कानाचा आजार काय आहे?
कानाचा आजार हा कोणताही विकार असू शकतो ज्यात लक्षणे वेदने पासून अस्वस्थते पर्यंत, आणि शेवटी संपूर्ण बहिरेपणा पर्यंत असू शकतात. तुमच्या कानात तीन भाग असतात-बाह्य, मध्य आणि अंतर्गत आणि या भागांचे मुख्य कार्य हे ऐकणे आणि शरीराचे संतुलन टिकवून ठेवत असते. काही सामान्य कानाचे रोग आहेत ओटायटिस (कानात सूज येणे), टीनिटस (कान मध्ये घंटी वाजणे), मळ जमा होणे किंवा काना मध्ये अडथळा येणे, मेनेयरस रोग (व्हर्टिगो आणि टिनिटस), ओटोमॅकोसिस (कानांचे फंगल संसर्ग), बॅरोट्रूमा (वायू दाबात बदल झाल्यामुळे कानाला दुखापत), व्हेस्टिब्युलर न्युरिटिस (विषाणूजन्य संसर्गा मुळे वेस्टिबुलर तांत्रिकेत सूज), प्रेस्बायक्युसिस (वय वाढल्याने बहिरेपणा) आणि कोलेस्टेटामा (काना मध्ये असामान्य वाढ)
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
कानाच्या रोगाची चिन्हे आणि लक्षणे ही पॅथॉलॉजी आणि प्रभावित कानाच्या भागानुसार बदलतील. याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे आहेत :
- कानाच्या वेदना डोक्यावर प्रसारित होऊ शकतात.
- लालसरपणा आणि सूज.
- कानातून डिस्चार्ज.
- चक्कर येणे आणि तोल न सांभाळणे.
- कानात घंटी किंवा घुणघुणण्या सारखा आवाज येणे.
- बहिरेपणा.
- मळमळ आणि उलटी.
याची मुख्य कारणं काय आहेत?
कानाच्या रोगाचे वेगवेगळे कारणं खालील प्रमाणे आहेत :
- बॅक्टेरिअल, फंगल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स.
- अचानक हवेच्या आणि पाण्याच्या दाबात झालेल्या बदलाने कानाला दुखापत
- कानात कॅल्शियम क्रिस्टल्सच्या हालचालीमुळे तोल जाणे
- मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्याने, वय वाढल्याने कानाचा पडदा कमजोर पडणे किंवा काही कर्करोगाच्या वाढीमुळे बहिरेपणा येणे.
- काही औषधांमुळे कानात घंटी सारखा आवाज येऊ शकतो.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?
कानाच्या रोगाचे बहुतेक चिन्हे आणि लक्षणे हे सामान्य असतात आणि आपल्या स्थितीचे योग्य निदान मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही ईएनटी ( कान, नाक आणि घसा) विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा. खालील निदान चाचण्या केल्या जातात:
- न्यूमॅटिक ऑटोस्कोप वापरून कानाचे परीक्षण
- कानातून होणारे डिस्चार्ज तपासणे
- ध्वनि प्रतिबिंबितक - विशिष्ट आवाज वारंवारतेचा वापर करून कानाच्या मधात जमा झालेला असंसर्गित द्रव ओळखणे.
- टिमपॅनोमेट्री - वेगवेगळ्या वायु दाबांच्या सहाय्याने कानाच्या मध्याची आणि पडद्याची स्थिती तपासणे.
- ट्यूनिंग फोर्क चाचणी
- ऑडिओमेट्रिक चाचणी - ऐकण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी
- टिश्यू बायोप्सी
एकदा आपल्या कानाच्या रोगाचे योग्य आणि वेळेवर निदान झाल्यानंतर, आपले ईएनटी तज्ञ आपल्यासाठी उपचार पद्धत ठरवतील. काही प्रकरणांमध्ये उपचार हा साधे औषधं असू शकतात तर कधी सर्जरीची गरज भासू शकते. हे सामान्य उपचार पर्याय उपलब्ध आहेत:
- कानाचा मळ काढणे
सक्शनचा वापर करून कानातील अडथळा काढून टाकणे. - औषधोपचार
इअर ड्रॉप्समध्ये प्रतिजै्विके किंवा तोंडी अँटीबायोटिक्स असतात ज्यामुळे संसर्ग बरा होतो. वेदना नियंत्रित करण्यासाठी वेदनाशामके. मळमळ आणि उलट्या व्यवस्थापनासाठी अँटी-इमेटिक्स. - ऐकण्यासाठी मदत करणारी उपकरणं
बहिरेपणाचे व्यवस्थापन करण्यासाठी,ऐकण्यास मदत करणाऱ्या उपकरणांचा वापर. - शस्त्रक्रिया
कर्करोगाचा विकास अडवण्यासाठी शस्त्रक्रिया. - कोक्लेयर इम्प्लांट
ऐकण्याच्या गंभीर नुकसानाचा उपचार करण्यासाठी कोक्लेयर इम्प्लांट. - व्यायाम
चक्कर येण्याचा उपचार करण्यासाठी व्यायाम बदलणे.
बॅरोट्रॉमापासून आराम मिळवण्याची सोपी पद्धती आहे,च्यूइंग गम चावणे किंवा जांभई देणे.
काही प्रतिबंधात्मक उपाय जसे की आंघोळ केल्यानंतर किंवा पोहून आल्यानंतर कान वाळवणे (ड्राय करणे), आपल्या काना मधील संसर्ग आणि वेदनांपासून आपले संरक्षण करू शकते. मोठा आवाज कमी करणे किंवा संरक्षित प्लग वापरणे, या सारख्या उपायांनी आपले बहिरेपणापासून संरक्षण होऊ शकते. कृपया हे नोंद करा की कुठलेही घरगुती उपाय करण्यापेक्षा आपल्या डॉक्टरांना भेटून या बाबतच्या कोणत्याही लक्षणांसाठी त्यांचा सल्ला घेणे सर्वोत्तम आहे.