात्मक लक्षणे ही आहेत:

  • चिडचिडेपणा.
  • संताप आणि आक्रमकता.
  • ताण सहन करण्याची क्षमता कमी होणे.
  • आळशीपणा.
  • सदृश भावना.

संवेदनशील लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:

  • बघण्यात, ऐकण्यात आणि स्पर्श करण्यात वेगळेपणा जाणवणे.
  • आजूबाजूचा परिसर, काळ किंवा आपण स्वत: कोण आहोत हे कळू न शकणे.
  • चवीत आणि वास समजण्यात बदल होणे.
  • तोल जाणे.
  • दुःख सहन करण्याची क्षमता कमी होणे.

शारीरिक लक्षणे अशी आहेत :

याची मुख्य कारणं काय आहेत?

जेव्हा मेंदूला ऑक्सिजन मिळणे बंद होते तेव्हा मेंदूला मार लागतो, परिणामी ब्रेन हायपॉक्सिया (टिशू मध्ये ऑक्सिजन ची कमतरता) होतो. ह्याची कारणं बाह्य आणि अंतर्गत अशी वर्गीकृत केली जातात.

बाह्य (त्रासदायक) इजा होण्याची  कारणे अशी आहेत:

  • पडणे.
  • वाहनावरून पडून दुखापत.
  • खेळताना दुखापत.
  • डोक्यावर आघात होणे.

अंतर्गत इजा होण्याची कारणे अशी आहेत:

  • स्ट्रोक.
  • ट्यूमर.
  • अनिरीसिम (मेंदूतील रक्तवाहिन्यामध्ये विकृती).
  • संसर्ग.
  • विषबाधा.
  • औषधांचा दुरुपयोग.
  • न्यूरोलॉजिक आजार.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

मेंदूला मार लागल्याचे निदान क्लिनिकल हिस्टरी आणि शारीरिक तपासणीच्या मदतीने होते. पण, दुखापतीची वाढ, तीव्रता आणि पूर्वनिदान जाणून घेण्यासाठी काही तपासण्या अनिवार्य आहे. या चाचण्या अशा आहेत:

  • कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅन: मेंदूला मार लागल्याचा संशय येताच आधी रेडियोलॉजिकल चाचणी केली जाते. हे स्कल फ्रॅक्चर, रक्तस्त्राव, हेमेटोमा आणि टिशूंची सूज शोधण्यात मदत करते.
  • मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅनः सीटी स्कॅनच्या तुलनेत ही चाचणी अधिक फायदेशीर असते आणि अचूक निर्णय देते. ही मेंदू आणि त्याच्या विविध भागांचा विस्तृत तपशील देते.

डॉक्टर मेंदूला लागलेल्या माराचे मूल्यांकन करण्यासाठी ग्लासगो कोमा स्केलचा वापर करतात. उच्च स्कोअर कमी गंभीर जखम दर्शवतात, तर कमी स्कोअर गंभीर जखमा दर्शवतात.

मेंदूच्या दुखापतीचे उपचार प्रामुख्याने त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. सौम्य दुखापतीत सामान्यतः केवळ लक्षणांचे निरिक्षण करावे लागते आणि त्याला कोणत्याही उपचारांची आवश्यकता नसते. तर, मध्यम आणि तीव्र दुखापतींना औषधोपचारापासून शस्त्रक्रियेपर्यंत जलद उपचार आवश्यक असतात.

मेंदूला मार लागल्यास ही औषधे दिली जातात:

  • अँटी-सीझर औषधे - झटके किंवा दौरे येणे ही मेंदूला मार लागल्यास होणारे नेहमीची लक्षणे आहे आणि ते मेंदूसाठी आणखी हानिकारक ठरु शकतात. म्हणून, अँटी-सीझर औषधे उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात मदत करतात.
  • डाययुरेटिक्स- काही दुखापतींमध्ये मेंदूभोवती सूज येते. डाययुरेटिक्स सूज कमी करून दबाव कमी करण्यास मदत करतात.
  • कोमा-प्रेरित करणारे औषधे- जेव्हा मेंदू स्वत:चा उपचार करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो अतिरिक्त ऑक्सिजन वापरण्यास सुरुवात करतो. पण, रक्तवाहिन्या संकुचित झाल्यास किंवा खराब झाल्यास, त्यास पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही आणि परिणामी मेंदूच्या पेशींना आणखी दुखापत होते आणि त्यांचा नाश होऊ शकतो. हे टाळण्यासाठी, कोमा-प्रेरित करणारे औषधे वापरली जातात ज्याने ऑक्सिजनची आवश्यकता कमी होते आणि मेंदूच्या पेशी कार्यरत होतात.

मेंदूला मार लागल्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये अनेक प्रक्रिया असतात , काही सामान्य प्रक्रिया अशा आहेत:

  • स्कल फ्रॅक्चर ठिक करणे
  • मेंदूतून गोठलेले रक्त (ब्लड क्लॉट) काढणे
  • रक्तस्त्राव थांबविण्यासाठी टाके देणे
  • दबाव कमी करण्यासाठी स्कल मध्ये एक छिद्र तयार करणे

शस्त्रक्रिया आणि औषधांशिवाय, मेंदू आणि ज्या अवयवांवर परिणाम झाला आहे त्यांचे कार्य सुधारण्यासाठी पुनर्वसन करणे आवश्यक आहे. पुनर्वसनामध्ये फिजियोथेरपी, ऑक्युपेश्नल थेरपी, काऊनसेलिंग आणि रीक्रियेश्नलथेरपी समाविष्ट असते.



संदर्भ

  1. American Speech-Language-Hearing Association. Traumatic Brain Injury (TBI). Maryland, United States. [internet].
  2. Alzheimer's Association. Traumatic Brain Injury (TBI). Chicago, IL. [internet].
  3. Centre for Health Informatics. [Internet]. National Institute of Health and Family Welfare Traumatic Brain Injury & Concussion
  4. Centre for Health Informatics. [Internet]. National Institute of Health and Family Welfare Recovery from Concussion
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Symptoms of Traumatic Brain Injury (TBI)

मेंदुला मार लागणे साठी औषधे

Medicines listed below are available for मेंदुला मार लागणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹120.0

Showing 1 to 0 of 1 entries