सारांश
आपण उभे असताना तोल गेल्याचे जाणवणें किंवा स्थिर राहिल्यावर हलत असल्यासारखे जाणवणें याला चक्कर येणें असे म्हणतात. हे सामान्यपणें कमी रक्त शर्करा, निर्जलीकरण, कमी रक्तदाब आणि मोशन सिकनेस यामुळे होते. कधीकधी, चक्कर येण्याचे कारण अज्ञात असते.चक्कर येणे ही एखाद्या मूलभूत समस्येचे लक्षण असू शकते जसे की माइग्रेन, मोशन सिकनेस किंवा काही कानाचे विकार, जे तोलाच्या जाणिवेला प्रभावित करू शकतात. संखोल इतिहासाद्वारे आपले डॉक्टर त्याचे निदान करू शकतात. चक्कर येण्यासाठी उपचार मूलभूत स्थितीप्रमाणें केला जातो, ज्यामध्ये निर्धारित औषधांसह काही सावधगिरी बाळगणे असे असते. उपचार न केल्यास, घसरण किंवा शुद्धी गेल्यामुळे इजा होऊ शकते. चक्कर येण्यामागील अंतर्निहित कारण उपचारयोग्य असल्याने, बहुतांश प्रसंगी परिणाम चांगला होतो.