डोळ्यांचा कोरडेपणा - Dry Eye Syndrome in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

December 01, 2018

March 06, 2020

डोळ्यांचा कोरडेपणा
डोळ्यांचा कोरडेपणा

डोळ्यांचा कोरडेपणा काय आहे?

डोळ्यांचा कोरडेपणा, किंवा कोरडा डोळा रोग ही एक सामान्य बाब आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला डोळ्यात कोरडेपणा किंवा जळजळीच्या स्वरूपात अस्वस्थता जाणधते कारण पुरेसे अश्रू तयार होत नाहीत किंवा त्वरीत वाफवून जातात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

डोळ्यांचा कोरडेपणा लक्षणे गंभीर किंवा सौम्य स्वरूपात बदलू शकतात. याची काही लक्षणे खाली सूचीबद्ध आहेत:

  • कोरडेपणा.
  • सूज.
  • खाजवणे.
  • जळजळ होणे.
  • लालसरपणा.
  • अस्पष्ट दृष्टीक्षेप ज्यामध्ये पापण्या फडफडवल्याने सुधारणा होते.
  • वेदना.
  • डोळ्यात पाणी येणे.
  • डोळयाच्या मागे प्रेशर जाणवणे.

जर माणूस शुष्क वातावरणात असेल किंवा जवळपासचे वातावरण  प्रदूषित असेल तर ही लक्षणे वाढू शकतात. यामुळे खाजवणे देखील वाढू शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

डोळ्यांचा कोरडेपणाची प्राथमिक कारण अश्रूंच्या बनण्यात कमतरता आहे, ज्यामुळे डोळ्यांमध्ये ओलावा कमी होतो. डोळ्यांचा कोरडेपणाच्या इतर सामान्य कारणांमध्ये खालील समाविष्ट आहेत

  • कॉटॅक्ट लेंसचा वापर.
  • गरम हवामान.
  • वादळी वातावरण.
  • पापणी मध्ये सूज.
  • अँटीहिस्टामाइन्स, अँटिडिप्रेसंट्स, गर्भनिरोधक गोळ्या आणि डाययुरेटिक्स सारखी औषधे.
  • मेनोपॉज आणि गर्भधारणा यासारख्या परिस्थितींमध्ये हार्मोनल बदल.

वयस्कर माणसांमध्ये डोळ्यांचा कोरडेपणा होण्याची शक्यता जास्त असते आणि पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा सिंड्रोम अधिक दिसून येतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टरांद्वारे शारीरिक तपासणी डोळ्यांचा कोरडेपणाचे निदान करण्यात मदत करू शकतात. चाचण्या सामान्यतः आवश्यक नसतात.

धूळ आणि धुरकट वातावरणापासून दूर होऊन सूर्यप्रकाशात असताना डोळा संरक्षित करण्यासाठी सनग्लासेस वापरुन डोळ्यांचा कोरडेपणा टाळता येऊ शकतो. डोळ्यांचा कोरडेपणाचे उपचार लक्षणांनुसार बदलू शकतात. ताबडतोब बरे होण्यासाठी, डॉक्टर हे सांगू शकतात:

  • आयड्रॉप्स.
  • डोळे स्निग्ध करण्यासाठी ऑईंटमेंट.
  • सूज कमी करण्यासाठी औषधे.

डोळा स्निग्ध ठेवण्यासाठी डॉक्टर अधिक ओमेगा -3 फॅटी ॲसिडसह आहारातील बदलांची शिफारस देखील करू शकतात.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Dry eyes
  2. National institute of eye. Facts About Dry Eye. National Institutes of Health. [internet].
  3. National institute of eye. Facts About Dry Eye. National Institutes of Health. [internet].
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Dry eye syndrome
  5. American academy of ophthalmology. What Is Dry Eye?. California, United States. [internet].

डोळ्यांचा कोरडेपणा साठी औषधे

Medicines listed below are available for डोळ्यांचा कोरडेपणा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.