डिप्थेरिया म्हणजे काय?
डिप्थेरिया हा कॉर्नेबॅक्टरीयम या जीवाणुमुळे होणारा संसर्गजन्य जीवाणू रोग आहे. डिप्थेरिया हा सहसा 1-5 वर्षातील मुलांना होतो आणि हिवाळ्यात जास्त होतो.या संसर्गा मुळे घशाच्या मागच्या बाजूला जाड आवरण येते ज्यामुळे खायला आणि गिळायला खूप त्रास होतो. सामान्यतः जंतूमुळे नाक आणि घशावर परिणाम होतो, पण कधी कधी, त्वचेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
जीवाणू संसर्ग झाल्यावर 1 ते 7 दिवसात याची लक्षणे दिसू लागतात. डिप्थेरियाची काही सामान्य लक्षणे अशी आहेत:
- ताप येणे.
- थंडी वाजणे.
- सतत खोकला होणे.
- लाळ गळणे.
- घशात खवखवणे.
- गिळायला त्रास होणे.
- नाकातून पाणी गळणे किंवा रक्तस्त्राव होणे.
- त्वचेवर व्रण येणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
हा रोग जीवाणुंमुळे होत असला तरी, जेव्हा संसर्गित व्यक्तीस खोकला किंवा शिंका येते तेव्हा श्वसन थेंबातून हा पसरतो. हा जीवाणू श्वसनमार्गातून प्रवेश करतो, त्यामुळे साधारणतः त्याची लक्षणे घशात किंवा नाकात दिसतात.
त्वचेवरील व्रण किंवा फॉमाइट्स (संसर्गित व्यक्तीच्या वापरामुळे एखाद्या वस्तूवर जीवाणू चिटकणे) द्वारे सुद्धा जंतू पसरू शकतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
डिप्थेरियाचे प्राथमिक निदान शारीरिक तपासणीद्वारे होऊ शकते, ज्यामुळे डॉक्टरांना घशातील मृत पेशींवरील काळे किंवा करड्या रंगाचे आवरण बघता येते. इतर चाचण्या अशा असतात:
- थ्रोट स्वॉब घशातील नमुन्याचे विश्लेषण.
- सेरोलॉजिकल चाचण्या आणि रक्त चाचण्या जसे संपूर्ण ब्लड काउंट, डिप्थेरियाच्या अँटीबॉडीज डिप्थेरिया अँटीजन, इत्यादि.
रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी,या रोगाचे वेळेवर निदान आणि उपचार होणे आवश्यक असते.
जीवाणूंमुळे पसरलेले विष अधिक नुकसान करू नये म्हणून डिप्थेरिया च्या उपचारांमध्ये अँटी- टॉक्सिन्स चा वापर केला जातो.
अँटिबायोटिक्स चा वापर करून रोग पसरवणारे जीवाणू या औषधांसोबतच, इतर काळजी घेऊन त्रास कमी करता येतो. ते असे:
- आयव्हीतुन द्रव देणे (इंट्राव्हीनस).
- आराम करणे.
- श्वसन नळी वापरणे.
- वायुमार्ग मोकळे करणे.
डॉक्टरांना रुग्ण संसर्गजन्य नाही याची खात्री पटे पर्यंत डिप्थेरिया च्या रुग्णांना वेगळे ठवेल जाते.