डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय?
डायबेटिक नेफ्रोपॅथी हा मूत्रपिंडात खराब होण्याचा सर्वात सामान्य विकार आहे. मूत्रपिंडाचे प्राथमिक कार्य रक्तातील कचरा काढून टाकणे हे आहे. मधुमेहामुळे कालांतराने मूत्रपिंडाच्या फिल्टरिंग प्रणालीमध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे टिश्यूंना नुकसान होते आणि परिणामी किडनी रोग (नेफ्रोपॅथी) होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जोपर्यंत किडनी चे कार्य करणे थांबत नाही तोपर्यंत किडनी विकाराचे लक्षणे दिसून येत नाहीत. तसेच, जे लक्षणे दिसतात ते काही विशिष्ट नसतात. फ्लुइड बिल्ड अप हे नेफ्रोपॅथीचे प्रथम लक्षण आहे. इतर लक्षणे अशी आहेतः
- झोप न येणे.
- पोट बिघडणे.
- भूक न लागणे.
- अशक्तपणा.
- असंतुलित रक्तदाब.
- लघवीमध्ये मध्ये प्रोटीन.
- गोंधळणे, लक्ष केंद्रित करण्यात त्रास होणे.
- सतत खाजवणे.
- वारंवार लघवी येणे.
- मळमळ आणि उलट्या होणे.
डायबेटिक नेफ्रोपॅथीची मुख्य कारणं काय आहेत?
मूत्रपिंडात असंख्य केशिका असतात ज्या रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करतात. या केशिकांमध्ये लहान छिद्र (फिल्टर) असतात, ज्याद्वारे, टाकाऊ पदार्थ लघवी स्वरूपात बाहेर टाकले जाते. रक्त पेशी आणि प्रथिने या छिद्रांपेखा मोठे असतात आणि त्यामुळे ते लघवीसोबत बाहेर फेकले जात नाही.
ब्लड शुगरची पातळी जर वाढली तर या छिद्रांना नुकसान होते, आणि ते मोठे होतात. परिणामी, यातून रक्त सुद्धा जाऊ शकते. यामुळे ग्लोमेरुली, म्हणजे किडनीचे फिल्टर्स यांना नुकसान होते. कालांतराने, हे फिल्टर्स गळू लागतात आणि थोड्या प्रमाणात महत्वाची प्रथिने लघवीसोबत बाहेर पडतात (मायक्रोअल्ब्युमिन्युरिया). जर उपचार केले नाहीत, तर या स्थितीमुळे मायक्रोअल्ब्युमिन ची हानी होते ज्यामुळे एंड-स्टेज-रिनल-डिसीज (ईएसआरडी) होतो.
यानंतर, किडनीवर ताण पडल्यामुळे फिल्टर करण्याची क्षमता कमी होते. टाकाऊ पदार्थ रक्तात जमून राहतात, आणि शेवटी, किडनी खराब होते.
डायबेटिक नेफ्रोपॅथी चे निदान आणि उपचार कसे केले जातात?
तुमचे डॉक्टर शारीरिक तपासणी करतील आणि मेडिकल हिस्टरी घेतली जाईल. त्यानंतर आपल्याला काही चाचण्या करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतोः
- किडन्यांची स्थिती आणि कार्य तपासण्यासाठी रक्त तपासणी
- लघवीत प्रथिने आहेत का ते भागण्यासाठी लघवी तपासणी. लघवीत खूप जास्त प्रमाणात प्रथिने असणे ज्याला मायक्रोअल्ब्युमिन असे म्हणतात. ही नेफ्रोपॅथी ची सुरुवात असते.
- एक्स-रे, एमआरआय आणि सिटी स्कॅन करून किडनीचा रक्त पुरवठा कसा आहे हे तपासले जाते.
- रिनल फंक्शन टेस्ट करून फिल्टरिंगची क्षमता तपासली जाते.
- किडनीची बायोप्सी.
नेफ्रोपॅथीच्या सुरुवातीच्या काळात औषधे वापरली जातात:
- उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी
- ब्लड शुगरची पातळी ताब्यात ठेवण्यासाठी
- कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करायला.
- लघवीत प्रथिनांची पातळी नियंत्रित करण्यासाठी.
नंतरच्या काळात किडनी ट्रान्सप्लांट आणि डायलिसिसचा सल्ला दिला जातो.