सेरेब्रल मलेरिया काय आहे?
सेरेब्रल मलेरिया (सीएमCM), मलेरियाचे एक गंभीर कॉम्प्लिकेशन आहे. हा एक न्यूरोलॉजिकल सिंड्रोम आहे, जो फीट आणि कोमा द्वारे ओळखला जातो. हे मुख्यतः मलेरिया-प्रवण भागात राहणा-या लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये पाहिले जाते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सीएम (CM) हा डास चाव्याल्यावर 2 आठवड्यानंतर आणि 2 ते 7 दिवसांच्या तापानंतर होऊ शकतो. असामान्य वर्तन, असंतुष्ट चेतना, एपिलेप्टिक फीट, कोमा आणि इतर न्यूरोलॉजिकल लक्षणांद्वारे याची ओळख होते. असे आढळून आले आहे की 14 पैकी 6 मुलांमध्ये सेरेब्रल व्हॉल्यूम वाढलेले असते. सीएम (CM) मुळे मुलांच्या हालचालीत दोष, बोलण्यात अडथडा, बहिरेपणा आणि अंधत्व यासारखे दोष उद्भवू शकतात.चिन्हे आणि लक्षणे याप्रकारे असतात:
- फीट येणे.
- रेटिनोपॅथी.
- देहभान बदललेली परिस्थिती.
- डोक्यात वाढलेला दाब आणि सूज.
- डोकेदुखी.
- पाठदुखी.
- मळमळ.
- उलट्या.
न्यूरोलॉजिकल वैशिष्ट्ये तीव्र मेटॅबॉलिक एसिडोसिस (शरीराच्या द्रवपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आम्ल ) कमी हिमोग्लोबिन आणि कमी झालेली शुगर लेव्हल्सची संबंधित असतात.
याची मुख्य कारणं काय आहेत?
याचा प्रसार मादी ॲनोफिलस डासाच्या चाव्यामुळे होतो. प्लाझ्मोडियमच्या चार प्रजाती या संसर्गासाठी जबाबदार आहेत, ज्यातील पी. फाल्सीपेरम हा सर्वात गंभीर संसर्गआहे. संसर्गित रक्त पेशींमुळे मेंदूतील लहान रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो त्यामुळे सीएम (CM) होतो. ज्यामुळे मेंदूला सूज येते आणि शेवटी मेंदूचे नुकसान होते.
ब्लड ब्रेन बॅरिअर (बीबीबी-BBB), जो मेंदुतील पदार्थांना विदेशी पदार्थांपासून संरक्षित करतो, तुटतो आणि फायब्रिनोजेनचा वाहु लागतू. त्यामुळे व्यक्ती कोमा मधे जाऊ शकतो. न्यूरोलॉजिकल क्ऑम्प्लिकेशनच्या इतर कारणांमध्ये हे समाविष्ट आहे:
- उच्च-श्रेणीचा ताप.
- मलेरियारोधी औषधे.
- कमी झालेली साखरेची पातळी.
- कमी झालेली सोडिअम ची पातळी.
- अत्यंत कमी हिमोग्लोबिनची पातळी.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
मलेरिया-प्रवण भागात कोणत्याही अलीकडील प्रवास इतिहासासह आणि शारीरिक तपासणीसह डॉक्टर वैद्यकीय इतिहास घेतात. इस्केमियाशी संबंधित क्षेत्र शोधण्यासाठी इमेजिंग केली जाऊ शकते.
- कंप्युटेड टोमोग्राफी (सीटी-CT)स्कॅन: हे सामान्यः वापरले जाते, पण काही वैशिष्ट्ये पाहिल्या जाऊशकतात, जसे की
- सेरेब्रल एडीमा.
- इंफार्ट्स मुळे थॅलेमिक हायपोअटिनिन्युएशन.
- सेरेबेलर व्हाईट मॅटर हायपोएटिनिन्युएशन.
- मॅग्नेटिक रेसोनान्स इमेजिंग(MRI): रोगाची प्रगती समजण्यासाठी.
- लंबर पँचर: चेतनेच्या बदललेल्या पातळीसोबत फेब्रियल सिंड्रोमची इतर कारणं वगळणे.
सीएम(CM) हे एक गंभीर कॉम्प्लिकेशन आहे आणि त्यासाठी त्वरित वैद्यकीय लक्षाची गरज आहे.उपचारामधे मुख्यतः समावेश होतो:
- मलेरिया ची औषधी- प्रतिरोध टाळण्यासाठी मोनोथेरपी किंवा संयोजन थेरपी.
- इलेक्ट्रोलाइट असंतुलन सुधारण्यासाठी एजंट.
- फिटरोधी औषधांचा रोगलक्षणानुसार वापर.
- स्टेरॉइड डेरिव्हेटिव्ह्ज.
- इतर न्यूरोलॉजिकल कॉम्पिकेशन्स सुधारणे.
- ऑक्सिजन थेरेपी श्वसनाच्या आपदेपासून मदत करू शकते.
स्वतःची-काळजी टिप्स मधे समावेश होतो:
- लक्षणांची लवकर ओळख संसर्गचक्र खंडित करू शकते.
- दीर्घकाळापर्यंतचा ताप कमी होत मदत होत नसेल तर ताप औषधांचा अनावश्यक वापर टाळा.
- आपल्या सभोवताली स्वच्छता ठेवा आणि डासांचे स्रोतांना दूर ठेवणे.
योग्य उपचार आणि काळजी मेंदूचे नुकसान आणि मलेरिया चीकॉम्पगुंतागुंत कमी करण्यास मदत करू शकते.